आदि आणि
शैलेजा हे
एकाच कॉलेजमध्ये शिकतात.
आदि
हा
शैलेजावर खूप
प्रेम करतो हे
शैलेजाला माहित आहे.
पण
शैलेजाला आदिच्या मैत्रीमध्येसुध्दा काही आवड
नाही.
एक
दिवस आदिच्या या
मैत्रीचा शेवट करण्यासाठी ती
त्याला म्हणते,
“मला माफ कर. मी तुझ्याशी
मैत्री ठेवू शकणार नाही.
कारण तू
खूप
कंटाळवाणी आहेस.
मला
तुझ्यासोबत खूपच कंटाळा येतोय.”
आदि
म्हणाला,
“असं म्हणू नको शैलेजा. मला तुझी मैत्री हवी आहे. ती मी कशी तोडू? कसं सिध्द करु की मी इतकाही कंटाळवाणी
नाही आहे.”
शैलेजा म्हणते,
“ठीक आहे. एक संधी देते तुला. तू मला तुझ्यासोबत
पुढची दहा
मिनिटे रमवू शकलास तर
मी
मैत्री तोडणार नाही.”
तिची ही
अट
तो
स्वीकारतो आणि
म्हणतो,
“ठीक आहे. मी तुला एक प्रेमकथा
सांगतो.”
विशाल नावाचा एक मुलगा होता. आजपर्यंत त्याने कितीतरी प्रेम प्रकरणे केलीत, त्याचे किती ब्रेकअप झालेत हे त्याचं त्यालाच ठावूक नव्हतं. एक दिवस सध्या तो ज्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे ती म्हणजे आशा. तिला विशालच्या ह्या स्वभावाची जेंव्हा माहिती झाली तेंव्हा ती फारच दु:खी झाली आणि तिने विशालशी ब्रेकअप केला. प्रथमच विशालबरोबर कोणीतरी समोरच्या मुलीने ब्रेकअप केला होता. या अगोदर तर विशालच मुलींबरोबर ब्रेकअप करायचा. तो न राहवून आतून खूप हादरला गेला होता. कितीतरी मुलींचे हृदय आपण दुखवलेत. पण एखाद्या मुलीने आपले हृदय दुखवल्यावर जे वाटलं ते वाटणं त्याच्यासाठी खूप नवीन होतं. विशालला जाणीव झाली की आपण आजवर मुलींच्याबाबतीत जे काही केलं ते फारच चुकीचे होते. पण आता माझं खरं प्रेम आशा आहे. आशाला मी हातची जाऊ देणार नाही. तो पुन्हा आशाचा मागे-मागे जाऊ लागतो. तिला माफ कर म्हणत असतो. पण आशाचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो. त्यामुळे ती त्याला भाव देत नाही. पण एक दिवस विशाल आशाला आडवून विचारतो, “आशा काय चाललंय तुझं? मी किती दिवस झालं तुझ्याकडून स्वत:ला सिध्द करण्याची संधी मागतोय, पण तू देत नाहीस. अगं तुच माझं खरं प्रेम आहेस. तूच माझं नशीब आहेस. बाकी कोणी नाही.” आशा म्हणते, “मीच तुझं नशीब आहे ना, ठीक आहे. देते तुला एक संधी. आपण कायम भेटणारी तीन ठीकाणे म्हणजेच एक गार्डन, दोन कॉफीबार आणि तीन समुद्रकिनारा. यापैकी एका ठिकाणी आज संध्याकाळी सहा वाजता मी तुझी वाट पहात असेन. जर मी तुझ्या नशीबात असेन तर यापैकी बरोबर ठीकाणी तू मला भेटशील. बाय.” असं म्हणून आशा तिथून निघून गेली.
संध्याकाळचे साडेपाच वाजतात. तो ही आपल्या प्रेमाचं नशीब देवावर सोडतो. आणि डोळे झाकून एक ठिकाण निवडतो जे त्याच्या मनाला भावणारं असतं. तो वेळेत घरातून बाहेर पडतो. सहा वाजता आशा समुद्रकिनारी त्याची वाट बघत असते. भर वेगाने तो गाडी मारत असतो. पण पुढे एका ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं असतं. तो तिथेच गाडी लावून धावत धावत जाऊ लागतो. शेवटी ठरल्याप्रमाणे तो समुद्रकिनारी पोहचतो. पण तिथे ती नसते. कारण तो पोहोचेपर्यंत सात वाजलेले असतात आणि ती निघून गेलेली असते. पण विशालला वाटतं की कदाचित ती माझ्या नशीबात नाही. ती बाकीच्या दोन ठीकाणांपैकी एका ठिकाणी माझी वाट पहात असेल आणि मी इथे तिची वाट पहातोय. थोड्या वेळानंतर तो दु:खी मनाने नशीबाला दोष देत निघून जातो.
चार
वर्षानंतर :
आज विशालचं लग्न आहे. त्याला चांगली नोकरी आणि चांगला पगार आहे. तो एक चांगला मुलगा असल्याचं त्यानं सिध्द केलंय. कारण आई-वडीलांच्या आग्रहाखातर त्यांच्या आवडीच्या मुलीशी तो लग्न करतोय आणि हो ते ही त्या मुलीला एकदाही न पाहता. आजकालच्या जगात ही बाब खरंच दुर्मिळ आहे. काही वेळानंतर दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडतात. नवरा बायको समोरचा अंतरपाट काढला जातो. तर काय आश्चर्य ! ते दोघे दुसरे-तिसरे कोणी नसून आशा आणि विशालच असतात. एकमेकांना चार वर्षांनी आणि तेही अशा रुपात बघून त्यांचे डोळे आनंदाने भरुन येतात. पण स्वत:ला सावरुन ते एकमेकांच्या गळ्यात आनंदाने हार घालतात. आणि पुन्हा एकदा नशिबाने घडविलेल्या त्या चमत्कारामुळे ते देवाचे खूप खूप आभार मानतात.
आदिने सांगितलेल्या
या
प्रेमकथेमुळे शैलेजा पूर्णपणे मोहून जाते.
तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात.
थोडावेळ ती
स्वत:ला या कथेमध्ये
पूर्णत:
विसरुन गेलेली असते.
ती
डोळे पुसत म्हणते,
“खरंच, आदि तू एका वेगळ्या जगात मला नेलं होतंस. मी खरंच खूप भावूक झाले. मला त्या विशाल आणि आशाला भेटायचे आहे. कुठे मिळतील ते? कधी नेशील मला…”
आदि
म्हणतो,
“ते तुला माझ्या घरी मिळतील. कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. ते माझेच आई-वडील आहेत.”
हे
ऐकून शैलेजाला काय
बोलावे,
काहीच कळत
नव्हतं.
मग
अगदी सुन्न झालं होतं.
खरंच तू
खूप
नशिबवान आहेस.
या
गोष्टीनंतर तर
तुझ्याबद्दल माझ
मत
पूर्णपणे बदललंय.
तुझे ते
आई-वडील मला त्यांची सून म्हणून स्वीकारतील? काय तू मला तुझी जीवनसाथी
म्हणून स्वीकारशील?
पाण्यांनी भरलेल्या डोळ्यांनी तो
होकारार्थी मान
हालवित तिला आपल्या मिठीत घेतो.
आणि
थोडावेळ तसंच ते
एकमेकांची साथ
अनुभवत राहतात.
असं म्हटलं जातं की, जोड्या स्वर्गात
बनतात.
आपण
त्या फक्त जुळवण्याचं काम
करत
असतो.
जर
तुमच्या आयुष्याचा दोर
एखाद्याशी बांधला गेला असेल तर
तुम्ही कितीही दुरावले गेला तरी
तो
दोर
नक्कीच तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो.
विशाल नावाचा एक मुलगा होता. आजपर्यंत त्याने कितीतरी प्रेम प्रकरणे केलीत, त्याचे किती ब्रेकअप झालेत हे त्याचं त्यालाच ठावूक नव्हतं. एक दिवस सध्या तो ज्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे ती म्हणजे आशा. तिला विशालच्या ह्या स्वभावाची जेंव्हा माहिती झाली तेंव्हा ती फारच दु:खी झाली आणि तिने विशालशी ब्रेकअप केला. प्रथमच विशालबरोबर कोणीतरी समोरच्या मुलीने ब्रेकअप केला होता. या अगोदर तर विशालच मुलींबरोबर ब्रेकअप करायचा. तो न राहवून आतून खूप हादरला गेला होता. कितीतरी मुलींचे हृदय आपण दुखवलेत. पण एखाद्या मुलीने आपले हृदय दुखवल्यावर जे वाटलं ते वाटणं त्याच्यासाठी खूप नवीन होतं. विशालला जाणीव झाली की आपण आजवर मुलींच्याबाबतीत जे काही केलं ते फारच चुकीचे होते. पण आता माझं खरं प्रेम आशा आहे. आशाला मी हातची जाऊ देणार नाही. तो पुन्हा आशाचा मागे-मागे जाऊ लागतो. तिला माफ कर म्हणत असतो. पण आशाचा त्याच्यावरचा विश्वास उडालेला असतो. त्यामुळे ती त्याला भाव देत नाही. पण एक दिवस विशाल आशाला आडवून विचारतो, “आशा काय चाललंय तुझं? मी किती दिवस झालं तुझ्याकडून स्वत:ला सिध्द करण्याची संधी मागतोय, पण तू देत नाहीस. अगं तुच माझं खरं प्रेम आहेस. तूच माझं नशीब आहेस. बाकी कोणी नाही.” आशा म्हणते, “मीच तुझं नशीब आहे ना, ठीक आहे. देते तुला एक संधी. आपण कायम भेटणारी तीन ठीकाणे म्हणजेच एक गार्डन, दोन कॉफीबार आणि तीन समुद्रकिनारा. यापैकी एका ठिकाणी आज संध्याकाळी सहा वाजता मी तुझी वाट पहात असेन. जर मी तुझ्या नशीबात असेन तर यापैकी बरोबर ठीकाणी तू मला भेटशील. बाय.” असं म्हणून आशा तिथून निघून गेली.
संध्याकाळचे साडेपाच वाजतात. तो ही आपल्या प्रेमाचं नशीब देवावर सोडतो. आणि डोळे झाकून एक ठिकाण निवडतो जे त्याच्या मनाला भावणारं असतं. तो वेळेत घरातून बाहेर पडतो. सहा वाजता आशा समुद्रकिनारी त्याची वाट बघत असते. भर वेगाने तो गाडी मारत असतो. पण पुढे एका ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं असतं. तो तिथेच गाडी लावून धावत धावत जाऊ लागतो. शेवटी ठरल्याप्रमाणे तो समुद्रकिनारी पोहचतो. पण तिथे ती नसते. कारण तो पोहोचेपर्यंत सात वाजलेले असतात आणि ती निघून गेलेली असते. पण विशालला वाटतं की कदाचित ती माझ्या नशीबात नाही. ती बाकीच्या दोन ठीकाणांपैकी एका ठिकाणी माझी वाट पहात असेल आणि मी इथे तिची वाट पहातोय. थोड्या वेळानंतर तो दु:खी मनाने नशीबाला दोष देत निघून जातो.
आज विशालचं लग्न आहे. त्याला चांगली नोकरी आणि चांगला पगार आहे. तो एक चांगला मुलगा असल्याचं त्यानं सिध्द केलंय. कारण आई-वडीलांच्या आग्रहाखातर त्यांच्या आवडीच्या मुलीशी तो लग्न करतोय आणि हो ते ही त्या मुलीला एकदाही न पाहता. आजकालच्या जगात ही बाब खरंच दुर्मिळ आहे. काही वेळानंतर दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडतात. नवरा बायको समोरचा अंतरपाट काढला जातो. तर काय आश्चर्य ! ते दोघे दुसरे-तिसरे कोणी नसून आशा आणि विशालच असतात. एकमेकांना चार वर्षांनी आणि तेही अशा रुपात बघून त्यांचे डोळे आनंदाने भरुन येतात. पण स्वत:ला सावरुन ते एकमेकांच्या गळ्यात आनंदाने हार घालतात. आणि पुन्हा एकदा नशिबाने घडविलेल्या त्या चमत्कारामुळे ते देवाचे खूप खूप आभार मानतात.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा