गुरुवार, १२ जून, २०२५

1970. मदत

 "ना त्याने नाव विचारलं, ना पैसे घेतले… फक्त माझी ‘आई’ होण्याची वाट मोकळी करून गेला…"
शिवानी.. २९ वर्षांची, व्यवसायाने शिक्षिका आणि मनाने खूपच हळवी.
लग्नाला तीन वर्षं झाली होती. नवरा, राहुल, एका कंपनीत सीनियर इंजिनिअर होता आणि प्रोजेक्टच्या कामाने सतत बाहेरगावी असायचा.
शिवानी सातव्या महिन्यात गर्भवती असताना डॉक्टरांनी सल्ला दिला:
“आता तुम्हाला आरामाची गरज आहे. शक्य असल्यास माहेरी जा.”
शिवानीचे आई-वडील मुंबईमध्ये होते आणि राहुल त्या वेळी चेन्नईत.
त्याने लगेच आपल्या लहान भावाला, आरवला.. सांगितलं की त्याने शिवानीला स्टेशनवर सोडून यावं.
शिवानी सुजलेल्या पायांनी आणि भरगच्च बॅगेसह स्टेशनवर पोचली पण ट्रेन दोन तास उशिरा होती.
आरव म्हणाला, " वाहिनी, मी जरा ऑफिसचा एक मेल पाठवतो…लगेच येतो." 
पण तो गेला आणि परत आलाच नाही.
शिवानी एका बाकावर बसलेली. तहानेने व्याकुळलेली, पाठीचा त्रास आणि एकटेपणा. ती असहाय होत चालली होती.
तेव्हाच तिला एक वृद्ध कुली नजरेस पडला. साधारण ६५च्या वर वय, पांढरं टोपडं, फाटलेली कमीज, आणि डोळ्यात भूक आणि आत्मसन्मानाचं दर्शन.
शिवानी म्हणाली, “बाबा, सामान ट्रेनमध्ये ठेवायचंय... पाच नंबर प्लॅटफॉर्म आहे.”
बाबाने डोळे खाली घालून उत्तर दिलं, “ठीक आहे बाळ, पंधरा रुपये देशील का? आज संध्याकाळची भाकरी होईल.”
शिवानीने हलकेच मान डोलावली.
सुमारे दीड तासांनी ट्रेनची घोषणा झाली. पण तो कुली कुठेच दिसेना.
रात्रीचे १२:३० झाले होते. स्टेशन सुन्न होत चाललं होतं. काही जण झोपलेले, काही मोबाईलमध्ये, पण शिवानीची नजर फक्त त्या वृद्धाला शोधत होती.
तेवढ्यात तो दूरून धावत येताना दिसला.
दमछाक, घाम, पण चेहऱ्यावर न थकलेली करूणा.
“ बेटा काळजी करू नको… सामान चढवतो ट्रेनमध्ये.”
ट्रेन येण्याच्या काही मिनिटांआधी घोषणा झाली, "आपली ट्रेन आता प्लॅटफॉर्म नंबर ९ वर येईल."
आता पुल चढून जावं लागणार होतं. तीन बॅगा, एक गरोदर स्त्री आणि तो वृद्ध माणूस.
शिवानी म्हणाली, “बाबा, राहू द्या… मी दुसऱ्या कुणाला विचारते.”
पण बाबा काही ऐकायला तयार नव्हते.
सगळं सामान उचललं आणि थरथरत्या पायांनी तो पुल चढायला लागला.
ट्रेन सुरू झाली. शिवानी धावत आपला डबा शोधत होती.
दिवे नव्हते, आवाज नव्हता… पण मनात एक वादळ होतं.
शिवानी ट्रेनमध्ये चढली. दरवाज्यात उभी होती…
आणि तेवढ्यात...
तो वृद्ध कुली धावत आला…
एक बॅग ठेवली… मग दुसरी… मग तिसरी…
धाप लागलेली, पण चेहरा शांत.
शिवानीने थरथरत्या हातांनी खिशातून दहा-पाच रुपये काढले… आणि ट्रेन ने स्पीड पकडला..
पण तो हात आता दूर गेला होता…
तो फक्त हात जोडून "नमस्कार " करत उभा होता.
शिवानीच्या डोळ्यांत अश्रू होते.
एक अनोळखी माणूस, ज्याने ना नाव विचारलं, ना पैसे घेतले…
फक्त मदत केली... नि:स्वार्थ.
शिवानी दिल्लीत पोचली. काही महिन्यांत एका गोंडस मुलाला जन्म दिला.
त्याचं नाव ठेवलं, “करुण”,
त्या भावनेच्या सन्मानार्थ, जी तिला त्या रात्री मिळाली होती.
डिलिव्हरीनंतर शिवानी पुन्हा पुन्हा त्या स्टेशनवर गेली...
कधी सकाळी, कधी दुपारी, कधी रात्री…
“बाबा कुठे आहेत?”
कोणालाच माहिती नव्हतं.
“असले बरेच कुली आहेत मॅडम… पण तुमच्या वर्णनात बसेल असा कोणी नाही दिसला.”
तो माणूस… ती करूणा… ती निःस्वार्थता —
आता फक्त आठवणीत उरली.
आज शिवानी “करुण फाउंडेशन” नावाची संस्था चालवते.
ही संस्था स्टेशनवर असलेल्या वृद्ध, कुली आणि असहाय लोकांना
जेवण, औषधं, आणि उबदार कपडे देते.
कोणीतरी विचारत असतं , "हे सगळं का?"
ती फक्त हसून म्हणते, “कधीकाळी एका वृद्धाने मला काहीही न विचारता, माझ्यावर जे उपकार केले होते, आज मी ते ऋण दररोज कुणावर तरी फेडते”
🕯️ प्रत्येक मदत पैशातूनच होत नाही...काही लोक असेही भेटतात जे शिकवून जातात, की माणुसकीची खरी भाषा 'नि:स्वार्थता' असते.
💔 काही चेहरे आपल्या आयुष्यातून जातात पण त्यांचा स्पर्श आपल्या आत्म्यात कायमचा जिवंत राहतो.

❣️ जर ही गोष्ट तुमच्या ह्रदयाला भिडली असेल तर ❤️LIKE आणि 💬SHARE नक्की करा.
कारण कदाचित तुमच्याही आयुष्यात कधीतरी कोणीतरी नाव-नसलेला देवदूत आला असेल जो अजूनही आठवणीत घर करून आहे…



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...