एका मुलगा
आपल्या आई-वडीलांची खूप सेवा करत होता. त्याचे मित्र त्याला म्हणत होते की एवढी
सेवा जर परमेश्वराची केली असतील तर परमेश्वर तुला प्रसन्न झाले असते. परंतु ह्या
सर्व गोष्टीपासून तो अलिप्त राहून आपल्या आई-वडीलांची सेवा तो करत राहिला. एक दिवस
त्याच्या आई-वडीलांची सेवा-भक्तीमुळे परमेश्वर पृथ्वीवर आलेत. त्यावेळी तो मुलगा
आपल्या आई-वडीलांचे पाय दाबत होता. परमेश्वर दरवाज्याच्या बाहेरुन बोलले,
"दार उघड भक्ता... मी तुझी आई-वडीलांच्या सेवेची भक्ती पाहून तुला वरदान
देण्यासाठी आलो आहे." मुलगा म्हणाला, "वाट बघा ईश्वरा... मी आईच्या
सेवेत मग्न आहे." परमेश्वर म्हणाले, "बघ... मी परत जाईन." मुलगा
म्हणाला, "तुम्ही जाऊ शकता प्रभू. मी सेवा मध्येच सोडू शकत नाही."
काही वेळाने त्याने दरवाजा उघडला तर काय बघतोय..... परमेश्वर बाहेर उभे होते. परमेश्वर म्हणाले, "लोक मला मिळविण्यासाठी कठोर तपस्या करतात. पण मी तुला सहजच मिळालो. पण तू मला वाट पहायला लावलीस." मुलग्याने उत्तर दिले, "हे परमेश्वरा, ज्या आई-वडीलांच्या सेवेने तुम्हाला माझ्यापर्यंत येण्यास भाग पाडले त्यांची सेवा मध्येच सोडून मी दरवाजा कसा उघडू शकतो?"
हेच तर या आयुष्याचे तात्पर्य आहे. आयुष्यात
आपल्या आई-वडीलांपेक्षा मोठे असे काही नाही. आपले आई-वडीलच हे आपल्याला हे आयुष्य
देतात. हेच आई-वडील आपल्या पोटावर मारुन मुलांसाठी आपले आयुष्य पणाला लावतात.
याबदल्यात आपले पण कर्तव्य बनते की आम्ही कधीच त्यांना दु:ख देऊ नये. त्यांच्या
डोळ्यांत पाणी कधीच येऊ नये मग परिस्थिती कशीही असो.
काही वेळाने त्याने दरवाजा उघडला तर काय बघतोय..... परमेश्वर बाहेर उभे होते. परमेश्वर म्हणाले, "लोक मला मिळविण्यासाठी कठोर तपस्या करतात. पण मी तुला सहजच मिळालो. पण तू मला वाट पहायला लावलीस." मुलग्याने उत्तर दिले, "हे परमेश्वरा, ज्या आई-वडीलांच्या सेवेने तुम्हाला माझ्यापर्यंत येण्यास भाग पाडले त्यांची सेवा मध्येच सोडून मी दरवाजा कसा उघडू शकतो?"
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा