सोमवार, १६ जानेवारी, २०२३

171.आम्हां लोकांत त्यासाठी आधी लग्न करावं लागतं.

         रात्र बरीच झाली होती. आईला खूप ताप आला होता. गेले दोन दिवसांपासून खायला पोटभर नव्हतं मिळालं. मुलीची चिंता वाढत चालली होती. वडील लहान पणीच गेले होते. आईला लवकरात लवकर डॉक्टरजवळ न्यायला हवं. पैसेच नव्हते. तिने मनाशी निर्धार केला. ती रस्त्याने निघाली. समोरुन एक तरुण येताना दिसला. तो कामावरुन येत होता. ती त्याला म्हणाली," मला पैसे हवेत थोडे...." त्यावर विनीत म्हणाला, "कोण तू?" मुलगी म्हणाली, "मला पैसे हवेत. माझी आई आजारी आहे." विनीत म्हणाला, "मी देईन. मग तू परत कसे देशील?" मुलगी म्हणाली, "मी तुझ्यासोबत एक रात्र येईन.???"  विनीत म्हणाला, "काय??? तुझं डोकं-बिक फिरलं नाही ना???" मुलगी म्हणाली, "नाहीच आहे माझं डोक ठिकाणावर ????  वैताग आलाय या जीवनाचा. आई आता आजारी आहे. बाबा लहानपणीच गेले. भाऊ नाही. आईने मला कसंबसं मोठं केलं. आजही हा समाज तसा दळभद्री आहे. एकटी बाई म्हणून लगेच डोळे फुटले. माझ्या आईला मी माझ्या वडीलांपासून नाही झालेली. मी एका नराधमाची मुलगी आहे. तरी माझ्या आईने मला वाढवलं, मोठं केलं. आज तिच आई आजारी आहे. बोल मग मला पैसे देतोस की नाही?? मी उद्या नक्की येईन." मुलगा त्यावर निरुत्तर होतो. तो तिला पाकीटच देतो आणि तसाच निघून जातो. त्या पाकीटातल्या पत्यावर ती मुलगी जाते.
     दुसऱ्या दिवशी मुलगा घरीच असतो. जशी ती मुलगी येते मुलगा म्हणतो, "बाबा हीच ती मुलगी. हिच्यासोबत मला लग्न करायचं आहे. मुलगीचं डोकं चक्रवू जातं. ती मुलाला म्हणते, "पण आपलं वेगळं ठरलंय." मुलगा म्हणतो, "आम्हां लोकांत त्यासाठी आधी लग्न करावं लागतं. करशील लग्न माझ्यासोबत???" मुलीच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात. ती मुलाला आईला दाखवायला घेऊन जाते आणि आईला म्हणते, "आई,  तुला चिंता होती ना माझ्या लग्नाचीबघ हाच माझा नवरा." आई मुलाकडं बघते आणि म्हणते, " चला, मी श्वास सोडायला मोकळी. आयुष्यभर वेश्या म्हणून जगली देवा. माझ्या मुलीला तरी नीट ठेव." आई तिथेच श्वास सोडते. मुलीच्या तोंडात शब्द अडकतात. मुलगा म्हणून जातो, "बर झालं, काल भेटलीस, आज देवाचं दर्शन मिळालं."

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...