बुधवार, १२ मार्च, २०२५

1784. तडजोड

     ती चुकून पुरुषांच्या डब्यात चढली. सडसडीत देखणी. पस्तिशीची असावी. तशी रेल्वेच्या प्रवासाची तिला सवय नसावी हे तिच्या एकूण देहबोलीवरून लक्षात येत होतं. बर ती अडाणी होती का तर असंही नाही ती व्यवस्थित बोलत होती त्यात सर्रास इंग्लिश शब्द वापरीत होती फक्त लहेजा गावाकडचा होता. तिच्या बरोबरची माणसं दुसऱ्या डब्यात चढली आणि घाई गडबडीत ही पुरुषांच्या डब्यात चढली. संध्याकाळी सात साडेसातची वेळ असल्याने घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची रोजचीच तुफान गर्दी होती. त्यात काही लोकांनी तोंड वाजवायला सुरुवात केली. यांना दिलाय ना महिला डबा मग कशाला येतात इथे झक मारायला ? आम्हाला लेडीज डब्यात घुसू देतील का ? तर काही प्रवासी उगाचच तिला धक्का मारून गर्दीत चान्स मारण्याचा प्रयत्न करू लागले. 
   बरं गर्दी एव्हडी मरणाची की ए धक्का मारू नकोस असं तरी ती कोणाला बोलणार? त्यात नेहमीचा दारात उभा राहणारा एक उनाड तरुण  पुढे सरसावला. जेन्ट्स मध्ये का चढलात? ती म्हटली माझ्या काकांचा  इथे मुंबईच्या टाटा हॉस्पिटल मध्ये इलाज सुरु आहे. त्यांनाच बघायला आलोय आम्ही सिन्नर वरून. कल्याणला एका नातेवाईकांकडे उतरलोय. तेही आहेत सोबत पण डबा चुकला थोडासा. त्या मुलाने तिला धीर दिला. पण  तिला धक्के मारण्याची संधी तो सोडत नव्हता. काही मंडळींनी त्याला झापले तर काही मंडळी आपल्याला सुद्धा धक्का मारता येईल का हे पाहू लागली. तिने मात्र फक्त त्या मुलावरच फोकस केला. आता त्याचा उत्साह वाढला त्याने तिच्या समोर दोन हात धरले जणू तिला मिठीत घेतल्या सारखं. थोडक्यात काय तर तिच्या भोवती सुरक्षाकड केलं.  ती शांत राहिली काहीच बोलली नाही. मजल दरमजल करीत गाडी कल्याणला पोहोचली. तो मुलगाही कल्याणला राहत होता. 
     त्याने तिला जमतील तेव्हडे धक्के मारले पण तिचं इतर प्रवाशांपासून रक्षण मात्र केलं. खाली उतरल्यावर त्याला वाटलं पटली ही आता आपण हिला नेवूयात लॉजवर. पण एव्हड्यात तिचे नातेवाईक तिला शोधत तिथे आले. हा मुलगा तर फुल फॉर्ममध्ये आला होता. पण तिच्या नातेवाईकांना पाहून त्याचा चेहरा उतरला. ती जायला निघाली चार पावलं पुढे गेल्यावर ती पुन्हा मागे त्या मुला जवळ आली. 
     त्या मुलाला वाटलं येतेय आता आपल्यासोबत पण ती लेडी अगदी हळू आवाजात त्या तरुणाला म्हटली धन्यवाद मित्रा तू मला इतर अनेक लोकांच्या धक्क्यांपासून वाचवले. तो कसनुसा हसला. पुढे ती म्हटली मी चुकून पुरुषांच्या डब्यात चढली होती. वेळ संध्याकाळची असल्याने प्रवाशांचे धक्के तर बसणार होतेच व याची मला जाणीवही होतीच. पण मग गाडीतल्या अनेकांचे धक्के खाण्यापेक्षा कुणातरी एकाचाच धक्का लागला तर हरकत नाही हे असं मी माझ्या मनालाच बजावलं आणि मजबुरीने तुझ्याशी अघोषित कॉम्प्रोमाईज केलं. मला माहित होतं एव्हड्या गर्दीत तू फक्त धक्का मारण्याशिवाय दुसरं काहीच करू शकणार नाहीस मी करूही देणार नाही. आणि करण्याचा प्रयत्न केला असतास तर तुला याच डब्यातील लोकांनी चांगला चोप दिला असता. मित्रा या गर्दीत मला आई बहिणीच्या नजरेने पाहणारेही अनेक बाप भाऊ होतेच की. तुम्हाला वाटलं मी पटले तुम्हाला. अहो कुणीही चांगल्या घरातली मुलगी अशी पाच मिनिटात पटायला हा काय चित्रपट आहे का? मित्रा हे रिअल आयुष्य आहे. असं म्हणून ती निघून गेली जाता जाता ती त्या तरुणाला म्हटली मित्रा मी प्राध्यापिका आहे आणि तुझ्यासारखी अनेक बिघडलेली मुलं ताळ्यावर आणलीत. ती निघून गेली आणि हा तरुण चांगलाच भानावर आला. आयुष्य छोट्या मोठ्या गोष्टींमधून आपल्याला रोजच नवनवे धडे देत असत. पण काहीजण यातून बोध घेतात तर काहीजण हा अनुभव वाऱ्यावर सोडून देतात. आयुष्यात काहीजणांना अशा अनेक चांगल्या वाईट कॉम्प्रोमाईज कराव्या लागतात. काही मंडळी एसटी, बस, देवळातल्या, शाळा, कोलेजातल्या रांगा अगदी जिथे जमेल तिथे अश्राप मुली बायांना धक्के मारण्याचा चिडवण्याचा अश्लील बोलण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वच तरुण असे नसतात बरे. एकमात्र खरे या प्राध्यापिकेने त्या तरुणाला कॉम्प्रोचा आयुष्यभर पुरेल इतका जबरदस्त अर्थ समजवला होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...