मनोजची गाडी जोरात धावत होती. प्रचंड पाऊस. रस्ता अनोळखी. आजूबाजूला कोणी दिसत नाही..वस्तीचा नामोनिशाण कुठेही नाही...तोस्वतः गाडी चालवत होते...मागे त्याची मीरा वेदनेने कळवळत होती...तिला सहन होत नव्हते...पोटातले बाळ आता बाहेर येण्यासाठी धडपडत होते....धावणाऱ्या गाडी बरोबर पोटातल्या कळांची पण धावण्याची तेवढीच चढा ओढ सुरू होती.
आतल्या एसी मध्ये सुद्धा मनोज घामाने निखळत होता.
तरी आईने सांगितले होते, पावसाचे चिन्ह आहे सोबत मीरा 9 महिन्याची गरोदर आहे..उद्या सकाळी निघ..आज दुपारी निघू नकोस पण ऐकेल तो मनोज कुठला.!
डिलिव्हरी पुण्यातच!
माझे बाळ पुण्यातच जन्म घेणार..सगळे ठरलेले..
रात्री 10च्या आत त्याला हुबळी ला पोचायचे होते.
हुबळीला हॉटेल स्वाती मध्ये राहायचे, सकाळी उठून तिथला डोसा खायचा आणि मग पुण्याला निघायचे...दुपारी 4 वाजता पुण्यात गाडी टच....
सगळे कॅलक्युलेशन मनात फिक्स.
बरोबर 4 वाजता त्याने बेल्लारी सोडले...मागे मीराला निवांत झोपता येईल अशी सोय करून तो निवांत गाडी चालवायला बसला.
हॉस्पेट आणि कोप्पाल पर्यंत रस्ता, गाडी आणि गप्पा
सगळेच वेळेवर झाले.
कोप्पालला बरोबर साडे सहा वाजता मनोज ने गाडी कॉफी साठी थांबवली.
स्टीलच्या छोट्याशा भांड्यात मस्तपैकी साऊथ इंडियन कॉफी घेऊन त्याचे एक एक घोट सीप करायला मनोजला भारी आवडायचे. त्याचे पाहून मीरा पण साऊथ इंडियन कॉफीच्या प्रेमात. नाहीतर मीराला चहा खूप आवडायचा. आले घातलेला वाफाळत्या चहाचा कप मीरा समोर आला की झाले मीरा चे मन खुश! पण हा मनोज पक्का कॉफी प्रेमी. लग्नानंतर यांचे चहा आणि कॉफी वरून बरेच वाद व्हायचे...पण मनोजने अनेक ठिकाणी जाऊन तिला वेगवेगळी कॉफी प्यायला लावली...त्यातून कॉफीचा निस्सीम चाहता असल्याने ही कॉफी किती छान, ह्यात काय वैशिष्ट्य आहे , अरेबिका, रोबस्टा, चिकोरी मिक्स , डार्क कॉफी, चिकमंगळूर ची कॉफी असे अनेक विषय तो कॉफी पिताना बोलायचा....त्याच्या ज्ञानाचा पगडा मिरावर पडायला लागला आणि तीही कॉफी वाली झाली.
त्यामुळे आता कॉफी पक्की होती फक्त एक कप की दोन कप घ्यायची असे विचारायचे असायचे...!
अंधार पडायला सुरुवात झाली होती ...15 मिनिटांच्या हॉल्ट नंतर ते पुढे जायला निघाले आणि अचानक पावसाने त्यांना गाठले. तिकडचा पाऊस हा धो धो वाला...रस्ता फुटावरचा ही दिसेना..पावसामुळे GPS चालत नव्हते आणि रेंज ची वांदावांद होती. हळूहळू गाडी चालवत मनोज पुढे जात होता आणि अंधारात त्याचा रस्ता चुकला.
भाणापूर वरून 'गदग'सरळ होते आणि याची गाडी उजवीकडे वळली. अर्थात त्याला तो रस्ता चुकला आहे असे वाटले सुद्धा नाही. पावसात गाडी चालवत हा पुढे जात होता....आणि खराब रस्त्याला सुरुवात झाली.
खड्ड्यातून जाताना हा अगदी हळू चालवायला लागला आणि त्यामुळे वेळेचा अंदाज चुकत होता....
रस्ता बऱ्याच ठिकाणी खणला होता...मागच्या आठवड्यात तो गाडी घेऊन आलेला तेव्हा रस्ता खूपच उत्तम होता...एका आठवड्यात या रस्त्याला काय झाले असे विचार करत असताना त्याला 'येलबुर्गा'चा बोर्ड दिसला.
तो बोर्ड पाहून त्याच्या लक्षात आले की तो रस्ता चुकला आहे. खड्ड्यातून परत जाण्यापेक्षा हाच रस्ता पकडून पुढे जाऊ असा विचार करत त्याने गावात गाडी घातली.
पावसामुळे रस्ते सुनसान झालेले तरी गावात एक दोन दुकाने चालू होती...त्याने गाडीतूनच विचारले, "हुबळीला कसे जायचे?"
तो माणूस तोडक्या मोडक्या हिंदीत बोलला, गजेंद्रगड वरून डावीकडे वळून तिथून पुढे जा!
त्याने पावसात गाडी चालवायला सुरुवात केली आणि 5 मिनिटात त्याला रस्त्यावर फक्त त्याचीच गाडी दिसायला लागली.
पाऊस थांबायचे नाव घेईना आणि याला रस्त्यावर कोणी दिसेना.
एका मोठ्या खड्ड्यातून गाडी धाडकीनी आपटून आली आणि मीरा जोरात ओरडली. त्याने घाबरून पाहिले तर मीराला जोरात जर्क लागला होता. त्याने गाडी थांबवली आणि तसाच पावसात मागच्या सीटवर गेला...मीराला पोटाला जोरात धक्का बसल्यामुळे तिचे ओरडणे सुरू झाले होते...तिचे कळवळणे पाहून मनोज च्या पायाखालची जमीन हादरली....
आता मागे जाता येत नव्हते आणि पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता...
त्याने तिला धीर दिला आणि जागे राहायला सांगितले...
गाडी सुरुवात करून त्याने जसा रस्ता दिसेल तशी चालवायला सुरुवात केली....
त्याच्या आईचे बोलणे त्याला आत्ता आठवले...उद्या सकाळी निघता आले असते...अश्या स्थितीत मीरा ला घेऊन हुबळी किंवा बेळगाव पर्यंत पोचणे फार आवश्यक होते...
नेटवर्क कुठेच येत नव्हते...रस्ता कळत नव्हता...आता त्याला मोठ्या शहराशिवाय थांबायचे नव्हते... सुडी नावाच्या एका छोट्या गावाला त्याने मागे टाकले...एकदा विचार केला की इथे थांबावे पण इथे काही सोयी नसतील तर परत पुढेच जावे लागेल हा विचार करून तो गाडी चालवायला लागला...
"मीरा, तू जागी राहा...झोपू नकोस..." एकीकडे गाडी चालवत तो तिला म्हणाला...
जसे जमेल तशी ती जागी राहायचा प्रयत्न करत होती पण पोटात वेदनेचा डोंब उसळला होता...
मनोजची गाडी जोरात धावत होती...आजूबाजूला वस्ती नाही...रस्ता अनोळखी आणि अश्यातच त्याची गाडी परत एकदा एका खड्ड्यातून गेली आणि मीरा ने हंबरडा फोडला...
तिच्या आवाजाने त्याचे पाणी पाणी झाले आणि गाडी सावरत सावरत रस्त्याच्या बाजूला थोडी गवतात गाडी घुसून थांबली....
प्रचंड धडधडत त्याने स्टेयरिंग वर डोके ठेवले आणि मागून मिराचा हात त्याच्या खांद्यावर आला...
धाडकीनी उठून त्याने दरवाजा उघडला...तिच्यापाशी जाऊन तिचा हात हातात घेतला...
"आता नाही सहन होत मनोज..." ती प्रचंड खोल गेलेल्या आवाजात म्हणाली...
तिचा आवाज ऐकल्यावर मनोज नखशिखांत हादरला...
तिचा हातावर थोपटत आजूबाजूला बघत असताना त्याला 30 फुटावर एक लाईट दिसला...
नीट पाहिल्यावर त्याला ती छोटीशी झोपडी दिसली...
मीरा ला तिथेच बसवून तो धावतपळत त्या झोपडीपाशी गेला...
झोपडीचे दार त्याने जोरजोरात वाजवले, "कोणी आहे का? ..कोणी आहे?"
आतमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. काही क्षणात दार उघडले..
एक गोरीपान स्त्री, कपाळावर मोठे लाल कुंकू, नऊवारी साडी घालून हसत त्याच्याकडे पाहत होती.
"अम्मा, मदद करो.. मदत करा अम्मा..माझी बायको प्रेग्नंट आहे..तिला बाळ होईल आत्ता... माझी मदत करा...तो कळवळून हात जोडून त्या स्त्रीला म्हणाला"
तिने त्याला शांत व्हायला सांगितले...
"अम्मा म्हणाला आहेस ना...मी बघते काही काळजी करू नकोस.."
ती आणि तो लगेचच गाडीपाशी गेले...मीरा जवळपास बेशुद्ध झाली होती...
त्याने तिला अलगद उचलले आणि झोपडीत आणले...
झोपडीत काही विशेष सामान नव्हते...एक पलंग, एक पिवळा दिवा, बाजूला एक चूल आणि थोडी भांडी, कपडे आणि भाजी मात्र भरपूर दिसत होती...
अम्माच्या सांगण्यावरून त्याने तिला बेड वर ठेवले...
अम्माने एका साडीने पलंग झाकून ठेवला...त्याला एका पातेल्यात पाणी गरम करायला सांगितले...
अम्माने दोन स्वच्छ कपडे घेतले आणि तिला हळूहळू जागे करायला लागली...मीरा जागे होईस्तोवर मनोज च्या जीवात जीव नव्हता...
पाणी गरम झाल्यावर त्याला मीरा ला पहायचे होते...
तशी अम्मा हसली आणि म्हणाली, "थोडे थांब, बायको आणि बाळ दोघांनाही एकत्रच बघ"
"अम्मा, मीरा ला काही होणार नाही ना?"
"होईल ना...बाळ होईल छानसे!" अम्मा हसत म्हणाली...
अम्माच्या आश्वासक बोलण्यामुळे तो थोडा शांत झाला...
पण त्याची चुळबूळ काही थांबेना...शेवटी अम्माने त्याला बाहेर वाट पाहायला सांगितले...
बाहेर कोसळणारा पाऊस आणि आतून येणाऱ्या मिराच्या किंकाळ्या याने मनोज प्रचंड घाबरला होता...मीरा किंवा बाळाला काही ,आले असते तर तो स्वतःला कधी माफ करू शकला नसता..
हातातल्या मोबाईलला रेंज अजूनही आली नव्हती.
बराच वेळ अस्वस्थेत गेल्यावर आतून एकदम बाळाच्या रडण्याचा आवाज आला...
त्याचे डोळे लकाकले...आत शिरून एकदम त्याने विचारले, "अम्मा?"
"हो हो आले आले..."
साडीरुपी पडद्याच्या आत काहीतरी हालचाल जाणवली आणि क्षणात एका मऊ कपड्यात गुंडाळलेले एक गोरे गोरे बाळ घेऊन अम्मा बाहेर आली...
"मुलगी झाली..." असे म्हणून अम्मा ने त्याच्या हातात बाळ दिले...
बाळाला हातात घेतल्यावर, एवढा वेळ संयम ठेवलेला तो मोठ्याने रडायला लागला...
आपल्या पोटच्या जीवाला पहिल्यांदा हातात घेऊन पाहत असताना त्याचे रडणे थांबत नव्हते...
अम्मा शांतपणे हसत त्याच्याकडे बघत उभी होती...
"अम्मा, मीरा कशी आहे?"
"एकदम छान आहे...दमली आहे....थोड्या वेळाने बरे वाटेल तिला"
तो बाळाला अम्मा कडे देऊन मीरा कडे गेला...मीरा डोळे उघडून त्याचीच वाट पाहात होती...
तिचा हात घट्ट पकडून तो रडायला लागला....
"सॉरी मीरा, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला... आय ऍम सॉरी मीरा..."
त्याच्या रडण्याला न अडवता तिने त्याच्या हाताला थोपटले ...तसा तिच्याही डोळ्यातून पाणी टपकलेच...
दोन क्षण असे गेल्यावर त्याने अम्माला हाक मारली...
अम्माने साडी सरकवली आणि हसत हसत बाळाला मीरा कडे दिले...
मीरा बाळाला पाहत असताना मनोजने उठून अम्माच्या पायावर डोके ठेवले...
"अम्मा,आज तुमच्या मुळे 3 जीव वाचले आहेत...किती आभार मानू मी तुमचे..."
अम्मा नुसतीच हसली आणि म्हणाली, कडक भाकरी, दही, भाजी, लोणचे चालेल ना?"
अम्माचे बोलणे ऐकून तो उठला आणि म्हणाला, "हो अम्मा खूप भूक लागली आहे."
अम्मा ने त्याची थाळी मांडली आणि तिच्यासाठी गरमागरम खिचडी टाकली...
खाता खाता तो बोलायला लागला,
"मागच्या आठवड्यात माझ्या वडिलांची तब्येत खूप बिघडली म्हणून आम्ही बेल्लारी ला आलो... मीरा ला आणायचे नव्हते पण ती म्हणाली, भेटून घेते एकदा! नंतर काही रुखरुख नको.."
येताना सगळे ठीक झाले..वडिलांची तब्येत पण बरी आहे आता. 2 दिवसांपूर्वी हिला 9 महिने पूर्ण झाले आणि मी विचार केला की आता पुण्यात जाऊन डिलिव्हरी करूयात....
आम्ही निघालो...आज रात्री हुबळीपर्यंत पोचायचे होते आणि उद्या सकाळी निघून पुण्याला...रात्री गाडी चालवणार नव्हतोच...पण कसा रस्ता चुकलो काही कळले नाही.....
"आणि इकडे आलास.."अम्मा हसत म्हणाली...
"अम्मा, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर...कसे फेडू?"
"काही उपकार वगैरे नाहीत...हे सगळे विधिलिखित होते"
त्याचे पोटभर जेवण झाल्यावर अम्माने मिराला खिचडी खाऊ घातली...
आईचे दूध पिऊन बाळ शांत झोपले होते...पाऊस पण कमी झाला होता...
"तू पण झोप आता.…इथे पलंगाच्या बाजूला मी तुझ्यासाठी चादर घालते...साडी बाहेरून लावली आहे त्यामुळे तुम्हाला तिघांनाही झोप छान येईल,गरज आहे तुम्हाला विश्रांतीची...उद्या उजाडले की, शहरातील एका हॉस्पिटलमध्ये जा"
त्याने मान डोलावली आणि अम्माने घालून दिलेल्या चादरीवर डोके ठेऊन तो झोपला...मीरा ने सुद्धा खिचडी खाल्ली होती..अतिश्रमामुळे ती पण लगेच झोपली.
...
कोणीतरी मोठमोठ्याने बोलत आहे असे आवाज त्याला ऐकू यायला लागले...त्याने डोळे उघडले तर दोन तीन अनोळखी चेहरे त्याच्या कडे पाहत होते...
बाहेर उजाडलेले दिसत होते....तो एकदम धाडकन उठून बसला...बाजूच्या पलंगावर मीरा आणि बाळ अजून झोपलेलेच होते.
"काय झाले...?" त्याने विचारले..
"कुठले पाहुणे तुम्ही......?"
"पुण्याचे..का काय झाले?"
"पुण्या सारख्या मोठ्या शहरात राहणारे तुम्ही मग माझ्या शेतात झोपडी का बांधली हो?"
"म्हणजे? काय बोलताय तुम्ही?"
"माझ्या शेतात एका रात्रीत झोपडी बांधली आणि संसार थाटला...हे बोलून राहीलो मी"
"काय वेडेपणा आहे हा?...अम्मा कुठे आहे?"
"तुमची अम्मा पण आहे का? त्या कुठे आहेत ते आम्हाला काय माहिती?"
"या झोपडीत एक अम्मा होती...त्यांनीच तर माझ्या बाळाची डिलिव्हरी केली..."
हे ऐकल्यावर तो माणूस जरा चक्रावला...
त्याने मनोजचा हात धरून त्याला बाहेर आणले...ते एक शेत होते...दूरवर नजर टाकेल असे हिरवेगार शेत...
आजूबाजूला एकही झोपडी नव्हती...रस्त्याच्या त्या बाजूला त्याची गाडी दिसत होती...
इथे अश्या ठिकाणी झोपडी कुणी बांधणे तार्किक दृष्टीने पटणारे नव्हते...
आता हे पाहून मनोज चक्रावला...
त्याने सगळी हकीकत त्या माणसांना सांगितली...ते ऐकल्यावर तो माणुस जमिनीवर बसला आणि त्या जमिनीला नमस्कार करू लागला...
मनोज अजूनही संभ्रमात होता...त्याने दुसरया माणसाला विचारले की, " हा असे का करतो आहे"
दुसऱ्या माणसाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला सांगितले, "तुम्हाला माहिती आहे का या गावाचे नाव काय आहे?"
"नाही.." मनोज म्हणाला...
"चोलचगुडड...!"
मनोज त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागला...
"चोलचगुडड..…बदामी"
"बदामी" म्हणल्यावर क्षणभर मनोजच्या डोळ्यासमोर आजूबाजूचे सगळे गर्रकन फिरले...
तो तसाच खालती बसला आणि जमिनीतील मातीला आपल्या आसवांचा अभिषेक करायला लागला...
"बदामीची- बनशंकरी देवी"....त्यांचे कुलदैवत...इतके वर्षे कर्नाटक मध्ये येणे व्हायचे पण बदामीला जाणे व्ह्यायचे नाही...आई खूप वेळा म्हणायची आपल्या कुलदेवता ला जाऊन ये पण मनोजचा काही योग आला नाही...काल या पावसात, अंधाऱ्या रात्रीत आजूबाजूला कोणी नसताना, साक्षात देवी आली...अम्मा बनून...बनशंकरी अम्मा...आपल्या मदतीला...आपल्या बाळाच्या मदतीला..."
त्या विचाराने मनोजच्या अंगावर क्षणभर शहारा आला...
देवीने आपल्या बाळाला या जगात आणले... तिने मीराला आणि आपल्याला वाचवले...
धावत जाऊन त्याने मीराला उठवले...सगळे सांगितले...मीराच्या डोळ्यातील पाणी सुद्धा थांबेना...
बाहेर जाऊन त्या लोकांच्या मदतीने त्याने गाडी झोपडीपर्यंत आणली...बाळाला आणि मीराला दोघांना गाडीत नीट बसवले...त्या लोकांचे आभार मानून तो गाडी चालवायला बसला....केवळ 9किमी वर बनशंकरी देवीचे मंदिर होते....त्याच्या डोक्यात विचार सुरू झाले....
बन म्हणजे वन आणि शंकरी म्हणजे पार्वती.... या रानावनात धावून आलेली माझी देवी...गाडी चालवताना सुद्धा त्याच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते...
मंदिरात पोचल्यावर त्याने बाळाला हातात घेतले आणि मीराला हळूच हात धरून मंदिरात नेले....
देवीच्या तेजस्वी रूपाकडे पाहत असताना त्याला देवीच्या चेहऱ्यात अम्मा दिसायला लागली....
गाभाऱ्यात त्याचे सगळे अष्टसात्विक भाव गळून पडले आणि त्याने बाळाला देवीच्या पायावर ठेवायला गुरुजींकडे दिले....
देवीची मुद्रा प्रसन्न दिसत होती आणि बाळ सुद्धा हसत होते....
मंदिरातूनच त्याने आईला फोन लावला आणि सांगितले,
"आई, तू आजी झालीस... आपल्याकडे मुलगी आली...."
आईने सांगितले तिचे नाव "शांभवी" ठेव...शांभवी म्हणजे 'शाकंभरी'.... आपल्या बनशंकरी देवीचे रूप...!
त्याने झरकर्न वळून देवीकडे पाहिले...देवीच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला अजूनच प्रसन्न भासले.
'आई' आणि 'अम्मा' दोघींचेही आशिर्वाद त्याला मंदिरात मिळाले होते. त्या क्षणी जगातील सर्वात 'प्रफुल्लित' व्यक्ती होता तो.
©®अमित मेढेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा