मी घरी
पोहचलो.
साडेचार वाजले होते.
हात-पाय धुवून मी एका हॉटेलमध्ये
गेलो.
वडापाव संपवून मी
चहा
घेतला.
तेवढ्यात तिथे एक
50-55 वर्षांची बाई
आली.
डोक्यावर भलं
मोठं जळणाचं ओझं
तिनं बाजूला टाकलंय.
कुठेतरी एखादा काळा केस,
कपाळावरती मोठी कुंकूवाची छटा,
घामामुळे कुंकूवाचा लाल
रंग
भुवईपर्यंत आलेला.
धारदार नाक,
तंबाखूची मसेरीनं काळवंडलेले दात,
सुरकूतलेले हात,
तीन-चार जोड देऊन हातानेच शिवलेलं नववारी लुगड आणि चौही असा काही तिचा वेश होता. नुस्तच कालावाण मिळंल का गं बाई? माझ्याकडं
भाकर हाय.
तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईनं शिळी भाकर काढली आणि
दिलेल्या काळवणावर अधाशिपणान खाऊ
लागली.
मी
विचार करायला लागलो.
आपण
पैसे द्यावे का?
हिला कुणीच नसेल का?
आणि
असेल तर
अशी
वेळ
का
यावी तिच्यावर?
इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत
ती
हॉटेलवाली मुलगी म्हणाली,
“आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार !”
आजी
म्हणाली,
“पोरी , आज पोटभरुन खाईन पण उद्या?”
मुलगी म्हणाली,
“तुम्हाला
मुल-बाळ नाही का?”
त्यावर त्या म्हणाल्या,
“पोरगा मोठा साहेब हाय. परदेशाला
इंजनेर हाय.
पण
त्याला वेळच न्हाय
!”
कानाखाली कोणीतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यंत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि विचारांचं काहूर माजलं. माणूस इतका बदलतो का? आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या या
माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत
नसेल का?
आणि
सगळंच अनुत्तरीत होतं.
माझा चेहरा खाली घालून मी
आता
विचार करीत होतो.
इतक्यात माझ्या पाठीवर तोच
थरथरता हात
फिरला.
मी
वरती पाहिलं तर
तीच
बाई
मला
म्हणाली,
“इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला नीट जप म्हणजे झालं……”
मग
तर
मेल्याहून मेल्यासारखं झालं.
मी
आता
फक्त रडायचाच बाकी होतो.
कारण एका
क्षणात माझं पूर्ण अंतरंग त्या माऊलीनं वाचलं.
पण
आम्हांला आमच्याच आई-वडीलांचं
थोडसं दु:खसुध्दा कधीच जाणता येत नाही. जीवनाच्या
सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर
! कुठं शिक्षण घेतलं असेल यांनी हे.
सेटलमेंट,
न्यू जॉब,
इनक्रिमेंट,
प्रमोशनच्या घोळात आम्ही ही
आमची माणसं कुठ
हरवून बसतो.
आम्हालाच कळत
नाही.
डोक
जड
झालं.
मी
उठलो आणि
चालू लागलो.
शेजारच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत मास्तर मुलांना विचारत होते.
आपण
काय
शिकलो?
मी
मनाशीच उत्तर दिलं,
“आयुष्यात इंजिनीअर नाही होता
आलं तर चालेल पण
चांगला जबाबदार माणूस जरुन
व्हायचं.”
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा