शनिवार, २८ जानेवारी, २०२३

186. प्रेम खूप भावनिक आणि अर्थपूर्ण असते

      कॉलेजमध्ये कट्ट्यावर जिकडे पहावे तिकडे एकच नांव होतं. श्रुती आणि राम. असणारच ना. कारण त्या दोघांचं एकमेकांवर तेवढं प्रेमही होतं. श्रुती दिसायला इतकी सुंदर जणू देवाच्या हातातील कलाकृतीचा एक सुंदर नमुना आणि राम म्हणजे दिसायला जेमतेम पण क्षणार्धात मन जिंकून घेणारा. त्यामुळे त्यांची जोडी चांगलीच जमली होती. एके दिवशी दोघांनी मिळून महाबळेश्वरला फिरायला जायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघेही महाबळेश्वरला गेले. खूप खूप एंजॉय केला आणि परत घराकडे जाण्यासाठी बस स्थानकाकडे आले. श्रुतीला तेथे गरम-गरम भेटणारे खारे शेंगदाणे खूपच आवडत असत म्हणून तिने रामकडे शेंगदाणे आणण्याचा हट्ट धरला. मग रामनेही तिचा हट्ट पुरवला व गाडी पुन्हा परतीचा प्रवास करु लागली. पण श्रुती गाडीत रामची जाणूनबुजून थट्टा करत होती. मग अचानक ती म्हणाली, "ए राम, तू जर शेंगदाणे विकणारा असतास तर किती छान झालं असतं रे. मी लगेच तुझ्याशी लग्न केलं असतं." रामही तिला हसून प्रतिसाद देत होता आणि हसता-हसता प्रवास कधी संपला दोघांनाही कळलं नाही. त्यानंतर बरेच दिवस सुखात गेले. पण एके दिवशी राम जेंव्हा कॉलेजला आला तेंव्हा श्रुतीची एक मैत्रीण रामकडे एक चिठ्ठी देऊन गेली. त्याने ती चिठ्ठी वाचली अन त्याच्या काळजात चर्रर्र झालं. डोक्यात मुंग्या आल्या आणि त्याला अंगातून प्राण गेल्यासारखं वाटत होतं. त्या चिठ्ठीत श्रुतीने लिहीले होते की, "मला माफ कर राम. माझं लग्न ठरलं आहे. मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. कृपया माझा शोध घेऊ नकोस." आणि खरंच तसंच झालं होतं. श्रुतीला तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करावं लागलं आणि त्यांचे कुटूंब दूर कुठेतरी निघून गेले होते. इकडे रामही शहर सोडून कुठेतरी निघून गेला होता... कुठे??? कुणालाच माहित नव्हतं.
     इकडे पाच वर्षांत श्रुतीचा संसार आता चांगलाच फुलला होता. त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस महाबळेश्वरला साजरा करण्याचा तिच्या पतीने ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे सगळे महाबळेश्वरला गेले. खूप थाटामाटात वाढदिवस साजरा झाला आणि मग सगळे पुन्हा परत जाण्यासाठी निघाले. पण तेवढ्यात श्रुतीला तिचे आवडतीचे गरम-गरम खारे शेंगदाणे खाण्याची इच्छा झाली म्हणून गाडी बसस्थानकाकडे नेण्यात आली. गाडीमधून उतरुन ती कुठे शेंगदाणा विकणारा दिसतोय का ते बघू लागली. दूर एका कोपऱ्यात सायकलवर आगेच ते धगमगत मडक घेऊन अतिशय कृश झालेला दाढी वाढलेला एक माणूस शेंगदाणे विकताना तिला दिसला. ती धावत पळत त्याच्याकडे गेली आणि त्याला दहा रुपयांची नोट दिली आणि शेंगदाणे घेण्यासाठी हात पुढे केला तर अश्रूचा एक थेंब तिच्या तळहातावर पडला. तिने वर बघितलं तर तो शेंगदाणे विकणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून "राम" होता तो...
     तिचा तो प्रियकर राम. तिला धक्काच बसला होता. ती म्हणाली त्याला, "हे असं कसं झालं??? का घेतलंस तू एवढं टेन्शन???" अश्रूंचा एक अवंढा गिळत त्यानं उत्तर दिलं की, "श्रुती, तूच एकदा म्हटली होतीस ना की, तू शेंगदाणे विकणारा असतास तर मी तुझ्याशी लगेच लग्न केलं असतं.... मग सांग ना... करणार ना माझ्याशी लग्न??? बघ ना... झालोय ना तुझा मी शेंगदाणे विकणारा आता तरी...???" तो असं म्हणताच तिच्याही अश्रूंचा बांध तुटला. पण स्वत:ला सावरत ती तशीच गाडीकडे पळाली. गाडीत बसली आणि गाडी भरघाव निघून गेली. अन तो तिथेच निघून गेलेल्या गाडीकडे भरलेल्या डोळ्यांनी हातात शेंगदाणे घेऊन गाडीकडे बघत राहीला.
     मुलींचे हसणे हे मुलांच्या हसण्यापेक्षा ही खूप सुंदर आणि लुभावने असते पण मुलांचे प्रेम हे मुलींच्या प्रेमापेक्षाही खूप भावनिक आणि अर्थपूर्ण असते.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...