शनिवार, २३ मे, २०२६

2877. नायजेरिया मधली ही कर्मठ परंपरा

    ऐंजा रिंगरेन नावाच्या महिलेनं स्वताच्या नवऱ्याला सोबत घेऊन एक ngo स्थापन केली. ही  संस्था कोणत्या विषयावर काम करते याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणजे बघा आपल्याला पोटापुरती नोकरी भेटली, थोडा पैसा आला की आपण चैन मौज मजा करायचा विचार करतो. पण ऐंजा रिंगरेन या महीलेनं मात्र एक क्रांतिकारी पाऊल उचललं. नायजेरिया मध्ये एक अंधश्रद्धा फोफावली आहे. तिथं लहान मुलांना रस्त्यावर सोडलं जातं. 
    एखाद्या मुलाच्या अंगात किवा शरीर यष्टी विचित्र वाटली की त्याचे आईवडील त्याला एका तांत्रिकाकडे घेऊन जातात. तो तांत्रिक त्या मुलाला रस्त्यावर सोडून द्या म्हणतो. याला घरात थारा देऊ नका. याच्या अंगात राक्षस आहे, वैगेरे. त्याचे आई वडील त्या लहान मुलाला रस्त्यावर सोडून जातात. ते मूल रस्त्यावर भीक मागून जगतं आणि नंतर उपाशी मरून जातं. अशा मुलांना जवळ करून त्यांच पालन पोषण करण्याचं काम ऐंजा रिंगरेन करते. अशा जवळपास शंभर एक मुलांना ती आपल्या घरी सांभाळते. 
     असंच एकदा तिला रस्त्याच्या कडेला एक दोन वर्षाचा मरतुकडा मुलगा दिसला. तो मुलगा मरणाच्या दरात येई पर्यन्त अशक्त झाला होता. त्याला उभं राहण्यासाठी धडपड करावी लागत होती. या चिमुकल्या मुलाकडे कोणचच लक्ष गेलं नव्हतं.
     ऐंजा च्या काळजात धस्स झालं. तीने आजपर्यंत बऱ्याच मुलांना उचललं होतं. पण आजाच्यासारखा मुलगा नव्हता. तिने त्या बाळाला खायला देण्याचा प्रयत्न केला. त्याने पाण्याकडे बोट केलं. तिने त्याच्या तोंडाला पाणी लावलं.  त्या दोन वर्षाच्या बाळाला तिने होप असं नाव दिलं. तिने होप ला घरी घेऊन गेली. त्याला आंघोळ घातली. त्याची मेडिकल तपासणी केली. तेव्हा त्याला बरेच आजार जडलेले होते. त्याच्यावर उपचार करण्यात आले .  अवघ्या एक ववर्षांनी ऐंजा ने त्याच होप सोबत तसाच पाणी पाजतानाचा फोटो काढला.  हे दोन्ही फोटो जगभरात व्हायरल झाले. नयाजेरिया मधली ही कर्मठ परंपरा मोडण्यासाठी अजून ngo तिथ  सक्रिय झाल्या. एकट्या चिमुकल्या होप ने असंख्य लहान मुलांना नवीन आशा दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...