ही खूप
खूप
वर्षापूर्वीची दंतकथा आहे.
धनगर मेंढरे चरायला सोडून ढोल
वाजवत बसला होता.
त्याने पाहिलं की
ढोलाच्या आवाजाने एक
हरीणी त्यांचा शेजारी येऊन बसली.
जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप
पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतून अश्रू यायचे.
एक
दिवस गेला…
दोन
दिवस गेले…
तीन…
चार…
पाच…
दिवसांमागून दिवस गेले.
पण
परिस्थिती काही बदलत नव्हती.
धनगर जसजसा ढोल
वाजवायचा ती
हरीणी तिथे येऊन जवळ
बसून रडू
लागायची.
एक
दोन
वेळा धनगराने त्या हरीणीला हकलले देखील पण
जसजशी ती
थाप
ऐकू
यायची ती
पुन्हा त्या आवाजाने तिकडे ओढली जायची.
मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरीणी रडणं थांबवून निघून जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरवात केली. हरीणी पुन्हा जवळ आली. धनगराने हरीणीसमोर हात जोडले आणि म्हणाला, “माझं काही चुकतंय का ग? मी कित्येक दिवस बघतोय. जेंव्हा जेंव्हा मी ढोल वाजवतो तेंव्हा तेंव्हा तू इथे येऊन रडतेस. काय कारण आहे? सांग ना, काही चुकतंय का माझं?” त्यावेळी ती हरीणी म्हणाली, “तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. हे काय वाद्य आहे मला माहिती नाही पण जेंव्हा तुम्ही हे वाद्य वाजवता, यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते. कारण याला जे कातडं लावलय ना ते माझ्या आयुष्याचा साथीदार, माझ्या नवऱ्याचं आहे.” हे ऐकून धनगर निशब्द झाला.
हरीणी पुढे म्हणाली, “माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मृत्यूनंतर
या
वाद्याच्या दुसऱ्या बाजूला माझं कातडं लावा.
कारण या
वाद्यातून मनाला परमोच्च सुख
देणारे संगीत तेंव्हाच बाहेर पडेल जेंव्हा दोन्ही बाजूंनी ढोल
तितक्याच लयमध्ये वाजवला जाईल.
म्हणजेच त्याच्याएवढं दु:ख्ं मला सहन करावं लागेल.”
असं
म्हणून त्या हरीणीने जागीच प्राण सोडले.
दु:खी मनाने त्या धनगराने त्या हरीणीच कातडं ढोलाच्या
दुसऱ्या बाजूला लावलं.
आज तो ढोल वाजवताना
त्या हरीणीच्या डोळ्यांतून पाणी येत
नाही पण
तो
ढोल
वाजवणाऱ्या धनगराच्या डोळ्यांतून मात्र अश्रू दाठून येतात.
कारण जेंव्हा तो
ढोल
दोन्ही बाजूने वाजतो तेंव्हा त्याला वाटतं ते
जोडपं एकमेकांनी बोलून आपलं दु:ख वाटून घेत आहेत ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटून घेतलं होतं.
मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरीणी रडणं थांबवून निघून जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरवात केली. हरीणी पुन्हा जवळ आली. धनगराने हरीणीसमोर हात जोडले आणि म्हणाला, “माझं काही चुकतंय का ग? मी कित्येक दिवस बघतोय. जेंव्हा जेंव्हा मी ढोल वाजवतो तेंव्हा तेंव्हा तू इथे येऊन रडतेस. काय कारण आहे? सांग ना, काही चुकतंय का माझं?” त्यावेळी ती हरीणी म्हणाली, “तुम्ही कोण आहात मला माहिती नाही. हे काय वाद्य आहे मला माहिती नाही पण जेंव्हा तुम्ही हे वाद्य वाजवता, यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते. कारण याला जे कातडं लावलय ना ते माझ्या आयुष्याचा साथीदार, माझ्या नवऱ्याचं आहे.” हे ऐकून धनगर निशब्द झाला.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा