कुठेतरी थांबवा आता
भरल्या घरातून जाणं.
थोडी कुरबुर झाली म्हणून
पटकन left होणं.
भरल्या घरातून जाणं.
थोडी कुरबुर झाली म्हणून
पटकन left होणं.
अभासी दुनिया असली तरी
माणसं जिवंत आहेत.
रक्ताची जरी नसली तरी
नाती प्रेमळ आहेत.
ताई ,दादा,आत्या , मावशी
शब्दांना अर्थ नाही का ?
ग्रुप मधले बाकी कुणीच
सांगा तुमचे नाही का ?
माणसं एकत्र आली की
कुरबुरी या होणारच.
कधी माझा ,कधी तुमचा
एखाद्याला राग येणारच.
राग आला म्हणून कोणी
घर सोडून जातं का ?
"आपल्या" ग्रुप मधून असं
left कधी होतं का ?
लहान असा ,मोठं असा
थोडा संयम ठेवत जा.
कमी जास्त झालं तरी
डोकं शांत ठेवत जा.
खूपच मन दुखावलं तर
मौनव्रत धरायचं.
एकही शब्द न बोलता
डोळ्यांनी प्रेम करायचं.
ज्याची त्याला एक दिवस
नक्कीच चूक कळत असते.
चुकणा-याचे मन त्याला
आतल्या आत छळत असते.
अशा वेळेस पुढे होऊन
पटकन माफी मागायची.
तोच विषय डोक्यात ठेऊन
कशाला रात्र जागायची ?
मला जसं वाटतं तसंच
सगळ्यांनीच वागावं.
अशी भूमिका घेतल्यावर
इतरांनी कसं जगावं ?
सर्वांचा आदर करा
ताण नका घेऊ.
माझ म्हणणं एवढंच आहे
left नका होऊ.
एक दिवस सगळ्यांनाच
इथून left व्हावचं लागतं.
मनांत असो किंवा नसो
स्वर्ग रथात जावं लागतं.
आहे तोपर्यंत नीट रहा
वादावादी नको.
गोकुळावर रुसवा धरून
निघून जाणे नको.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा