सोमवार, २३ जून, २०२५

2006. २३० रुपयांचे मॅनेजमेंट

 दीपकच्या खिशात फक्त २३० रुपये होते आणि भूमी त्याला पहिल्यांदा भेटायला येत होती...
फोनवर दोघांनी वचन दिलं होतं, एकत्र लंच करू, आइसक्रीम खाऊ आणि सिनेमा पाहू...
दीपक लायब्ररीत बसून अभ्यास करत होता, तेवढ्यात भूमीचा मेसेज आला,
"कुठे आहेस?"
तो उत्तरला – "लायब्ररीत आहे..."
ती म्हणाली – "मी आलीय... गांधी पार्कमध्ये बसलेय, तुझी वाट पाहतेय..."
दीपक लायब्ररीतून बाहेर निघताना व्यवस्थित चेहरा झाकून पार्ककडे गेला.
तिथे पोहचल्यावर त्याला एका बाकावर चेहरा झाकून बसलेली एक मुलगी दिसली.
तो गेला आणि विचारलं, "येणार का?"
ती चिडली, "काय रे हरामखोर, घरात आई-बहिण नाहीत का?"
..ती भूमी नव्हतीच 😅 दीपक बिचाऱ्याची फजिती झाली..😄
इतक्यात खरी भूमी आली, आणि त्या मुलीची माफी मागितली, तेव्हाच गोंधळ शांत झाला.
ते दोघं बाहेर आले, भूमी दीपकच्या अवस्थेवर हसत होती...
भूमी म्हणाली, "खूप भूक लागलीय, आधी जेवण करूया, मग सिनेमा पाहू."
दीपक म्हणाला, "हो, चल, आज तुला इथलं बेस्ट जेवण खाऊ घालतो."
थोड्याच वेळात ते दोघं हॉटेल मोती पॅलेससमोर पोहोचले.
पण त्याच्या समोरच होतं अन्नपूर्णा रसोई.
भूमी मोती पॅलेसकडे जायला लागली, तेव्हा दीपक म्हणाला,
"अरे नाही नाही, हे फारच खराब आहे..."
(खरं तर तिथे जेवण ५०० रुपयांपासून सुरू होतं, आणि दीपककडे होते फक्त २३० रुपये)
तो तिला अन्नपूर्णा रसोईत घेऊन गेला.
१०० रुपयात दोघांनी जेवण केलं आणि २० रुपयांचं  ताक घेतलं.
भूमीला हे सगळं थोडं विचित्र वाटत होतं.
पहिल्याच भेटीत असं कोण अन्नपूर्णा मध्ये जेवायला घेऊन जातं?
आता आली आइसक्रीमची वेळ... बाहेरच एक कुल्फीवाल्याची गाडी दिसली.
दीपक म्हणाला, " भावा, एक २० वाली आणि एक १० वाली कुल्फी दे..."
२० रुपयाची कुल्फी भूमीला, आणि १० रुपयाची स्वतः खात राहिला.
मग सिनेमा बघायची वेळ आली. मार्केटमध्ये एक दुकान होतं, जिथे पेनड्राइव्ह/मोबाईलमध्ये सिनेमा टाकतात.
तो तिला घेऊन गेला आणि विचारलं, "कुठला सिनेमा बघायचाय?"
भूमी म्हणाली , "रांझणा!"
दीपकने ५० रुपये काढून दिले आणि म्हणाला,
"भाऊ, मोबाईलमध्ये 'रांझणा' टाक – पण HD क्वालिटीमध्ये हं!"
भूमी त्याच्या या स्टाईलवर हसत होती.
दीपक १० रुपये वाले २ पॉपकॉर्नचे पॅकेट्स घेऊन आला.
गांधी पार्कमध्ये बसून ते दोघं मोबाईलवर सिनेमा पाहू लागले.
सिनेमा बघता बघता दीपक म्हणाला –
"आणखी काही इच्छा आहे का? सांग."
भूमीला खूप काही बोलायचं होतं, पण ती शांत राहिली...
दीपक म्हणाला,
" मान्य आहे की मी सध्या बेरोजगार आहे, पण मी मेहनत करतोय.
एक दिवस मी नक्की सरकारी नोकरी मिळवीन. आणि त्या दिवशीच तुझ्या आईवडिलांकडे तुझा हाथ मागायला येईन.
तू माझ्याशी लग्न करशील का?"
भूमी हसून म्हणाली,
"जर तू सरकारी नोकरी मिळवली नाहीस तरी मी तुझ्याशीच लग्न करीन.
कारण तुझं मॅनेजमेंट मला खूप आवडलं.
जेव्हा तू बिल भरण्यासाठी पॉकेट काढलेस तेव्हा मी पाहिलं होतं की तुझ्याकडे फक्त २२५ रुपये आहेत.
माझ्याकडे काही पैसे होते, पण मला   जाणून घ्यायचं होतं की तू त्या २३०  रुपयांत दिलेली वचनं कशी पूर्ण करतोस.
जर तू कुणाकडून उधार घेतली असतीस, तर मला ते खटकलं असतं.
पण तू त्या पैशांमध्येही मला आनंदी ठेवण्यासाठी काही कमी केलं नाहीस."
मग ती म्हणाली,
"मिस्टर दीपक, आता तुम्ही मला विचारणार नाही का, 'भूमी, तू माझ्याशी लग्न करशील का?' "
दीपक हसून म्हणाला –
"अगं हो, नक्कीच!"
आणि या आनंदावर काही गोड होऊ द्या म्हणून, ५ रुपयांची डेअरी मिल्क घेऊन दोघांनी एकमेकांना खाऊ घातली...
...आणि तरीही त्याच्याकडे अजून ५ रुपये उरले होते ! 😄💖
एक साधी पण मनाला स्पर्श करणारी प्रेमकहाणी...
किंमत नव्हे, भावना महत्त्वाच्या असतात. 💕

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...