मैथिलीचा आज
अठरावा वाढदिवस आहे.
सकाळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं अनामिक पत्र आलं
होतं.
तिने आईशी यावर चर्चा केली होती.
तेंव्हा तिची आई
तिला म्हणाली,
“बाळा, तुझ्या प्रत्येक
वाढदिवशी असलं शुभेच्छा पत्र येत
असतं.
ते
कोठून येत?
कोठ
पाठवतं?
याबद्दल काहीच माहीत नाही.
तिला थोडं विचित्र वाटलं पण
तिने जास्त विचार नाही केला.
बाबांनी आज
तिला वाढदिवसाची भेट
म्हणून मोबाईल दिला होता.
त्यामुळे ती
खूप
खूश
होती.
आज तिला एक संदेश आला होता. त्यात लिहलं होतं, “आय लव यू.” ते तिनं वाचलं. तिला वाटलं आपल्या कोणीतरी फ्रेंडने मस्करी केली असेल. पण विचार केल्यावर तिला थोडा धक्काच बसला कारण तिने अजून कोणालाही मोबाईल नंबर दिला नव्हता. पण तिने त्याकडेही दुर्लक्ष केलं. तिला असे संदेश वारंवार येऊ लागले. पण कोणीतरी आपली मस्करी करतेय म्हणून अशा गोष्टींकडे जातीने दुर्लक्ष करत होती.
काही महिन्यानंतर
कॉलेज पिकनिकला ती
गेली.
पिकनीकचे ठिकाण पावसाळी होते.
त्यावेळी पाऊस पडत
होता.
ती
झाडाखाली थांबून पाऊस जाण्याची वाट
पाहत एकटीच उभी
होती.
तिचा मोबाईल वाजला.
त्यामध्ये एक
संदेश आला
होता.
मैथिली या
झाडाखालून लवकर निघ.
हे
झाड
पडणार आहे.
तिला वाटलं,
याला कसं
माहित की
मी
झाडाखाली उभी
आहे.
म्हणून तिनं दुर्लक्ष केलं.
तिला पुन्हा संदेश आला.
कृपया करुन स्वत:साठी नाही पण माझ्यासाठी
स्वत:वर दया कर आणि इथून लवकर निघ हे झाड आत्ताच पडेल. प्लीज मैथिली. आता याला धडा शिकवायचा
म्हणून तिही तिथेच थांबली.
आणि
थोड्याच वेळात पावसाच्या पाण्याचे त्या झाडाची मुळे खिळखिळी होऊन ते
झाड
पडलं.
अन्
तेही तिच्या अंगावर.
ती
कशीबशी त्यातून उठली तर
समोर एक
तरुण उभा
होता.
ती
म्हणाली,
“तू कोण आहेस?”
तो
म्हणाला,
“मी तुझा गतजन्माचा
प्रेमी आहे.”
ती
म्हणाली,
“हे कसं शक्य आहे?”
तो
म्हणाला,
“कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. ते ग्रिटींग, ते संदेश मीच तुला पाठवत होतो. आपण मागच्या जन्मी एकमेकांवर
खूप
प्रेम करायचो.
पण
घरच्यांनी केलेल्या विरोधामुळे आपण
आम्तहत्या केली.
पण
मी
त्यातून वाचलो.
माझा जीव
कोणीतरी वाचवला होता.
मी
दुसऱ्यांदा जीव
दिला.
त्यात यशस्वी झालो गं.
पण
तू
तोपर्यंत कुठेतरी दूर गेली होतीस. गेलं एक युग मी तुझी वाट पाहतोय. तुझा पुनर्जन्म झाला होता. मी तुला शोधलं याचा मला आनंद झाला. मी कायम तुझ्यासोबत असूनही मला तुझ्याशी बोलायची शक्ती नियतीने मला कधीच दिली नाही. कधीच दिली नाही…” त्याची ही कहाणी ऐकून ती स्तब्ध झाली होती. आता तिला कळलं होतं की हा त्याचा आत्मा आहे. पण तरीही ती त्याच्यावर
खूप
प्रेम करु
लागली होती.
खूपच प्रेम…
ती
म्हणाली,
“मग मला तुझी व्हायची झाल्यास काय करावं लागेल?”
तो
म्हणाला,
“आत्महत्या.”
ते
ऐकताच तीने लगेच समोरुन जाणाऱ्या ट्रकच्या खाली उडी
घेतली.
तो
ट्रक तिच्या अंगावरुन गेला पण
तिला काहीच झालं नाही.
ती
उठली आणि
त्याला म्हणाली,
“मी मरत का नाही?”
“अगं, तू तर आधीच ते झाड अंगावर पडून मेली आहेस. मी माझ्या निस्वार्थ
प्रेमापोटी तुला संदेश पाठवून तुझा जीव
वाचवण्याचा प्रयत्नही केला.
पण
तू
ऐकलंच नाहीस बघ
माझं.
ते
बघ
तुझं मृत
शरीर.”
ते
पाहून तिने त्याला एकदम मिठीच मारली.
किती प्रेम करतोस रे
माझ्यावर.
मला
इथून दूर
घेऊन चल.
तो तिला दूर घेऊन गेलाय… खूपच दूर जिथे फक्त ते दोघेच आहेत एका प्रेम दुनियेत. सांगायचा
मुद्दा एवढाच की
प्रेम करा
पण
त्यामध्ये निस्वार्थपणा असावा.
तुमच्या प्रेमापोटी तुमच्या जोडीदाराचं नुकसान होऊ
नये
याची काळजी घ्या…!!!
आज तिला एक संदेश आला होता. त्यात लिहलं होतं, “आय लव यू.” ते तिनं वाचलं. तिला वाटलं आपल्या कोणीतरी फ्रेंडने मस्करी केली असेल. पण विचार केल्यावर तिला थोडा धक्काच बसला कारण तिने अजून कोणालाही मोबाईल नंबर दिला नव्हता. पण तिने त्याकडेही दुर्लक्ष केलं. तिला असे संदेश वारंवार येऊ लागले. पण कोणीतरी आपली मस्करी करतेय म्हणून अशा गोष्टींकडे जातीने दुर्लक्ष करत होती.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा