स्त्री-पुरुषांच्या नात्यातला सर्वात मोठा गुंता !
स्त्रिया नेहमी एक तक्रार करतात, "तुला मी कधीच समजली नाही !" आणि पुरुष डोक्याला हात लावून वैतागून विचारतात, "अरे पण तुला नेमकं हवंय तरी काय?" हा जगातला सर्वात जुना आणि कधीच न सुटलेला गुंता आहे. पण सायकॉलॉजी सांगते की या भांडणाचं मूळ हे दोघांच्या 'वायरिंग'मध्ये (Wiring) लपलेलं आहे. निसर्गाने दोघांचे 'संवादाचे ट्रॅक'च वेगळे बनवले आहेत.
जेव्हा एखादा पुरुष बोलतो, तेव्हा तो त्याच्या 'मेंदूतून' बोलत असतो. त्याचा मेंदू सतत 'लॉजिक' आणि 'प्रॉब्लेम-सॉल्व्हिंग'च्या (Problem Solving) मोडमध्ये असतो. पण जेव्हा एखादी स्त्री बोलते, तेव्हा ती तिच्या 'काळजातून' आणि 'भावनांमधून' बोलत असते. तिला त्या क्षणी काय 'फील' (Feel) होतंय, हे तिच्यासाठी जगातील कोणत्याही लॉजिकपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं.
नेमकी ठिणगी कुठे पडते माहितीये?
जेव्हा एखादी स्त्री तिच्या नवऱ्याला किंवा पार्टनरला दिवसभराचा त्रास, ऑफिसमधली कटकट किंवा मैत्रिणीचं भांडण सांगते... तेव्हा पुरुष लगेच डोक्यावर 'मेकॅनिकची' टोपी घालतो. तो तिच्या त्या प्रॉब्लेमवर 'सल्ले' (Solutions) द्यायला लागतो. "मग तू असं का नाही केलंस? तू हे असं करायला हवं होतंस."
आणि इथेच पुरुषांची सर्वात मोठी गल्लत होते! त्यांना हे समजतच नाही की, ती जेव्हा तिच्या अडचणी सांगत असते, तेव्हा ती तुमच्याकडे 'उपाय' मागायला आलेलीच नसते. तिला तो प्रॉब्लेम सोडवायला अक्कल असते. तिला फक्त तुमच्याकडून 'व्हॅलिडेशन' (Validation) हवं असतं! तिला एवढंच हवं असतं की तुम्ही तिचे सल्ले न काढता शांत बसावं, तिचं म्हणणं ऐकावं आणि म्हणावं, "हो यार, हे खूप त्रासदायक आहे... मी समजू शकतो तुझी चिडचिड."
स्त्रियांना त्यांच्या प्रश्नांची 'उत्तरे' नको असतात, त्यांना त्यांच्या भावनांची 'पावती' हवी असते! तुम्ही दिलेला लॉजिकल 'सल्ला' तिला असं फील करून देतो की जणू तुम्ही तिच्या भावनांनाच चुकीचं ठरवत आहात.
एक अत्यंत जळजळीत आणि प्रॅक्टिकल नियम लक्षात ठेवा...
एखाद्या स्त्रीला समजून घेणं हे अजिबात कठीण नाहीये. फक्त तिला 'सुधारण्याचा' किंवा तिचे प्रॉब्लेम 'सोडवण्याचा' इंजिनिअरिंगचा अट्टाहास सोडून द्या. जो पुरुष तिला 'जज्ज' न करता फक्त 'ऐकून' घेतो. त्याच्यासाठी ती स्त्री स्वतःहून कितीही गुंतागुंतीची असली, तरी ती एखाद्या शांत तळ्यासारखी पारदर्शक होते.
पवन दबडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा