शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

131. तिलाही प्रेमाची किंमत कधीतरी कळेल

         प्रेमामध्ये माणूस सगळं काही विसरतो हे त्याने फक्त ऐकलं होतं. प्रेम म्हणजे लोक फक्त शरीरसुखासाठी नाटक करतात असं त्याला वाटायचं. प्रेमाला नाटक मानणारे तो प्रेमी युगल बघून हसायचा. प्रेम म्हणजे फक्त टाईमपास असं त्याला वाटायचं.
         अचानक एक दिवस मित्रांसोबत मुलींची चेष्टा करत जात असताना त्याला एक मुलगी दिसली. सगळ्या मुलींची चेष्टा करणाऱ्या त्यांच्या ग्रुपमधील एका मुलाने तिची ही चेष्टा केली. पण आयुष्यात मुलींबद्दल अतिशय वाईट मत असलेल्या त्याने मात्र त्या मुलाला एक जोरदार वाजविली. त्या मुलीविषयी त्याच्या मनात मात्र एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. मित्रांनाही त्याचं हे वागणं बघून तो बदललाय याची जाणीव झाली.
          रात्री घरी गेल्यानंतर तो फक्त तिच्याचविषयी विचार करु लागला. दुसऱ्याच दिवशी त्याने त्या मुलीची सगळी माहिती काढली. फक्त ती दिसेल म्हणून तो कॉलेजला जायला लागला आणि असाच एक दिवस घरात विचार करत असताना त्याच्या आईचा आवाज आला. आईने त्याला नातेवाईकांच्याकडे भेटायला जायचा आहे. तू बाईक चालवायला ये म्हणून सांगितलं. त्याला राग आला कारण तो तिच्या विचारात मग्न होता. तो आईला घेऊन नातेवाईकांच्याकडे पोहचला. पण हे सगळे नातेवाईक त्याच्यासाठी नवीन होते.
         अचानक घरात बसलेला असताना एक सुंदर परी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. त्याने नकळत वर बघितलं तर त्याला तेच डोळे दिसले ज्यांच्या प्रेमात तो आधीच पडला होता. त्याचा आनंद आकाशातही मावणार नाही इतका तो खूश झाला होता. पण दुसऱ्याच क्षणाला त्याला आठवण झाली की हे तर आपले नातेवाईक आहेत. स्वत:ला फार लकी समजणाऱ्या त्या जीवाला आपण फार अनलकी आहोत याची जाणीव झाली. पुढे त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. पण तरीही तो तिला सगळं सांगायला घाबरत होता. रोज तिच्याशी चॅटिंग करुन त्याला तिची सवय झाली होती. तिच्या त्या मंजूळ आणि स्वच्छ स्वभावाने तो तिच्या प्रेमात अजून न्याहळून गेला होता. पण ती नातेवाईक असल्यामुळे तो तिला सांगायला घाबरत होता. तिलाही त्याची सवय झाली होती आणि नकळत ती पण आता त्याच्यावर प्रेम करु लागली होती. हे सगळं त्यानं ध्यानात घेवून रहावून त्याने अचानक तिला प्रपोज केलं. तिच्याही मनावर त्याचं राज्य झालं होतं म्हणून तिनंही होकार दिला. तिला नेहमी खूश ठेवणार, तिच्यासाठी काहीही करणार असं जणू त्यानं ठरवूनच टाकलं होतं.
        आज तो तिच्यावर प्रेम करत नव्हता तर तिच्या गोड स्वभावावर प्रेम करु लागला होता. होतीच ती तशी. सगळ्यांना समजून घेणारी, त्याच्यावर फार प्रेम करणारी. कधी काही त्याचं चुकलं तर त्याला समजावून परत अशी चूक करु नको म्हणून सांगणारी. दोघांनाही आता एकमेकांना गमवणार तर नाही अशी भीती वाटू लागली. तिला मिठी मारली की तो सगळं जग विसरुन जायचा. त्या दोघांच्या वेगळ्या आयुष्यात तो विसरुन जायचा. ते दोघे एकमेकांशिवाय एक दिवस पण राहू  शकत नव्हते. रोज तिच्याच आठवणीत तो वेगळंच जीवन जगू लागला होता. त्याला तिच्या आधीच्या प्रेमाबद्दल पण माहित होतं. पण तरीही तिचा स्वाभिमान दुखावू नये म्हणून तो तिला त्याबद्दल काहीच बोलला नव्हता. पण एक दिवस तिनेच त्याला सर्व काही सांगितलं. आणि त्याला तिचा अभिमान वाटायला लागला. रोजच त्यांच एकमेकांचं प्रेम वाढू लागलं.
         पण आता वेळ बदलली होती. तिचं त्याच्याबद्दलचे प्रेम हळूहळू कमी व्हायला लागलं होतं. त्याच्याही ते लक्षात आलं होतं. त्यानं तसं तिला विचारलं तर ती त्याच्याशी भांडू लागली. तो असा एकमेव मुलगा असेल ज्याचं प्रेम तिला मिठी मारल्यावर अजून वाढलं होतं. बाकी मुलांसारख मजा करुन सोडणारा तो नव्हता. त्याला फक्त ती पाहिजे होती. तिचा सहवास पाहिजे होता. तिला मी लग्नानंतर महाराणीसारखं सांभाळेन, तिला हवं ते देईन. असं त्यानं ठरवलं होतं. पण आता ती पूर्णपणे बदलली होती. एक दिवस त्याच्यासाठी आत्महत्या करीन अशी बोलणारी ती आता त्याने हात कापून घेतला होता तरी काही बोलली नव्हती. त्याला सगळं समजत होतं, पण तरीही स्वत: कमी पण घेऊन त्याने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
     पण तिला काहीही ऐकायचं नव्हतं. तिच्यावर एवढं प्रेम करणाऱ्या त्याची तिला अजिबात काळजी राहिली नव्हती. तो रात्री जेवताच झोपू लागला. दिवसभर वेड्यासारखा बघत पायीच फिरु लागला. तो तिला बघण्यासाठी गावात पायीच चालत गेला. नशीबाने त्याला ती दिसली. पण तिच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहून त्याला फार वाईट वाटले. काल तिचे फेसबुकवरील अकाऊंट हॅक झालं होतं. त्याने तिला फेसबुकवर शोधलं  पण ती त्याला सापडली नव्हती. त्याला वाटलं तिनं तिचे अकाऊंट डिॲक्टीवेट केलं असेल. त्याच्या मॅसेजला आता रिप्लायसुध्दा करत नव्हती. कदाचित तिला दुसरा कोणी मिळाला असेल.
     प्रेम हे भावनांवर अवलंबून असतं. चेहरा, सुंदरतावर नाही हे त्या शोनाला कोण सांगणार?  यात तिचीही काही चूक नव्हती. कारण तिला आता तिचे फेसबुक अकाऊंटपेक्षा ही प्रेम झालं होत. आज तिच्या नजरेत तो कोणीही नाही. पण तो तिच्यावर प्रेम करायचा, करतोय आणि करत राहणारत्याला प्रेमाची व्याख्या कळाली होती.
     तिलाही प्रेमाची किंमत कळेल कधीतरी. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आणि जो प्रेम करतो तो त्याची गर्लफ्रेंड त्याच्याशी कशीही वागली तरी तिला कधी त्रास देत नाही. जसं तिला वाटतंय की तिचं अकाऊंट त्यानेच हॅक केलं. शेवटी तो तिच्या खुशीतच खूश आहे. तिच्या सगळ्या सुख-दु:खात तो तिची साथ देणारच …!!!
     आणि आज जरी तो रोज रात्री तिच्या आठवणीत रडत असला तरी ती खूश असली तो नेहमी हसतच राहील. कारण त्याला माहित आहे ती त्याच्याशी कितीही वाईट वागत असली तरीसुध्दा तिला तो आजही आवडतो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...