बुधवार, ११ जानेवारी, २०२३

150. जीवन हे अमूल्य असतं

       10 वाजून 15 मिनिटांची छत्रपती शाहू टर्मिनस लोकल ट्रेन सुटली. धावता धावता तो चढला. कसाबसा गर्दीतून तो आत शिरला. आतमध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्याजवळ होती. तो पूर्णपणे कावरा-बावरा झालेला होता. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधत असावी. बराच वेळ त्यानं पाहिलं. पुढच्या दोन्ही दरवाज्याजवळ येऊन पाहिलं. त्याच्या नजरेत एक भितीएक हुरहूर…… तिच्याबद्दलची काळजी दिसत होती. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली. रुमाल काढून घाम पुसला. लगेच काहीतरी आठवल्यासारखं झालं. त्याने आपला मोबाईल बाहेर काढला. मोबाईल नंबर शोधून लगेच फोन केला. नुसतंच हॅलो हॅलो ऐकू आलं. तिकडून काहीच आवाज येत नसावा. त्याने पुन्हा प्रयत्न केलापण मात्र नाईलाज. शेवटी त्याने शांत राहण्याचा निर्णय घेतला. पण शांत राहूनसुध्दा तो इकडे-तिकडे पाहात होता की ती कुठे बसली तर नाही ना? खरं तर त्याची ही रोजची सवय झाली होती. रोज स्टेशनवर त्याने तिची वाट पाहणे, तिचे ट्रेनमध्ये चढणे, त्याचे तिला पाहणे, रोजचा एकत्र ट्रेनमधला प्रवास. गर्दीतून त्याने तिला दिलेलं स्मित हास्य अन् त्यावर तिनेही दिलेला प्रतिसाद. असं दोघांचं प्रेम वाढत गेलं. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्र करायचा ठरवलं. पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं. घडू नये तसंच घडलं.
     एके दिवशी अचानक ट्रेनमध्ये आरडा-ओरडाबायकांच्या किंचाळ्यामाणसांची गडबडट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपडसारे वातावरण भयानककोणीतरी चैन खेचा, चैन खेचामुलगी पडली. अशा हाका. ट्रेनमधले लोक उठून बाहेर पाहायला लागले. ट्रेन थांबली पण ट्रेन थांबण्याआधीच सारं संपलं होतं. तीच मुलगी ट्रेनमध्ये चढताना पाय घसरुन पडली होती. तिचं शरीर ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधल्या अंतरात अडकलं होतं. काही समजण्याच्या आधीच तिचं आयुष्य संपलं होतं. त्याच्या नजरेसमोर ती त्याला कायमचे सोडून गेली होती. सारे निशब्धहृदयाचे ठोके चुकले. या परिस्थितीत काय करावं. त्याला काहीतरी कळत नव्हतं. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी राहिलेल्या गोष्टींची खबरदारी घेतली. पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासळून गेलं होतं. नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्याकडे पहात राहिला. ती जेंव्हा दररोज अशाच प्रकारे ट्रेनमध्ये चढून येत होती तेंव्हा आल्या आल्यावर तिने मारलेल्या गप्पा, त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले. आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची दयनीय अवस्था पाहून डोळ्यांत आसवांनी आपोआप वाट धरली होती. आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला. त्याच जागी तो एकटात रडत बसला.
     आजपण तो तिची वाट पाहतो. तिकडेचत्याच जागी… 10 वाजून 15 मिनिटांची छत्रपती शाहू टर्मिनस पकडतो. लोकमध्ये चढल्यावर असाच काहीसा तिला शोधत राहतो. आणि नंतर परत सारं आठवून भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो. आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आपल्यावर प्रेम करणारे, आपली काळजी करणारे भरपूर लोक असतात. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकतं याचा विचार करा. घाईआफिससगळ्यांच्याच नशिबी असतं. पण जीवन हे अमूल्य असतं.  ह्याचा विचार करा आणि जपून प्रवास करा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...