मुक्ताला प्रथम पाहिलं तो दिवस. तसा मी परत लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. सहा महिन्यापूर्वीचा अपघात आणि स्मिताच रक्ताच्या थारोळ्यातलं प्रेत माझ्या डोळ्या-समोरून हलत नव्हतं.रॉग साईडनं येणाच्या सायकलवरच्या लहान मुलाला वाचवायला गेलो आणि माझी स्कूटर खड्ड्यात गेली. वर्षांच्या स्वातीला घेऊन बसलेली स्मिता उडून पडली आणि एक कार तिच्या..! दैव गती कशी असते बघा, स्वातीही बाजूला जाऊन पडली पण तिला साध खरचटलंही नाही ! मला फक्त वेड लागायचं बाकी होतं. पराकोटीचं दुःख काय असते याचा अनुभव मी घेतला. महिनाभर नोकरीलाच गेलो नाही. स्वातीची मावशी याच गावात राहाते.तिच्याकडं ती स्वातीला घेऊन गेली. पण असं किती दिवस चालणार? माझे नातेवाईक, मित्र, ताई मला परत लग्न करायचा सल्ला देत होते.मुलगी लहान आहे, तुझी उभे आयुष्य आहे अजून.’ सगळ्यांनी मुलगी बघायचा दिवसही ठरवला.मुक्ता, गव्हाळी वर्ण, मध्यम उंची, दोन वेण्या, पाणीदार बोलके डोळे; हसतानाही अर्धेचे मोती चमकवणारे. बघता क्षणी पसत पडावी अशी मुक्ता. पण मी म्हटलं,
“मला जरा मुलीशी एकटीशी बोलायचंय." जवळच्या खोलीतच आम्ही बसलो. साधी आकाशी रंगाची साडी, त्याच रंगाचा ब्लाऊज दाखवायचा कार्यक्रम म्हणून विशेष काही नाही. मी म्हणालो,
‘‘तुम्हाला नापसंत करावं असं तुमच्यात काही नाही. पण माझे एक लग्न आधी झालं होतं. मला दीड वर्षांची मुलगी आहे. तिचा सांभाळ करावा लागणार आहे. ती एकदम उभी राहिली. आनंदानं म्हणाली,
‘म्हणजे मी तुम्हांला पसंत आहे तर ! मग तुम्हांला एक गोष्ट मला सांगायची आहेपण कानात सांगायची आहे. ती माझ्याजवळ येऊन कानात कुजबुजली, ‘
‘ती बाई आहे ना, ती माझी सावत्र आई आहे. अगदी वाईट आहेआत्ता प्रेमानं वागतेय ना, ते नाटक आहे. केव्हा एकदा इथून बाहेर पडेन असं झालंय. मी गारच झालो.
‘म्हणजे इथून बाहेर पडायसाठी तुम्ही ही तडजोड करताय तर. मग मलाही विचार करावा लागेल. मग एकदम जीभ चावून ती म्हणाली,
“तुम्ही, तुम्ही मला एकदम पसंत आहात. मला नकार द्यायचा नाही हं ! माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला !"
मला भपका नको होता. उपचार म्हणून साखरपुडा केला. सारखपुड्याआधी तिचा मामा मला भेटायला आला होता. डोळ्यांतपाणी आणून मला म्हणाला,
‘माझी भाची सरळ आहे, निष्पाप आहे. तिची आई म्हणजेच माझी बहीण काविळीनं गेली. मुक्ता तेव्हा तीन वर्षांची होती. तुमचं आता होतंय असंच लग्न तिच्या बाबांनी केलं. कसंतरी वर्षभर नीट गेलं. तिच्या सावत्र आईला दिवस गेले आणि सारं बिघडलं. मुक्ताला बालपण लाभलंच नाही. लहान वयातच ओझे आणि वाईट-साईट बोलणे. तसे तिचे बाबा मनाने चांगले आहेत, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. मुक्ताला कॉलेज लाईफही एंजॉय करता आले नाही. मराठी घेऊन ती एक्स्टर्नल बी. ए. झाली. घरात कामं करायची ती तिनंच ना? सावत्र भाऊ, बहीण यांना सारी सुखं मिळाली. मुक्तीला मात्र... ’मामाला हुंदका फुटला. आवेग ओसरल्यावर डोळे पुसत तो म्हणाला,‘‘तिनंच फोन करून मला बोलावलंय. पूर्वी मी येत असे, पण माझ येणे तिच्या आईला आवडत नसे. मग मी हळूहळू कमी केलं. तुम्ही तिला पसंत केलेत. तुमची काही अपेक्षा नाही, ठाऊक आहे मला.
मी हा पन्नास हजाराचा ड्राफ्ट आणलाय. माझी छोटीशी भेट तुमच्या संसाराला." मी जागेवरून उठले. त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो,
‘‘लाख मोलाची भाची देताय. पैसे देऊन मला छोटं करू नका. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. शेवटच्या वाक्यानं मामा दिलखुलास हसला. त्यान चेक खिशात ठेवला. अगदी साध्या वातावरणात देवीच्या देवळात आमच लग्न झालंमला गाजावाजा नको होता. माझी ताई आणि तिचा नवरा आला होता. आम्ही दोघा भावंड. मी सोळा वर्षाचा असतानाच आई-वडील दोन वर्षांच्या अंतरात आजारपणाचं निमित्त होऊन गेले. मी आणि माझी ताई आमचे किती प्रेम; शब्दात नाही सांगता यायचं. खरं तर ही गेली तेव्हा स्वातीला ताईच घेऊन जाणार होती. पण मीच म्हणालो, “अगं ताई, ती मावशीकडेच राहू दे. म्हणजे मी तिला रोज भटेन ना !’’ लहान मुलाच्या फिरवावा तसा ताईनं माझ्या गालावरून हात फिरवला. मला आणि स्वातीला जवळ घेऊन रडरडरडली. ताई प्रथमच मुक्ताला बघत होती. ती लग्नाआधी दोन दिवस आली. लग्न देवळात म्हटल्यावर ती थोडी निराश झाली. मी म्हणालो,
‘‘अगं दुसरं लग्न आहे. सोय म्हणून करतो आहोत, त्यात समारभ कशाला ?”
“तुझे दुसरं आहे रे. पण मुलीचे पहिलंच आहे,' ताई म्हणाली. मुक्ताला पाहिल्यावर तिला जवळ घेत ताई म्हणाली, ‘किती गोड आहे रे ही !' यावर मुक्ता तिला बिलगत म्हणाली,
‘ताई खरंच सांगा, मी इतकी गोड आहे? खर सांगा ह, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला." लग्नानंतर कोकणातल्या कुलदैवताला जाऊन आल्यावर ताई गेली. मुक्ता घरी आली. स्वाती आणि मुक्ताची दोन दिवसात गद्दी जमली. नकळत माझ्या मनात तुलना सुरू झाली. स्मिता विलक्षण प्रेमळ होती. पण शांत, सौम्य होती. मुक्ता मात्र अवखळ होती. खरं तर तिच्या अवखळपणाला प्रथमच व्यक्त होण्याची संधी मिळत होती. सावत्र आईमुळे तो मोकळेपणा दबला होता, तो बाहेर येत होता. स्वाती तिला ‘आई’ म्हणत होती. खरं तर ती तिची सखी होती. स्वातीची खूप खेळणी होती. दोघी मिळून खूप खेळायच्या. चार पाच दिवसानंतर मुक्ता तिला अंक, शब्द शिकवू लागली. शिकताना मुक्ता रागावली की स्वाती रुसायची. मग मुक्ता म्हणायची,
‘‘एक मुलगी रुसली, कोपच्यात जाऊन बसली; तिकडुनआला नवरा अन् खुदकन हसली." कधी कधी स्वाती अभ्यासाचा कंटाळाकरायची म्हणून मुक्ता रुसायची. मग स्वाती म्हणायची,
“एक मुलगी रुसली. ..' पुढच तिला आठवायचं नाही. मग ती मुक्ताजवळ जाऊन तिचा हात पकडून म्हणायची,
“ए आईपुढचं सांग ना ग !"
मग मुक्ता म्हणायची, “आम्ही सांगणार नाही. आम्ही रुसलोय !' मग स्वाती म्हणायची,
“तू सांगत नाहीस म्हणून मीही रुसलेय !'
मग मुक्ता तिला सांगायची. स्वाती मागून म्हणायची. नंतर दोषी मिळून म्हणायच्या,
‘दोन मुली रुसल्या, कोपच्यात जाऊन बसल्या; तिकडून आले नवरे अन् खुदकन हसल्या."
वर्षसव्वावर्षांनंतर मुक्तानं एक वेगळाच हट्ट सुरू केला.
‘‘माझे फंमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करूया." मी गारच झालो.
'अगं तुझे वय काय? त बोलतेस काय?’ ती म्हणाली,
‘‘आत्तापर्यंत मी गोळ्यांनी सांभाळलं पण...” मी चिडून म्हणालो,
‘कोणाला विचारून चाललंय हे ? तुला काही अक्कल आहे की नाही ? मला तरी सांगायचेस. मी म्हणजे कुणीच नाही का ? शी...!' मुक्ता म्हणाली,
‘मला माझे प्रेम स्वातीशिवाय कोणालाही द्यायचं नाही." मी तिच्यावर जास्तच चिडत म्हणालो,
“स्वाती माझी मुलगी आहे."
‘‘माझी मुलगी नाही? ” मुक्तानं एकदम विचारलं. मी एकदम गोंधळून गेलो. नंतर म्हणालो,
“तुझीही मुलगी आहे पण त्यासाठी हे सगळे कशासाठी ?' मुक्ताचा चेहरा बदलला. ती निर्धारानं म्हणाली,
“परक्याचं ते परक्याचं आणि आपलं ते आपलंच. मी खूप भोगलंय ते आणि मला स्वातीची आईच व्हायचंय. सावत्र आई व्हायचं नाही. मला माझ्या पोटचं मूल झाले की माझें मन, माझी प्रेम. मी माझेच सांगू शकत नाही. आता मला कोणत्याही अपयश देणाच्या परीक्षेला बसायचं नाही. माझ्यावर ती वेळच यायला नको. मी तसं वचन दिलंय स्मिताताईंना." मी एकदम चमकलो.
"काय म्हणालीस ?” मुक्ता कपाटाजवळ गेली. तिनं हिचा फोटो तिच्याकप्प्यात ठेवला होता.
‘स्मिताताईंशी मी रोज गप्पा मारते. स्वातीच्यागोष्टी सांगते. तुमच्या विषयीही सांगते. त्या बोलतात माझ्याशी. खूप चांगल्या आहेत त्या. मीच त्यांना वचन दिलंय. माझे ऑपरेशनकरायचं म्हणजे करायचं. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला.
प्रेमकिरण जोशी म्हणून माझा एक डॉक्टर मित्र आहे. तो फैमिली प्लॅनिंगची ऑपरेशन्सही करतो. त्याला विश्वासात घेऊन सगळे सांगितलं. सगळे ठरलं. एक दिवस स्वातीला तिच्या मावशीकडं ठेवून मी आणि मुक्ता दवाखान्यात गेलो. प्रेमकिरण मुक्ताला म्हणाला, ‘
‘वहिनी दोनच मिनिटं बाहेर बसा. मी व्यवस्था झाली की बोलवतो तुम्हांला. त्याचे माझे ठरल्याप्रमाणे त्याने माझे ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यावर तो बाहेर आला. तोपर्यंत मुक्ता अस्वस्थ इतका वेळा झाला तरी आपल्याला कोणी बोलावत का नाही. प्रेमकिरण बाहेर येऊन म्हणाला,
“वहिनी ऑपरेशन झालंय. आता मित्राला भेटायला हरकत नाही.’’ माझे नावच सन्मित्र', सारे मला ‘मित्र’ म्हणत. ‘काऽऽय ?” मुक्ता जोरात किंचाळली. प्रेमकिरण काहीच बोलला नाही. मुक्ता पाय आपटत आत आली.
नाही. कायमची गद्दी फू !’
‘ठीक आहे मग मी तरी हॉस्पिटलमधून घरी कशाला येऊ? मी जातो दुसरीकडेच कुठेतरी. मी हसून म्हणालो.
ती एकदम जवळ आली. माझ्या छातीवर डोकं ठेवूनम्हणाली,
“तुमच्याशिवाय मी जग शकेन का ? तुम्ही स्वत:चं... "
ती रडू लागली. तिच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो, “तुझे काय माझे काय ? परिणाम तोच ना !’
मुक्ता-स्वाती. दोघींचं अलौकिक सख्य होतं. स्वाती शरीरानं, मनानं मोठी होत होती. मुक्ता स्वातीबरोबर मनान प्रगल्भ बनत होती. मी मुक्ताचं लायब्ररीत नाव घातलं होतं. चांगली चांगलीपुस्तकं वाचून ती स्वातीला गोष्टी सांगायची. मुक्तामुळे स्वातीलाहीवाचनाची गोडी लागली. बघता बघता स्वाती कॉम्प्युटर-इंजिनियर झाली. घरात कॉम्प्युटर आला. केवळ प्रैक्टिसनं मुक्ताही कॉम्प्युटरमध्ये तरबेज झाली. मुक्ताचं ग्रास्पींग अफाट होतं. मुक्ताचा मामा नेहमी यायचा. मला तो रावसाहेब म्हणायचा. मी त्याला मामासाहेब म्हणायचो. तो मला म्हणाला,
“रावसाहेब, तुमचे उपकार मी कोणत्या शब्दात मानू ? माझी मुक्ता, बालपणी खूप सोसलेंन तिनं. आता हे सुख अनुभवायचं होते म्हणून. पण रावसाहेब, कधी कधी तिच्या बालिशपणाचा तुम्हाला त्रास झाला असेल नाही?’
मला भरून आलं. गहिवर आवरून मी म्हणालो,
‘मामासाहेब, तुमचीभाची म्हणजे प्रेमाचा निखळ झरा. ती जेव्हाअवखळपणानं, बालिशपणानं वागते किंवा बोलते ना; तेव्हा ही देवाची खरी निर्मिती आहे असं वाटतं. कारण तिच्या तशा वागण्यातही त्याग असतो, परोपकार असतो.” मामाच्या डोळ्यांत पाणी उभे राहिलं. त्यालाही खूप बोलायचं होत पण शब्दच गप्प झाले .स्वातीचं लग्नाचं वय झालं. मुक्ताचं विचारूच नका पण मीही जड झालो. ही पोर घरातून जाणार, कल्पनाच सहन होत नव्हती. एक स्थळ पसंत पडलं. मुलगा निर्यसनी, हुशार आणि गोड होता. तोही कॉम्प्युटर इंजिनियर होता. फॉरिन कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीत होता. लग्न ठरलं. त्यांची अपेक्षा काही नव्हती.फक्त लग्न मुंबईलाच करावं, असा त्यांचा आग्रह होता. आमची अडचण असेल तर मुंबईतल्या लग्नकार्याचा सगळा खर्च करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. कारण त्यांचा सगळा गोतावळा मुंबईलाच होता. स्वातीनं लग्नानंतरच नवच्याच्या इच्छेनुसार नोकरी करावी किंवा करू नये, असं आम्ही ठरवलं होतं. म्हणून तिनं कैंपस इंटरव्यूही दिला नव्हता. माझी आता तीन वर्ष नोकरी होती. त्या दिवशी मी माझे पासबुक घेऊन हिशोब करत होतो. दीड एक लाख शिल्लक होते. प्रॉव्हिडंट फंडावर बिनपरतीचे कर्ज काढावे की काय असा विचार सुरू होता. कारण पी-एफंची रक्कम-तिच्यातून मिळणारं व्याज आणि पेन्शन यावर माझे आणि मुक्ताच म्हातारपण होत. माझी आकडेमोड सुरू होती. मुंबईत लग्न म्हणजे साडेतीन-चारलाख खर्च. शिवाय आमची हौस म्हणून स्वातीला. पुन्हा मलाभरून आलं. मी पासबुक मिटलं. डोळे मिटून गप्प बसलो. मुक्तान माझ्या खाद्यावर हात ठेवला तेव्हा भानावर आलो. मुक्ताने माझ्या गालावरून ओघळणारे अशू पदरानं पुसले,
“तुम्हीच असं करणार असाल तर मी काय करायचं ? मी आता जे तुम्हांला सरप्राईझ देणाराय ते निमुटपणे घ्यायचं. माझ्या स्वातीसाठीच साठवलंय मी. खरं तर तुमचंच आहे ते. पण तुम्ही नाही म्हणायचं नाही. आपल्या लग्नाच्या वेळी मामानं तुम्हाला पन्नास हजार देऊ केले होते. तुम्ही ते नाकारले. त्यान माझ बँकेत खात उघडून मला पासबुक दिलं. तुम्ही सगळा घरखर्च करण्यासाठी मला पैसे द्यायचात. दरमहा मी उरलेले पैसे बैंकेत भरायची. मोठी रक्कम झाली की मुदतबंद ठेव करायची.” तिनं माझ्यासमोर पावत्या आणि पासबुकं ठेवली. साडेचार लाख जमले होते. माझ्याजवळ शब्दच नव्हते.
डोळ्यातून अधू गळू लागले. प्रेमान मला जवळ घेत मुक्ता म्हणाली, ‘माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. अस रडायच नाही. खूप थाटामाटात स्वातीचं लग्न करायचं. पण खरं सांगू, स्वाती सासरी जाणार, या कल्पनेनं मीही.’ असं म्हणून तीही रडू लागली. स्वाती सगळे ऐकत होती. तिलाही राहावलं नाही. तीही आम्हा दोघांना येऊन बिलगली. तिनीही आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
अज्ञात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा