बुधवार, ४ जानेवारी, २०२३

121. खऱ्या प्रेमाला वयाचे बंधन नसते

     एका डॉक्टरकडे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षाचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी साडे-आठच्या सुमारास ते डॉक्टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला नऊ वाजता एकीकडे जायचं आहे. डॉक्टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते. आजोबा, नऊ वाजता दुसऱ्या डॉक्टरांना भेटायचे आहे का? त्यावेळी आजोबा म्हणाले, मला नऊ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये जायचं आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले, हॉस्पीटलमध्ये? आजारी आहेत का त्या? आजोबा म्हणाले, हो, गेली पाच वर्षे हॉस्पीटलमध्येच आहे ती. डॉक्टर म्हणाले, अच्छा ! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या?... काळजीही करतील?... नाही डॉक्टरतिला अल्झायममर्स  झालायं. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही. आजोबा शांतपणे म्हणाले. त्यावर डॉक्टर चकित होऊन म्हणाले, आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता करायला इतक्या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखत नसताना? त्यावर पुन्हा तितक्याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, डॉक्टर ती मला ओळखत नसली तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती. माझं जीवापाड प्रेम आहे तिच्यावर. ऐकता ऐकता डॉक्टरांच्या अंगावर रोमांच उभा राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, हे खरं प्रेमप्रेम म्हणजे नुसतं घेणं नव्हे, तर त्याचबरोबर कितीतरी देणं. निरपेक्षपणे स्वत:कडचा आनंद लुटवणं. उधळणं –  त्या गृहस्थासारखं.
     फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यासाठी जगलास तर  जगलास !!!...

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...