आई : कसा आहेस बेटा?
मुलगा : तू माझ्याकडे अशी चौकशी केली ना..
आई : काय होतं?
मुलगा : मला टेन्शनच येतं.
आई : का बरं?
मुलगा : कारण तू आधी हसत हसत अशी चौकशी करते आणि मग..
आई : मग?
मुलगा : मग मला मनसोक्त झापते.
आई : अरे, कर नाही त्याला डर कशाला?
मुलगा : तेही आहेच.
आई : चुकलंय का तुझं काही?
मुलगा : नाही.
आई : नक्की ना?
मुलगा : हो, तू मागे सांगितल्याप्रमाणे..
आई : काय?
मुलगा : मी आता कुणाच्या वयावरून, व्यंगावरून किंवा लिंगावरून आक्षेपार्ह कमेंट करत नाही.
आई : शहाणं माझं बाळ ते.
मुलगा : काय झालंय?
आई : आता तुझं ते बंद झालंय आणि..
मुलगा : आणि काय?
आई : आणि दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं सुरू केलंय.
मुलगा : म्हणजे?
आई : धनश्री वर्मा ही युजवेंद्र चहलची कोण आहे?
मुलगा : बायको आहे त्याची.
आई : तू तिच्या फोटोखाली परवापासून कमेंट काय करतोय?
मुलगा : श्रेयस अय्यर भैय्या कसे आहेत, हेच विचारलं.
आई : तिला का विचारलं?
मुलगा : त्यांचं अफेअर सुरू आहे.
आई : तुला कुणी सांगितलं?
मुलगा : तू इतर कमेंट वाच ना, सगळे तेच म्हणत आहेत.
आई : सगळ्यांनी विहिरीत उडी मारली, मग तूही?
मुलगा : आई..
आई : राग आला?
मुलगा : अरे पण त्यांनी सोबत रील बनवलं होतं.
आई : तूझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला किती वर्षे झाली?
मुलगा : ५ वर्षे झाली.
आई : तुझे दाजीही किरकोळ आहेत ना तब्बेतीने?
मुलगा : हो.
आई : ताईने मागे तिच्या ऑफिसमधील एका हँडसम मुलासोबत रील बनवलेलं.
मुलगा : हो.
आई : मग काय तिचंही त्या मुलाशी अफेअर सुरू आहे?
मुलगा : काहीही नको बोलू.
आई : अरे लोक म्हणत आहेत सगळे.
मुलगा : मूर्ख असतील ते लोक.
आई : का बरं?
मुलगा : माझ्या बहिणीला मी चांगलं ओळखतो. ती असं काही करू शकत नाही.
आई : मग धनश्री करू शकते?
मुलगा : ते तिला माहित.
आई : अरे त्या धनश्रीलाही तुझ्यासारखा भाऊ, माझ्यासारखी आई असेल ना?
मुलगा : हो.
आई : त्यांना तुमच्या कमेंट वाचून काय वाटत असेल?
मुलगा : वाईट वाटत असेल.
आई : मग हे सुरू असलेलं योग्य आहे?
मुलगा : नाही.
आई : उद्याला तिचा आणि युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाल्यावरच, तुमच्या मनाला समाधान मिळणार का?
मुलगा : नाही.
आई : मग यापुढे वाईट कमेंट करताना किंवा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडवताना दहावेळा विचार कर.
मुलगा : चुकलो, माफ कर.
आई : अरे एका चुकीला माफी असते.
मुलगा : म्हणजे?
आई : 'द ग्रेट खली' काल बाप बनला.
मुलगा : हो.
आई : त्याच्या फोटोखाली तू काय कमेंट केली आहे?
मुलगा : नाही आठवत.
आई : काल लिहिलेली कमेंट नाही आठवत?
मुलगा : विसरलो.
आई : तू प्रश्न विचारलाय की, त्याची बायको जिवंत आहे का?
मुलगा : हो.
आई : त्याच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी, तुझे एवढे वाईट विचार?
मुलगा : विनोदाने विचारलं.
आई : म्हणजे?
मुलगा : तो आकाराने एवढा मोठा आहे म्हणून..
आई : अरे जनाची नाही, पण मनाची तरी लाज बाळग.
मुलगा : का?
आई : तूझ्या कमेंटने कुणाचं मन दुखावणार नाही, याची तरी काळजी घे.
मुलगा : पण हे सेलिब्रिटी आमच्या कमेंट वाचत नाहीत.
आई : म्हणून तुम्ही काहीही बरळणार?
मुलगा : आई..
आई : राग आला?
मुलगा : हो.
आई : मागे एका मराठी अभिनेत्रीने समुद्र किनाऱ्यावरील तिचा फोटो अपलोड केला, तर..
मुलगा : तर काय?
आई : त्यावर तू कमेंट केली की, ही मराठीची सनी लिओनी.
मुलगा : हो.
आई : का रे बाळा?
मुलगा : ती तसेच कपडे घालते.
आई : तू तिचा पॉर्न मूव्ही पाहिलाय?
मुलगा : नाही.
आई : मग उचलली जीभ लावली टाळ्याला?
मुलगा : असं नाहीये..
आई : मग कारण काय ती कमेंट करण्याचं?
मुलगा : सगळे तसच म्हणतात.
आई : इतरांनी शेण खाल्लं, मग तूही खाणार?
मुलगा : आई..
आई : अरे हातात मोबाईल आहे, म्हणून काहीही कमेंट करायची का?
मुलगा : नाही.
आई : किमान माणूस म्हणून समोरच्याच्या मनाचा तरी विचार करा.
मुलगा : कळतंय.
आई : आपण कुणाच्या फोटोवर काय कमेंट करतोय, याचं भान असायला हवं की नाही?
मुलगा : असायला पाहिजे.
आई : एक कायम लक्षात असू दे..
मुलगा : काय?
आई : तुझी साधी एक कमेंट एखाद्याचा सुखी संसार मोडू शकते किंवा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
मुलगा : हो.
आई : तुम्ही लोकांनी या द्वेषाच्या आगीला आताच आवरलं तर ठीक..
मुलगा : नाहीतर?
आई : नाहीतर उद्याला तूझ्या बहिणीच्या, बायकोच्या किंवा आईच्या फोटोवरील आक्षेपार्ह कमेंट वाचण्याचीही तयारी ठेव.
मुलगा : चुकलो. यापुढे कमेंट करताना दहावेळा विचार करेल.
आई : गुड.

©️अक्षय भिंगारदिवे,
१८ नोव्हेंबर २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा