परवा एका जागेच्या व्यवहारासाठी वकीलांकडे गेलो होतो. दिवाळी असल्यामुळे कार्यालयात स्टाफही नव्हता आणि ग्राहकही. त्यामुळे गप्पा रंगल्या. ते म्हणाले, "वाडवडीलार्जीत इस्टेटीची भांडणे म्हणजे डोक्याला ताप असतो. त्या भांडणातून फायदा कोणाचाच होत नाही. कारण एकाच्या बाजूने निकाल दिला की दुसरा पुढे अपील करतो, त्या निकालानंतर पराभूत होणारा आणखी वरच्या न्यायालयात जातो. पैशाचा आणि आयुष्यातील बहुमूल्य वर्षांचा अपव्यय पण भावंडाना शेवटपर्यंत लक्षात येत नाही. त्यापेक्षा एकदाच एकत्र बसून मार्ग काढा, ती संपत्ती तुम्हाला सुख देईल. पण नाही प्रत्यक्ष न्यायाधीशासमोर मारामारी करणारी भावंडे पहिली आहेत. अरे, पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती आणि भांडताय तुम्ही ! जी संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागला नाही, त्या संपत्तीचे वाटप करताना झाले थोडे इकडेतिकडे तर काय बिघडले ? भावाबहिणीचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे रक्षाबंधन किंवा भाऊबीज या सणाला कळत नाही तर रजिस्ट्रारच्या कार्यालयात कळते पण लोक मूर्ख असतात त्यामुळे वर्षानुवर्षे खटले तुंबतात आणि आमची घरे चालतात." वकीलसाहेब प्रांजळपणे सांगत होते. पण त्यांनी सातारच्याच एका कुटुंबाचे उदाहरण दिले आणि लक्षात आले की नाती अगदीच तकलादू उरलेली नाहीत. सातारच्या एका कुटुंबात एक भाऊ आणि सात बहिणी. वडील अकाली निवर्तल्यानंतर भावाने सर्व बहिणींची जबाबदारी घेतली. स्वतःचा संसार सांभाळून त्यांची शिक्षणे केली आणि लग्नेही करून दिली. सर्व बहिणींनी त्याची जाणीव ठेवून राहता वाडा भावाच्या एकट्याच्या नावे करून दिला. कालांतराने सर्वजण म्हातारे झाले तसा वाडाही म्हातारा झाला. ती जागा बिल्डरला द्यायचे भावाने ठरवले. जागा आता त्याच्या मालकीची असल्यामुळे त्याला कोणाची परवानगी लागली नाही. पण भावाने येणा-या रकमेचे समान आठ भाग करून प्रत्येकाच्या नावे वेगळा चेक काढायला बिल्डरला सांगितला. त्याचे म्हणणे असे की, मी रहात होतो, म्हणून बहिणींनी जागा माझ्या नावावर केली. पण आता मला यातून प्राप्ती होतेय, मग त्यात बहिणींचा वाटा आहेच, तो मी देणार. सात बहिणींपैकी चारजणी जिवंतही नव्हत्या. मग त्यांच्या वारसांच्या नावे चेक काढायला त्याने सांगितले. सर्वाना एकत्र बोलावल व ज्याचे त्याचे चेक ज्यालात्याला दिले. पुढे काय घडावे ? सर्वांनी ते चेक त्याच्यासमोर फाडून टाकले आणि सांगितले की दादा, तुम्ही आमच्यासाठी इतके केलंय, की आता जर ही संपत्ती तुमच्याकडून घेतली तर बाबा स्वर्गातून आम्हाला रागावतील. आम्हाला फक्त तुम्ही हवे आहात, ती संपत्ती नको." जगात अशीही भावंडे असतात म्हणजे ज्या दिवशी त्या लोकांनी चेक फाडले तोच दिवस खरा भाऊबीजेचा. भेटायला हवे त्या कुटुंबाला एकदा.
नमस्कार.. माझे नांव अर्जुन कृष्णात पाटील. हा ब्लॉग फक्त माझा नसून ज्ञात आणि अज्ञात लेखकांचा आहे. मला व्हाट्सअप, फेसबुकवरून जी माहिती मिळाली ती जशी आहे तशी येथे दिली आहे. सर्वप्रथम मी ज्ञात आणि अज्ञात लेखकांची माफी मागतो. कारण वेळेअभावी त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मी काही लेख येथे पब्लिश केले आहेत. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. कारण त्यांच्यामुळेच हा ब्लॉग पूर्ण झाला आहे. ह्या ब्लॉगवरील माहितीवर माझा कोणताही हक्क नसून ही माहिती गरजू व्यक्तींपर्यंत पोहचावी हाच फक्त उद्देश आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2900. निशब्द
आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...
-
DB नावाने ओळखले एक एक शिक्षक आहेत. ते माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा तालुका गावापासून पाच किलोमीटर दूर होती. त्य...
-
60 वयाच्या पुढील सर्व भाग्यवान जेष्ठ नागरिक जोडप्यांना खूप खूप हार्दीक शुभेच्छा* 🌹🙏 🙋 🙋♂ दांपत्य दिनच्या निमित्ताने एक सुंदर कवित...
-
माझं नुकतंच लग्न झालं होतं, त्यावेळी भोसरी एमआयडीसी मधील मॉरिस नामक एका कंपनीत मी हेल्पर म्हणून कामाला होतो. (आता त्या कंपनीचे नाव बदलले आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा