शनिवार, २३ मे, २०२६

2860. सल्ला किती मोलाचा होता

 नाना सकाळी फिरून येत होते. अचानक त्यांना बाळू काका भेटले.
"का रे खूप दिवसांनी भेटतो आहेस?तब्येत बरी आहे ना?"
बाळू काका:"हो हो अगदी उत्तम आहे" पण घरात थोडी अडचण होती,म्हणून बाहेर पडलो नाही."
दोघे जवळील टपरीवर गेले.चहा घेतला. थोडा वेळ गप्पा मारून आपापल्या घरी निघून गेले.
दहा बारा दिवस नाना आणि बाळू काकांची भेट झाली नाही. त्यांना शंका आली की तो आजारी तर नाही ना? नाना त्यांच्या घरी गेले.त्यांना बघताच बाळू काका हसले.हाताने खुण करून खुर्चीवर बसण्यास सांगितले.बाळू काका कॉट वर पडून होते.तब्येत बरी नव्हती. ताप आला होता.
नाना:"बाळू,,बरे नाही का"?
बाळू:"हो ना !गेले चार पाच दिवस ताप येतोय आहे "
नाना सहज घरात डोकावतात. आतल्या खोलीत बाळू काकांची पत्नी रुक्मिणी बसल्या बसल्या केर काढत होती. सुन पद्मा जवळच मुलाला खेळवत बसलेली होती.
नाना थोडावेळ थांबून परत फिरले .
काही दिवसांनी बाळू काका बरे झाले. नेहमी प्रमाणे सकाळी चहाच्या टपरी जवळ ते नानांना भेटले. आज त्यांची मनस्थिती काहीशी वेगळी होती. चहा पिता पिता ते नानांना सांगू लागले.
"नाना, मी इतके दिवस तुला काही सांगितले नव्हते.. पण आज सांगतो की माझा मुलगा शिवा व सून  पद्मा आम्हाल अक्षरशः मोलकरणी सारखे वागणूक देतात,! आम्हाल धड जेवण पण देत नाही,कारण काय तर आमचे घर, बँकेतील शिल्लक, गावाकडची जमीन आम्ही त्याच्या नावावर करून देत नाही.! मी मुलाला सांगितले की अरे आमच्या पश्चात तुलाच मिळणार आहे! पण त्याला सारे लगेच हवे होते. एक सांगतो,थोडे दिवस वाट पाहू आणि आम्ही गावाकडे निघून जाऊ" आणि बाळू रडायला लागला.बाळूचे हे बोलणे ऐकून नाना दुःखी झाले. त्यांनी बाळू ची कशीबशी समजूत काढली. आणि ते दोघेही घरी गेले.
काळ पुढे सरकला.एके दिवशी सकाळी सकाळी गावात बातमी आली की बाळू काका झोपेतच निधन पावले. नाना लगबगीने गेले.त्याचे अंत्यदर्शन घेतले. माघारी फिरले. पण त्यांनी मनात एक निश्चय केला की बाळूच्या सुनेला आणि लेकाला वठणीवर आणायच!
एकदा संध्याकाळी नाना देवळाजवळील बाकावर बसले असताना त्यांना बाळू काका ची पत्नी रुक्मिणी भेटली. खूप थकली होती.नाना तिला जवळ बसवून घेतात आणि गप्पा मारता मारता सांगतात "वहिनी तुम्ही तुमचे शेत व बँकेतील ठेवी मुलाच्या नावाने आत्ताच करू नका, तुम्ही गावाकडे जा,तेथील शेती अर्धिलकीने करा, व्याजाच्या पैशात तुमचे व्यवस्थित भागेल.तिकडे गेल्यावर स्वतंत्रपणे राहता येईल,विचार करा आणि निर्णय घ्या "!
रुक्मिणीला ते पटते. आणि ती मुलाला व सुनेला हा निर्णय सांगते. ते दोघेही खूप तमाशा करतात. पण रुक्मिणी ऐकत नाही व गावी निघून जाते.. हळूहळू तिथे तिचे बस्तान बसू लागते. मुख्य म्हणजे तिचे डोके शांत राहू लागले.
इकडे पद्मावर सर्व जबाबदारी पडल्याने तिचा गोंधळ उडू लागला.तिचे व नवऱ्याचे दररोज भांडणे होऊ लागली. एके दिवशी  ती शिवाचा डबा  करू शकली नाही, त्यामुळे त्याचे भांडण झाले हे भांडण विकोपाला गेले  शिवाने रागाने पद्माला बडवून काढले आणि ती रागात घर सोडून माहेरी निघून गेली .काही दिवस पद्माचा भाऊ व वहिनी तिच्याशी नीट वागत.पण एकदा पद्माची वहिनी तिला बजावते की"वन्स पाहुणचार 4 दिवसाचा असते. तो घ्या आणि तुम्ही निघून जा, तुमच्या घरी". पण घरी पद्मा कोणत्या तोंडाने जाणार होती?
ती माहेरच्या गावात वेगळी राहू लागली.. कुठेतरी मोलमजुरी करून भागवत होती.पदरी एक छोटा मुलगा होता. एकदा तिच्या असहाय्यतेचा फायदा कंत्राटदार
घेतो. गोड गोड बोलून तिला जाळ्यात ओढतो. ते पळून जाऊन लग्न करतात. आणि शेजारील गावात राहू लागतात.
शिवाला हे कळते. तो उद्विग्न होतो,तो नोकरी सोडून घरी बसतो... आणि हळूहळू दारूच्या आहारी जातो. केस वाढलेले,पायात चपला नाही,कपडे फाटलेले अशा अवस्थेत तो गावात हिंडत असे, कुठेतरी पडून झोपी जात असे.. कोणीतरी त्याला तुकडा देत असे. तो खाऊन तो जगत होता,
नाना हे सारे बघत होते. एके दिवशी त्याला घेऊन ते रुक्मिणीच्या गावी जातात.साऱ्या गोष्टी कळल्यावर ती खूप दुःखी होते.तिच्यापुढे एक आव्हान उरते की मुलाला यातून बाहेर काढायचे! आणि स्वतःच्या पायावर उभे करायचे!
मुलाला घेऊन ती राहू लागते.तिला भूतकाळ आठवतो.शिवाने दिलेला त्रास आठवतो, पण शेवटी ते एक मातृ हृदय होते.ती शिवाचा सांभाळ करू लागते..
सगळ्यात प्रथम त्याला व्यसनापासून सोडवायचे! हे पहिले काम होते.तालुक्यातील Dr च्या साहाय्याने उपचार सुरू होतात. हळूहळू तो बरा होऊ लागतो..2 वर्षात तो पूर्ववत होतो.. रुक्मिणी त्याला शेतकामात गुंतवू लागली. काही दिवसांनी तो त्यात पारंगत झाला. काही काळाने तो सारा कारभार स्वतंत्रपणे सांभाळू लागला. कधीकधी त्याला मुलाची व पद्माची आठवण खूप सतावत असे. त्यावेळी रुक्मिणी त्याला आधार देत असे.! त्याची समजूत काढत असे.!
बरीच वर्ष झाली.शिवा तयार झाला होता. चांगल्या तऱ्हेने शेती सांभाळत होता.रुक्मिणी आता निवृत्तीच्या मार्गावर आली होती. अचानक एकदा तिला बातमी कळते.की ज्या कंत्राटदाराबरोबर पद्मा पळून गेली होती, तो तिचा पूर्ण उपभोग घेऊन तिला हाकलून देतो.मुलाला आश्रमात भरती करून पद्मा निराशेत आत्महत्या करते. तिच्या हाताला काहीही लागत नाही. शेवटी रिकामीच मरते.
रुक्मिणी शिवाला सांगून नातवाला आश्रमातून सोडवून आणते.व त्याचा सांभाळ करू लागते.
पुढे रुक्मिणी शिवाला घेऊन तलाठ्याकडे जाते व सारी शेती त्याच्या नावावर करून देते.ज्या प्रॉपर्टी साठी शिवा तिचा छळ करत होता,तीच प्रॉपर्टी ती मुलाला दान करते. त्याच्या नावावर करून देते.
ती घेताना शिवाला सारे आठवले होते. ह्या प्रॉपर्टी साठी त्याने संसार, पत्नी सारे गमावले होते. काही दिवसात रुक्मिणी पण जगाचा निरोप घेते. आज तो आर्थिक गोष्टीमुळे संपन्न होता. पण लौकिक अर्थाने रिकामा होता. आई वडील पत्नी सारे गमविले होते.
स्वतःच्या मुलाला घेऊन शेतात फिरत असताना त्याला फार अपराधी वाटत होते.. पण आता त्यापुढे काही इलाज नव्हता सारखे त्याचे मन खात होते की ह्या प्रॉपर्टी साठी मी आई वडिलांचा छळ केला तिचा मी आज मालक झालो. पण मी वेगळ्या अर्थाने मी रिकामाच राहिलो! सारी माणसे गमावली.
जी प्रॉपर्टी त्याला मिळाली होती तिचा उपभोग तो फार काळ घेऊ शकला नाही. अचानक त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि तो जगाचा निरोप घेतो. नातू थोडा मोठा झाल्यावर थोडाफार कारभार करू लागतो. पण त्याचे ध्येय शिक्षण पूर्ण करणे हे होते. तो ते पूर्ण करतो आणि शिक्षणाचा उपयोग करून शेतीत निरनिराळे प्रयोग करून भरपूर उत्पन्न काढतो. आजुबाजूच्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना योग्य पद्धतीने शेती कशी करायची आणि उत्पन्न कसे वाढवायचे हे सांगतो.
हळूहळू त्या परिसरात हरितक्रांती घडवून आणतो. स्वर्गातून रुक्मिणी, शिवा हे बघून सुखावत असतात. नानांनी दिलेला सल्ला किती मोलाचा होता हे पण उमजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...