मंगळवार, १८ मार्च, २०२५

1794. मितवा

      दुपारचे बारा वाजुन गेले. अनुजा कॉफी शॉपमध्ये नचिकेतची वाट पाहत बसली होती. तेवढ्यात त्याचा मेसेज आला .."ट्राफिक मध्ये अडकलो आहे थोडा लेट होईल अजून." तिने स्क्रीन ऑफ केली आणि पुनः विचारचक्रात गुंतली. काय झाल होत असं कि आपल्याला नचिकेत बद्दल एवढी चीड यावी. का आपण असे वागत आहोत त्याचयासोबत? की आपलंच काही चुकत आहे. तीन वर्ष झाली लग्नाला आत्तापर्यंत एकही तक्रार नव्हती दोघांमध्ये आणि अस अचानक आपण त्याला ब्रेकअप कल्यासारखं तुटक वागावं. पूर्वी तर असं नव्हतं.
नचिकेत एक सिम्पल स्मार्ट ,हॅंडसम मुलगा. कॉलेज मध्ये असताना तोंडओळखच होती. येता जाता थोडं फार बोलणं व्हायचं. एवढंच काय ते. मग अचानक एके दिवशी जेव्हा अनुजा साठी स्थळ शोधन चालू होत तेव्हा याच स्थळ सांगून आलं. घरचनाही तो पसंत पडला आणि त्या दोघांची पूर्वीपासून ओळख असल्यामुळे अडथळा तो काहीच नव्हता. दोघांकडून होकार मिळाला. साखरपुड्याच्या तारीख पक्की झाली. १५ फेब्रुवारी.
     आता या दोघानापण एकमेकांबद्दल ओढ लागली. मग काय रात्रंदिवस फोन, गप्पा, messages आणि हो त्यांची नेहमीची भेटण्याची जागा "डे फॉर यू कॉफी शॉप " तिथे या दोघांचा कसा वेळ जायचं कळायचाच नाही. एक दिवस नचिकेत ने तिला साखरपुड्याच्या आदल्या दिवशी भेटायला बोलावले. ती आली आणि तिथेच चक्क गुढग्यावर बसून त्याने तीला प्रोपोस केलं आणि एक सुंदर अशी चैन गिफ्ट केली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचा गालावरची लाली अजून लाल झाली. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा साखरपुडा अगदी आनंदात पार पडला .
सगळे आवर्जून त्या दोघांच्या आई बाबांना सांगत होते "लक्ष्मी - नारायणाचा जोडा आहे." सगळ्यांची अशी वाहवा ऐकून त्यांचे मनहि तृप्त झाले. नचिकेत नवरा म्हणून अनुजाला खूप जपायचा. तिची काळजी घ्यायचा, मग लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाचा वेळी सगळ्याना होते तशीच धडधड, भीती अनुजालाही वाटत होती पण नचिकेत असल्यामुळे तिला थोडा धीर आला. लग्न करून दोघे नचिकेतच्या घरी आले . तिथे अनुजाचे जंगी स्वागत झाले.
मग नचिकेतचा बहिणींनी, आणि मित्र-मैत्रिणींनी मिळून त्यांच्यासाठी खास अशी रोमँटिक पने रूम सजवून ठेवली होती. अनुजा तर लाजून लाल झाली खूप. तिने हळूच रूम चा दरवाजा ढकलला आणि आत पाहिलं तर "सगळीकडे कॅण्डल्स लावून ठेवलया होत्या ..गुलाबांचा पाकळ्यानी पूर्ण बेड सजवला होता. हार्ट शेप च फुगे, त्यांचा दोघांचं नावाचा उषा. डेअरी मिल्क कॅडबोरी, दूध. .." हे सगळं बघून तीला खूप छान वाटलं. थोड्या वेळाने नचिकेत आला. त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याला पाहून ती लाजली. त्याने तिचा जवळ येत तिला मिठीत घेतलं आणि ती त्याचा मिठीत केव्हा विरघळली तिलाही नाही कळलं.
     हळूहळू दिवस पुढे सरकत होते. दोघांचा संसार सुखाचा चालू होता. एकमेकांची काळजी घेणे. थट्टा .मस्करी, outing सगळं कस सुरेख होत. नचिकेत चा वाढदिवस जवळ आला होता. काय करावं बर. काहीच सुचेना. हा आपण हॅण्डमेड काहीतरी करूयात. असं म्हणून ती कामाला लागली. तिने नचिकेत बद्दल तिला काय वाटत हे सगळं एका ग्रिटींग कार्ड मध्ये लिहिलं आणि त्याचसाठी एक छानसा केक ऑर्डर केला. उद्या त्याचा वाढदिवस म्हणताना आज रात्री १२ वाजता तिने त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं. तो आज लवकर झोपला. तिनेही झोपायचं नाटक केलं आणि साडेअकरा ला उठून सगळी रूम सजवली. बाराचा ठोक्याला तिने त्याला उठवलं आणि ओरडली "हैप्पी बर्थडे..." मग केक कटिंग झालं. तीन मग त्याला तिने बनवलेलं ग्रीटिंग दिल. नचिकेत खूप खुश झाला. ते दोघंही एकमेकांशिवाय कोठेही जात नसत. सतत ऐकमेकाची काळजी घेत असत. खूप प्रेम होत त्यांचं.
     आता लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. बघता बघता एक वर्ष कस सरल दोघांनाही नाही कळलं. हा पण तीच ओढ अन तेवढंच प्रेम अजूनही होत. जसा वेळ सरत गेला तस ते busy होऊ लागले. वेळ पुरेनासा झाला .दोघे एकमेकांचा सहवासासाठी तळमळू लागले. कधी एकदा सुट्टी मिळते व त्याना निवांत वेळ मिळतो असं झालं होत. एकदाची सुट्टी मिळाली कि ती ते दोघे आनंदात घालवत. पण कामाचा लोड वाढू लागला अन दोघेही त्या गर्तेत अडकले गेले. मग चिडचिड ,राग वाढायला लागला. पूर्वीसारखा वेळ मिळाला कि तो भांडण कारण्यामधे अथवा एकमेकांना दूषण देण्यात जायचा. कधी काळी सहवाससाठी आसुसलेले ते एकेमकांकडे पाठ करून झोपू लागले. अनुजा तर फार रडायची. काय होत आहे. का चुकत आहे सगळं हेच तिला कळत नव्हतं. जेवढं ती सावरायला जायची तेवढाच पसारा परत करून ठेवायची. घरातला आणि मनातला दोन्हीही. मधेच तिच्या एका जिवलग मैत्रिणीला भेटली ती. तिने काय कस चालू आहे लव्ह बर्ड ची स्टोरी असं विचारल्यावर तिला हुंदके आवरता आले नाहीत आणि ढसाढसा रडली ती. तीला guilt पण वाटत होत आणि राग पण. तिचा मैत्रिणीने तिला शांत केलं आणि विचारलं काय झालं.
"तिने रडत रडतच तिची कहाणी मांडली." तिचा मैत्रिणीला यात दोघांचीही चूक वाटली. "पण म्हणून काय झालं चुका सुधारता येतात आणि त्यासाठी कोणीतरी एकाने पुढाकार घेणं गरजेचं असत. कारण जर संवाद नव्हे सुसंवाद संपला तर गैरसमज होतात. एकमेकाना ग्राह्य धरण्यापेक्षा आपण थोडं झुकलो तर कुठे काही बिघडत. उलट अशाने जर नातं अजून घट्ट होणार असेल तर सुरुवात हि करायलाच हवी."
तिने अनुजाला सुचवलं की आता फेब्रुवारी महिना चालू आहे तू नचिकेत ला वॅलेंटिने डेचा दिवशी तुमचा त्याच कॉफी शॉपमध्ये भेट अन त्याला परत एकदा प्रोपोस कर जस त्याने तुला साखरपुड्याच्या अगोदर केलं होत.
"ग्रेट आयडिया आणि हो त्याचसाठी त्याला आवडणार जे जे तुला माहितेय ते घेऊन जा. अनुजाला जरा बर वाटलं. काहीतरी विचार केल्यासारखं ती उठली आणि तडक गिफ्ट शॉप मध्ये गेली. तिने त्याच आवडीचा रंगाचा शर्ट घेतला. चोकोलेट्स. ग्रीटिंग. गुलाबांचा गुच्छ .एवढं सगळं घेऊन ती घरी पोहोचली. तिने ते सगळं तीच्या कपाटात लपवून ठेवलं आणि वाट बघू लागली नचिकेतच्या येण्याची. तो आला त्याने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं, जेवण केलं आणि झोपला .तस तीच विचारचक्र परत चालू झालं. "उद्या येईल न हा. हो येईलच का नाही येणार. एवढं झालं तरी त्याच प्रेम नाही कमी झालं माझ्यावरच. थोडे रुसवे फुगवे होतात एवढाच." असं म्हणून ती खुद्कन गालात हसली आणि त्याच्याकडे पाहत पाहत झोपी गेली आणि उद्याचा उजाडण्यारा दिवसाची वाट पाह लागली.
     इकडे नचिकेत ट्रॅफिक मध्ये अडकला होता. काय करायचं म्हणून तो आजूबाजूचा परिसर न्याहाळायला लागला. समोरचे काका ट्राफिक जॅम असताना उगाचच बडबड करत होते आणि हॉर्न देत होते. घाई असावी कदाचित. शेजारी ऑटोमध्ये बसलेली मुलगी सारखं हातातल्या घड्याळाकडे पाहत होती अन स्वतःचा लुक नीट करत होती. बहुतेक आज त्याला भेटण्यास अधीर असावी. तो मनातच हसला. अजून एका साईडला एक छोटी ,गोड मुलगी ice cream खात उभी होती. तिला पाहून का माहित का पण त्याला तिला जाऊन भेटावं वाटलं. एवढ्या गोड मुलीला भेटण्याची कोणालापण इचछा होईल. तो हळू हळू वाट काढत तिकडे जाऊ लागला. आणि अचानक समोरचा सिग्नल तोडून एक वाहन त्याच्यासमोर आलं .त्याला का करावं हे कळायचं आत तो कोसळला. इकडे अनुजा आता रुसून बसली होती. बर आता दुपार झालं होती. तीने त्याला फोन केला. रिंग वाजून फोन कट झाला. तीला अजूनच राग आला व तडक ती तशीच बाहेर पडली.
    थोडे पुढे गेल्यावर तिला रस्त्यात खूप गर्दी जमलेली दिसली. "कोण पडलं असेल" जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे पण कोणीतरी ओरडलं "अरे इस आदमी को उठाओ."तस तिचा काळीज धस्स झालं. तिला शंका आली. हो नाही म्हणता म्हणता ती गर्दीतून वाट काढून कोण आहे ते पाहायला गेली आणि पुढे पाहताच ती मटकन खाली बसली. तिला काहीच सुचेना. कारण समोर पडलेला नचिकेत होता. लोकांनी ambulance बोलावली आणि ताबडतोब त्याला दवाखान्यात नेले. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिने डॉक्टरांना विचारलं कि काही सिरियस तर नाही ना?
डॉक्टरांनी सांगितले कि "आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू पण मी उगाच खोट नाही बोलणार त्याच्याकडे खूप कमी वेळ उरला आहे."
डॉक्टरांचा या वाक्यावर तिला आता चक्कर येऊ लागली. तिने कसबस स्वतःला सावरलं. ती icu चा बाहेरच उभी होती. खूप वेळ झाला तरी डॉक्टर अजून बाहेर आले नव्हते. तिने मनोमन देवाचा धाव सुरु केला. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी बाहेर येताच नकारार्थी मान डोलावली आणि सांगितले "....तो आता या जगात राहीला नाही."अनुजा चा डोळ्यातून पाणी थांबत नव्हते. एका क्षणात सगळं नाहीस झालं होत .तीच डोक सुन्न झालं. जे झालं त्याचवर तीचा विश्वास बसत नव्हता आणि समोर नचिकेत निपचित पडला होता.
ती त्याच्यासमोर गेली, त्याला पकडून ओरडूपकडून लागली. "नचिकेत उठ ना please. मला बोलायचं आहे तुझ्यासोबत खूप. आजचा दिवस आठवतो न तुला. तू प्रोपोस केलं होतस मला. सॉरी ना रे. एवढं रागावतात का. आज खुप खास दिवस आहे. आज आपल्यातले सगळे गैरसमज दूर होतील. उठ न नचिकेत" बोलत बोलतच ती खाली बसली. वाहणाऱ्या प्रत्येक अश्रुंगणिक तिला नचिकेतची आठवण येत होती. आतापर्यंतचा सगळा प्रवास तिचा डोळ्यासमोरून झपकन गेला. 
     तेवढ्यात ती छोटी मुलगी तिथे आली. आपल्याकडे येताना त्या अंकलला काहीतरी झाले एवढेच तिला माहित होते. आत आल्यावर तिने अनुजाला पाहिले. ती नचिकेत ला उठवत होती. सारखं म्हणत होती मला काहीतरी बोलायचं आहे. तिने कुतुहुलाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली. "आंटी कदाचित उशीर झाला तुम्हाला. अंकल आता झोपले आहेत त्यांना ऐकू नाही येणार. अगोदरच का नाही सांगितलं."
ती चिमुकली बोलली तसा अनुजाचा बांध फुटला. 
"हो ना खरच खूप उशीर झाला आपल्याला. अगोदर हे सगळं कळलं असत तर.पण याची जाणीव पण मला माझा मैत्रिणीने करून द्यावी."
     तिला तिची खूप चीड येत होती. आता बोलून पण नचिकेत परत येणार नाही आणि ती उठली. एका निश्चयाने. नचिकेत चा माघारी आपण त्याची स्वप्न पूर्ण करायला हवीत.
     आज नचिकेत ला जाऊन एक वर्ष झाले. ती परत त्या हॉस्पिटल मध्ये आली. तिथे तिने एक पुस्तकांचा गठ्ठा आणि थोडे देणगीस्वरुप पैसे दिले. हाच तो दिवस ज्यादिवशी माझा नचिकेत मला सोडून गेला. तिचा डोळ्यात अश्रू जमा झाले. त्याचा गेल्यानंतर तिने एक councellor म्हणून काम चालू केलं होत. अनेक दाम्पत्याना एकत्र आणायचं काम ती करत होती. कारण तिने तिचा मितवा गमावला होता आणि त्याची उणीव तिला कायम भासत होती.
"एकमेकांना समजून घ्या. संवाद खूप महत्वाचा असतो. तो नियमित ठेवा. प्रत्येकाला एका पार्टनरची गरज असतेच." असं कित्येक जणांना तिने सांगितलं होत आणि सांगत होती.
कारण " बोलायचं राहून जाऊ नये म्हणून..."

ही गोष्ट आहे मला भावलेली. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा व शेअर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...