शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

134. संसार

     एक भगिनी आसपासच्या गावातून रोज हरिमंदिरात भजनाला यायची. रोज भजनाला निघतेवेळी ती शेजारणीला "तू पण भजनाला येतेस का?" असे विचारायची..तिची शेजारीण कधीही तिच्यासोबत कधीही भजनाला आली नव्हती..पण तरीही तिने  विचारीयाचे सोडले नव्हते.. ती भगिनी भजनाला गेली की ही विचार करायची.. रोज रोज भजनाला जाते..हिला काही मुलबाळ,संसार आहे की नाही? संसार करायचा सोडून भजनाला कशी जाते? तिच्या शेजराणीची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची..तिचा नवरा रोज जंगलात जाऊन लाकडे तोडून आणून बाजारात विकत असे आणि मग जे काही पैसे मिळतील त्यावरच रोजचा खर्च भागे.. एके दिवशी त्याची लाकडे विकली गेली नाहीत आणि मग पैसे न मिळाल्यामुळे घरची चूल पेटली नाही..बायका,मुले सर्व उपाशी.. नेहमीप्रमाणे संध्याकाळी त्या भगिनी भजनाला निघाल्या..त्यांनी सवयीप्रमाणे तिला "भजनाला येतेस का म्हणून विचारले" तर त्या दिवशी ही अगोदरच तयार राहिली होती.. हिने विचारायाचा अवकाश, ती पटकन तिच्यामागून चालू लागली..
        जाता जाता रस्त्यात तिची अखंड बडबड चालू होती.. की मी भजनाला बसले तर मला काय मिळेल? एक अभंग म्हटला तर किती पैसे मिळतील? दोघी मंदिरात आल्या..भजन संपल..आई आसनावर डोळे मिटून बसल्या होत्या.. सर्व लोक आईंचे दर्शन घेऊन, प्रसाद घेऊन जात होते.. जेव्हा ती बाई रांगेतून आईंच्या समोर दर्शनासाठी आली तेव्हा आईंनी डोळे उघडले व आई तिला म्हणाल्या "तुला संसार करायचाय का?" ती बाई हो म्हणाली..आईंनी बर म्हणून पुन्हा डोळे मिटून घेतले.. त्या दिवशी प्रसादात तांदूळ होते..तो प्रसाद तिने घेतला..घरी जाऊन भात बनवला आणि तिची मुलं, नवरा सर्वानी मिळुन भात खाल्ला. चमत्कार असा झाला की सर्वांचा भात खाऊन झाला तरी पातेलित तेवढाच भात शिल्लक होता..म्हणजे एका वेळच्या भाताचा तांदूळ प्रसाद म्हणून मिळाला होता तरी तो भात त्यांना दोन वेळा पुरला.. तेव्हा त्या दोघा नवरा बायकोला जाणवले हरिमंदिरात काहीतरी विशेष आहे.. मग दुसऱ्या दिवशी नवरा, बायको,मुले सर्व भजनाला आली..आईंनी सर्वाना उपासनेचे महत्व पटवून दिले आणि नेम घालून दिला.. हळू हळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली..नवीन घर बांधले..मुले चांगली शिकली..त्यांची लग्ने झाली.. मग आईंनी तिला एकदा विचारले की "काय ग तुझा संसार पुरा झाला का?' तेव्हा तीला भरून आले आणि ती रडायला लागली.. समोर साक्षात कृष्ण असताना त्याच्याकडून काय मागायचे ते न कळल्यामुळे आपले आयुष्य आपण वाया दवडले.. मोक्ष मागितला असता तरी तो सुद्धा मला मिळाला असता..गुरूकडून काय मागायचे हे कळायला पण भाग्य लागले..संसार तर सर्वच करतात.. महाराज म्हणायचे की सोन्याचे दुकान टाकून बसलोय पण सर्व लोक तांबे, पितळ च मागतात..सोन मागणारे खूपच कमी लोक असतात..म्हणूनच गुरूंना फार वाईट वाटते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...