अकबराच्या दरबारात एक
चित्रकार एकवेळ एक
चित्र घेऊन येतो.
ते
चित्र त्याच्या आयुष्यातील नितांत सुंदर चित्र असते.
तो
सर्वांच्या प्रतिक्रियेची वाट
पहात असतो.
एवढ्यात नऊ
रत्नांपैकी एकजण असे
सुचवितो की,
हे
चित्र चौकात लावून या
चित्राविषयीचा अभिप्राय घ्यावा. त्याप्रमाणे त्याचे हे चित्र चौकात लावले जाते आणि त्या चित्राखाली
“या चित्रामध्ये
जी
चूक
आहे
ते
लिहा किंवा दाखवा”
असे
लिहले जाते.
जाणा-येणारे लोकही ते चित्र पाहून त्यामध्ये
चूक
काढत असतात.
आणि
त्या चित्रामध्ये जो
दोष
आहे
ते
लिहतात.
बघता-बघता ते चित्र संपूर्ण सुचनांनी
भरुन जाते.
त्या चित्रकाराला याचे फार
वाईट वाटले.
तो
खूप
दु:खी झाला. तो ते चित्र घेऊन बिरबलकडे
गेला.
त्याला ते
चित्र दाखवून त्याने सर्व हकीकत सांगून त्यावर उपाय विचारला.
बिरबल म्हणाला की,
असेच एक
दुसरे चित्र काढ
आणि
चित्राखाली लिही की
ज्याला कोणी या
चित्रामध्ये दोष
आहे
असे
वाटेल त्याने तो
दोष
दूर
करावा किंवा त्या चित्रामध्ये दुरुस्ती करावी.
चित्रकाराने बिरबलच्या सांगण्याप्रमाणे केले आणि
ते
चित्र त्या चौकात पुन्हा लावून ठेवले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता
त्या चित्रावर कुठेही फुली नव्हती.
सगळे त्या चित्राची वाहवा करत
होते.
तात्पर्य असे की, ज्याला ज्या गोष्टीचे पूरपूर ज्ञान नसते, तो इतरांच्या चांगल्या गोष्टींना दोष देत असतो. ज्याने प्रसववेदना सोसल्या नाहीत तो इतरांच्या निर्मितीला नाक मुरडून ते कसे चूक आहे हे सगळ्या जगाला ओरडून सांगत असतो. म्हणून आपण एखादी गोष्ट लिहतो किंवा कविता करतो. चित्र काढतो तेंव्हा त्याची निर्मिती करताना आपण फार भावनिक होऊन त्याच्या प्रसववेदना सोसून त्याची निर्मिती करत असतो. म्हणून आपण जे जे किंवा जसं काही लिहू त्यामध्ये इतरांनी कितीही दोष काढोत, आपण आपल्या निर्मितीवर कधीही नाराज होऊ नये किंवा दुसऱ्याच्या प्रतिक्रियेवर स्वत: दु:खी होऊ नये. शेवटी तुमचं साहित्य हे तुमचं आपत्य असतं. त्यामुळे तुम्ही जे लिहता आहात त्या साहित्यावर खूप प्रेम करा. शेवटी लोक हे दोष काढण्यासाठीच असतात. त्याकडे लक्ष देऊ नका. लिहीत रहा. यमक जुळविणे म्हणजे कविता नसून आपल्या भावना प्रामाणिकपणे ओतणे, व्यक्त करणे हा कवितेचा मुख्य उद्देश आहे. हे लक्षात घेऊन साहित्य लेखन करावे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा