एक छोटा मुलगा टेलिफोन बूथवरुन एक
कॉल
करतो.
तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत
असतो.
मुलगा
: ताई,
तुमच्या घरासमोरील गवत
कापायचे काम
मला
द्याल का?
फोनवरील ताई
: माझ्याकडे गवत
कापणारा आहे…
मुलगा
: मी
त्याच्यापेक्षा कमी
पैशात गवत
कापून देईन,
मला
काम
द्या ना…
फोनवरील ताई
: पण
मी
त्याच्या कामावर समाधानी आहे…
मुलगा
: ताई,
मी
गवत
कापण्याबरोबर फरशी साफ
करण्याचे काम
पण
करेन…
फोनवरील ताई
: नको,
धन्यवाद…
(असं
म्हणून त्या ताई
फोन
ठेवून देतात…)
तेथील दुकानदाराला
त्याची दया
येते व
तो
म्हणतो तू
आजपासून माझ्याकडे काम
कर.
मुलगा म्हणतो,
“नाही नको, धन्यवाद……”
दुकानदार म्हणतो,
“अरे… आता तर तू कामासाठी
एवढी विनवणी करत
होतास,
मग
आता
काय
झाले?”
मुलगा म्हणाला,
“नाही हो काका, त्या ताईकडे गवत कापणारा मीच आहे. पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत की नाहीत हे मला बघायचे होते.
तात्पर्य
:
1. आमीर खान, राहूल द्रविड हे
जन्मापासून परफेक्ट नव्हते.
स्वत:च्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करुन, मेहनत करुन ते परफेक्ट झाले.
2. प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वत: आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास प्रेमाचे फूल कधीच कोमजणार नाही.
3. भारत देशा असा, भारत देश
तसा,
ह्या भारताचे काहीच होणार नाही असं
म्हणत बसण्यापेक्षा आपण
भारतीय संस्कृती व
भारताच्या सिध्दांताप्रमाणे खरोखर वागतो की
नाही व आपण भारतासाठी काय करु शकतो हे पाहणे जास्त जरुरीचे आहे.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा