बुधवार, १२ मार्च, २०२५

1781. हसत रहा... मजेत रहा

 सत्यघटना...आवडण्यापेक्षा जर खरच हसू आले असेल तर नक्की रिप्लाय द्या.. 🙏🏻
माझे सासरे , म्हणजे आमचे अण्णा ज्यांना आम्ही आमच्या घराची शान मानतो. अण्णा रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत. ८२ वर्षांचे आमचे अण्णा या वयातही एखाद्या तरूणाला लाजवेल इतके उत्साही आणि फेशियल केलेल्या एखाद्या तरूणीला लाजवेल इतकी तुकतुकीत shining स्किन आहे. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्वाचे आमचे अण्णा त्यांची हिरो होंडा स्पलेंडर गाडी इतक्या सुसाट स्पीडने पळवतात की रोडवर कोणी ओळखीतल्याने पाहिले तर तो सदम्यात जातो आणि माझ्या नव-याला कॉल करतो की अण्णा इतक्या घाईत कुठे जाताय रे भो...(हे नेहमीचेच झालेले आहे आता😄) 
गाडीचा हॉर्न वाजवून टर्न इतका स्टायलिश घेतात अण्णा की जशी एखाद्या हिरोची शुटींग सुरूय...😄
फक्त कानांनी हारले आमचे अण्णा... कर्णयंत्राशिवाय ऐकायला येत नाही. पण ते लावायचा कंटाळा करतात त्यात घरातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू बद्दल डिटेल माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे... 
आमच्या घरातील कॉमन इव्हेंट म्हणजे अण्णांनी कर्णयंत्र न लावता आमच्या तोंडाजवळ त्यांचा कान आणून ॲ sss ॲsss करत खोदून खोदून गोष्टी विचारणे...आणि आईंनी शांत पणे खूणेने अण्णांना सांगणे की आधी कर्णयंत्र लावा बर 👉🏻...
किचन पासून सर्व ठिकाणी मी मदत करणार यासाठी धडपडणारे त्यात ऐकू न येणे यावरून घरात इतके अती कॉमेडी सीन होतात की हसावे की रडावे कळत नाही.... जसे की मी किंवा आईंनी विरजण लावलेले दूध फ्रीजमध्ये ठेवून देणे...आणि वरून सकाळी सांगणे की रात्री तुम्ही दोघींनी दूध वरच ठेवले होते मी ठेवले फ्रीजमधे.... 😅😅
असाच एक प्रसंग...
खूप दिवसापासून मला लाईट वेट, मुलायम, कमफरटेबल व्हाईट कलरची सिगारेट पॅन्ट हवी होती की जी फॉर्मल आणि पार्टीवेअर दोन्ही प्रकारच्या टॉपवर चालेल. माझ्या अटी शर्तीच्या नादात 2-3 व्हाईट पॅन्टी घेवून पडल्या होत्या. पण मी समाधानी नव्हती. केव्हा कापड बारीक वाटायचा, केव्हा घातल्यानंतर थोड्या वेळाने पायांना  uneasy होऊन यायच तर केव्हा लुकच नीट दिसत नसायचा... ब्रॅंडेड कंपनीची पण घेवून पाहिली पण ती ही मला जमलीच नाही. 
दुकानाच्या मालाच्या खरेदीला जातांना सुरतलाही खूप शोधली पण निराशाच आली.
एव्हाना माझ्या नव-याच्याही लक्षात माझी शोधमोहीम आली होती. 
त्यामुळे ते एक वेळेस सीएसटी ला गेले तेव्हा फॅशन स्ट्रीट वरून मला हवी होती तशी  सिगारेट पॅन्ट आणली... 
माझे अहो dressing sense आणि कपड्यांचे  knowledge मधे expert आहेत. त्यांनी आणलेली सिगारेट पॅन्ट खरच मला हवी तशीच होती त्यामुळे मी खूप खुश झाले. ती घालून एक दोन फंक्शनला गेले तर खूप जणी कडून तिची विचारपूस झाली..वाहवा झाली... मला पण फारच कमफरटेबल फील झाले त्यात. त्यामुळे मी तिला आता फारच जपून काळजीपूर्वक वापरू लागले. धुवायला पण आमच्या कपडे धुणा-या ज्योतीताईंकडे न टाकता मीच माझ्या हाताने नीट धुवायची.
अशातच आता गेल्या फेब्रुवारी महिन्यात माझ्या सासुआईंना चिकुनगुनिया डिटेक्ट झाला, त्यांची ट्रीटमेंट गावातच सुरू केली. ॲडमिट न करता दररोज सकाळ संध्याकाळ सलाईन लावण्यासाठी आई सोबत हॉस्पिटल मधे  माझं जाण सुरू झाले. 
सकाळी साडेआठ वाजेशी घरातील सर्व काम आटोपून आईंना घेऊन मी निघत असे. जायच्या आधी धुवायचे कपडे सर्फमधे भिजत घालून जायची. एके दिवशी अण्णा म्हटले की माझे ड्रेस टाक आज धुवायला. अण्णा पांढरे ड्रेस ..कुर्ता पायजमा आणि त्यावर गांधी टोपी वापरतात. मी अण्णांचं कपडे सर्फमधे टाकले....सोबत मी माझी व्हाईट सिगारेट पॅन्ट आणि ऑरेंज ओढणी कलर लागू नये म्हणून कोरड्याच वेगवेगळ्या बाजूला ठेवल्या. 
त्या दिवशी आईंना ॲन्टिबायोटिकच्या चार सलाईन गॅप गॅपने दिल्या...आणि त्यांना जरा चक्कर पण येत होते म्हणून आम्हाला हॉस्पिटलमध्ये वेळ झाला. 
दुपारचे 2 वाजेला आम्ही सासूसुना रिक्षेने दारी आलो... मला रिक्षेतूनच माझी आवडती सिगारेट पॅन्ट दोरीवर वाळतांना दिसली आणि तीला पाहून मी चक्क रिक्षेतून बाहेर उडीच मारली... कारण माझ्या स्वप्नातील सिगारेट पॅन्ट चे एक तंगड व्हाईट आणि एक तंगड ऑरेंज झालेल होतं...पण आईंनाही रिक्षेतून उतरवायचे होते... आता आईचे चक्कर मला येत होते...आईंचा हात धरून त्यांना पकडून घरात नेताना दोरीवरील पॅन्टकडे पहात पहात मी तवा देत देत घरामधे गेली. 
आईच्या पण लक्षात आले.. त्या खोल आवाजात म्हणाल्या ज्योतीने धुतांना ओले कपडे एकमेकांवर ठेवले असतील म्हणून असे झाले. मी ठरवले उद्या ज्योती ला विचारतेच जाब... 
अण्णा नेहमीप्रमाणे कर्णयंत्र काढून खुर्चीवर बसले होते. माझ्या चेह-यावरून त्यांच्या लक्षात आले की काहीतरी झालेय. 
ते उठून आले आणि माझ्या तोंडाजवळ कान आणून म्हटले काय झालं... मी म्हटले ती माझी  ओढणीचा रंग पॅन्ट ला लागला.. 
अण्णांना ऐकू आले नाही... मग नेहमी प्रमाणे अण्णा - ॲ sss ॲsss
आई- खुणेने 👉🏻
कर्णयंत्र लावल्यावर मी सांगितले की ती व्हाईट पॅन्ट खराब झाली...
अण्णा  खुदकन हसून म्हटले की अरे मला वाटल की तू घाईत हे कपडे कोरडेच पडू दिले बाजूला म्हणून मीच ते बादली मध्ये भिजत घातले तर ओढणीचा रंग लागला त्या पॅन्टला... बर ते जाऊ दे तुम्ही जेवण करून घ्या न दोन्ही. मी दह्याच मसाला ताक करून फ्रीजमध्ये ठेवलेय ते घेण्याची आठवण ठेव... 
हसाव की रडाव...आता मी सदम्यात होती...😄
( पिक्चर अभी बाकी है..) 
जड मनाने जेवण करून मी आईंना गोळ्या दिल्या...व मी पण माझ्या खोलीत लेटायला गेली... युट्युब वर कापडावरील स्टेन निघण्याचे उपाय शोधत बसली. 
पाच वाजता खोलीतून बाहेर येवून मी चहा ठेवला ... आईंना संध्याकाळ च्या सलाईन द्यायला पुन्हा हॉस्पिटल ला न्यायचे होते. अण्णांनी व्हरांड्यात खुर्ची वर वाळलेले कपडे ओढून आणले होते... चहा उकडते तो वर मी कपड्यांच्या घड्या करून घेतल्या...
चहा पितांना लक्षात आले की सर्व कपडे होते माझी सिगारेट पॅन्ट ती दिसली नाही... सहज चहा पिता पिता बाहेर जावून दोरीवर पाहिले तर हातून कपच निसटला...माझी एक तंगड व्हाईट एक तंगड ऑरेंज वाली सिगारेट पॅन्ट आता डार्क जांभळ्या कलरची होवून दोरी वर लटकत होती. 
अण्णा होतेच माझ्या मागे... हसून मला म्हणता मी माझ्या कपड्यांना निळ मारली तर म्हटले की या पॅन्ट ला पण निळ मारू... जरा डार्क मारली म्हणजे तो ऑरेंज कलर दाबला जाईल. 
मी फक्त म्हटले अण्णा काय केले तुम्ही हे..मी काही तरी जुगाड केला असता... आता तर पुर्णच वाया गेली ती पॅन्ट... असे म्हणून मी जरा रागातच घरात वळले... 
 पाठीमागून अण्णा म्हणता... काय म्हणते काय माहित... मोठ्याने पण बोलत नाही पोर. 
हॉस्पिटलला जातांना रस्त्याने आईंना सांगितले की आई ती पॅन्ट आता जांभळी झालीय... आई त्राण नसतांना ही हसू लागल्या... मी पण हसले. 
वाळल्यानंतर आता त्या पॅन्ट च एक तंगड जांभळे आणि एक तंगड ऑरेंज प्लस जांभळा मिक्स होवून हिरवट शेवाळी रंगाच दिसत होतं... 
दुस-या दिवशी सकाळी सकाळीच अण्णा त्यांच्या काल धुतलेल्या कपड्यांना प्रेस करत होते. शेजारी खुर्ची वर ती वाळलेली पॅन्ट होती. मी ती उचलायला लागली तर... लगेच अण्णा म्हटले.. अरे ती राहू दे... मी तिला गरम तुरटीच्या पाण्यात भिजत घालणार आहे... सर्वा रंग निघून जाईल... 
माझ्या आधीच आई अक्षरश: ओरडून  म्हटल्या तुम्ही राहू द्या आता..अजून रंगबिरंगी होईल ती पॅन्ट... 😠
आईचा अविर्भाव पाहिला...पण ऐकू न आल्याने अण्णा आईच्या तोंडाजवळ कान नेऊन ॲssss ॲssss काय म्हणती... 
आई म्हटल्या अरे देवा... 👉🏻
आणि मी - 🤣🤣🤣🤣
अहोंना ही गम्मत सांगतली तर ते म्हटले रंगपंचमी येत आहे. म्हणून अण्णांनी ती आधीच रंगीत बनवून दिली. जाऊ दे next time मी तशा ४-५ आणून देतो.. जीव अडकवू नको त्यात. ☺️
 
हसत रहा...मजेत रहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...