शनिवार, १४ जून, २०२५

1974. आईचं ममतेचं मोल

 एका छोट्याशा गावात सरस्वती नावाची एक गरीब पण खूप कष्टाळू आई राहत होती. नवरा अकाली गेला आणि मागे उरला फक्त एकच आधार – तिचा लाडका मुलगा विवेक. सरस्वतीने दिवसरात्र राबून गावातली घरं, शेतं, अंगणं झाडून-लिपून विवेकला शिकवलं. स्वतःच्या गरजा संपवून मुलाच्या शाळेच्या फी भरल्या, जुने कपडे घातले पण त्याला नवे गणवेष दिले.
“माझा बाळ मोठा होईल, ऑफिसला जाईल, गाडीने येईल आणि मग मी शांतपणे घरात बसून चहा पिएन” असा स्वप्नरंग तिच्या डोळ्यांत होता.
वर्ष सरत गेली. विवेक इंजिनीयर झाला. नोकरी लागली, मोठ्या शहरात. सरस्वतीचा चेहरा फुलला. गावातल्या प्रत्येक माणसाला तिने अभिमानाने सांगितलं, “माझा मुलगा मोठा अधिकारी झालाय ! ”
काही वर्षांनी विवेकचं लग्न झालं. बायको आली – शहरी विचारांची, थोडीशी गर्विष्ठ. सुरुवातीला सगळं छान चाललं. पण हळूहळू विवेक बदलू लागला.
आईच्या फोनला “नंतर करतो गं आई…”
आई घरी गेली तर, “हॉटेलमध्ये रूम घे गं आई, थोडं अवघड आहे इथे.”
एक दिवस सरस्वती गावात परत आली – एकटी. हातातली साडी फाटकी, चेहऱ्यावर थकवा, आणि डोळ्यांत पाणी.
शेजारीण विचारते, “अगं काय झालं सरस्वती? एवढ्या लवकर परत कशी आलीस?”
ती न बोलता ओढणीने डोळे पुसते, फक्त एवढंच म्हणते –
“मुलगा तर मोठा झाला गं. पण मुलपण हरवलं त्याचं.”
घर चालवण्यासाठी पुन्हा तिने लोकांच्या घरात काम करायला सुरुवात केली. पाठीला दुखणं, डोळ्यांना कमी दिसणं, तरीसुद्धा ताट धुतली, अंगण झाडली, कपडे वाळत घातले…
एका दिवशी, अंगणात झाडताना ती बेशुद्ध पडली. लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं डॉक्टर म्हणाले –
“ही महिला केवळ थकली नाही. ही आतून तुटली आहे.”
दोन दिवसांनी तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आला. उशीर झाला होता. आई डोळे उघडत होती, शेवटचं पाहायचं होतं. विवेक हात धरतो, म्हणतो.
“आई, माफ कर… मी चुकलो…”
आई थोडं हसते, डोळ्यातून अश्रू येतात आणि म्हणते –
“माझं काही नाही बाळा… पण तुझ्या मुलाला कधी अशी वेळ येऊ देऊ नकोस…”
आणि सरस्वती कायमची झोपी जाते.
“आई कधीच रागावत नाही, ती फक्त मनात खोलवर दुखावते…”
जर ही गोष्ट तुम्हाला भावली असेल, तर तुमच्या आईला एक फोन करून, “आई, तू खूप मोठी आहेस माझ्यासाठी…” एवढं नक्की सांगा.
आणि आपल्या आई दिवसातून एक तरी फोन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...