शनिवार, ८ मार्च, २०२५

1761. जागतिक महिला दिन

 महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
    दिनांक ८ मार्च १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रो द्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करने व सुरक्षितता इ. मागण्या केल्या व निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतः च्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो पासही झाला तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
"जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी ! तीच आहे सृजनाची निर्मिती, 
तिच्यामुळे तेवतात दिव्यातील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगतास ती उध्दारी !
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी !
त्यागाची प्रतीक ती शिवबाची जिजाई,
रणांगणांवर लढते जशी
राणी लक्ष्मी,
ज्योतिबांची ती क्रांतिज्योती
सावित्री, 
भीमरावांची सावली
ती रमाई,
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी!
शक्तीपीठ ती नवदुर्गाचे, भक्तीची ऊर्जास्थान,तिच्यामुळे मिळे आम्हां जगण्याचे आत्मभान, 
ती विठूची रुक्मिणी
ती आषाढीची वारी,
नारीमुळे मानवाची आहे
जगभर कीर्ती,
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी ! जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी !
         (२)
तू जिजाऊ, तू सावित्री, 
अहिल्याची तू लेक आहे...
तू कल्पना, तू सुनिता, 
आकाशात तुझी झेप आहे...

तू उषा, तू सायना, 
तू मेरी, तूच मल्लेश्वरी आहे... 
घे आसमानी उंच भरारी 
प्रेरणेचे तू महारूप आहे ...

घरा स्वर्ग बनवी तू 
अन्नपूर्णा तूच आहे...
तुटक्या झोपडीस महाल करी 
हरहुन्नरीचे तू प्रतिक आहे...

अब्रू राखण्या ना कृष्ण आता 
दंड देण्यास ना शिवबा आहे...
 उठ, उठ घे तलवार हाती 
सहनशीलता अन् शौर्याचे तू गीत आहे...

जरी दिसशी नाजूक, सुकुमार तू
इथे कमजोर कोण आहे... 
तूच सकळाची दिशादर्शनी 
अन् विश्वाची तू आस आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...