मी ताज
हॉटेलमध्ये गेलो.
का
गेलो?
अहो,
सांगायचं काय
आहे
त्यात एवढं.
आज
आमच्या लग्नाचा वाढदिवस.
बायको अजून यायची होती.
पण
एका
टेबलावर चाळीशीतली एक
सुंदर स्त्री बसली होती.
मी
तिच्याकडे चोरट्या नजरेने बघत
होतो.
पण
तिला ते
समजलं आणि
मला
तीने हाक
मारली.
मलाही तिच्याशी थोडं बोलायचं होतं.
मी
गेलो.
ती : तुम्हाला लाज नाही वाटत, पन्नाशीतले असून तुम्ही असले धंदे करता.
मी
: मला
माफ
करा.
पण
इथे
थांबून काय
करायचं म्हणूनच थोडा टाईमपास.
मला
माफ
करा.
ती
: ठीक
आहे.
कपड्यावरुन तर
खूपच सभ्य दिसताय.
लग्न झालंय का
तुमचं?
मी
: हो.
झालंय ना
आणि
आज
तर
लग्नाचा वाढदिवस आहे.
ती
: खरंच.
मी
आणि
माझा नवरा आमच्या लग्नाचा वीसावा वाढदिवस आजच
आहे.
पण
तो
अजून यायचा आहे.
मी
: खरंच…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ती
: आभारी आहे
आणि
तुम्हालापण…
मी
: आभारी आहे.
ती
: लव
मॅरेज की
अरेंज मॅरेज झालंय तुमचं?
मी
: लव
मॅरेज.
ती
: खरंच…
मग
एखादी लव
स्टोरी असेल ना
तुमची.
ऐकवा ना
प्लीज.
मी
: ठीक
आहे.
सांगतो.
मला ती माझ्या मित्राच्या
लग्नात भेटली.
सर्वांच्या आग्रहाखातर तिने डान्स केला.
तिने इतका छान
डान्स केला की
मी
खूपच भाळलो तिच्यावर.
मित्रांकडून तिची ओळख
करुन घेतली.
आमची चांगली मैत्री जमली.
मग
एक
दिवस मी
तिला प्रपोज केलं.
तिने हो
म्हटलं.
आमचं प्रेमही जमलं आणि
त्यानंतर लग्नही झालं.
मग
एक
दोन
वर्षे खूपच सुखाची गेली आमची.
पण
एक
दिवस मी
पार्किंग लॉटमध्ये कार
पार
करुन झेब्रा क्रॉसिंगवरुन एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात
असताना एका
ट्रकने सिग्नल तोडला आणि
तो
ट्रक वेगाने माझ्या दिशेने येऊ
लागला हे
कारमध्ये बसलेल्या माझ्या पत्नीने पाहिलं तिने गाडीमधून उतरुन माझ्या दिशेने धावत येऊन मला
जोराचा धक्का दिला.
मी
पुढे जाऊन पडलो.
तो
ट्रक तिला धडकला.
ती
बाजूला फेकली गेली.
तिच्या डोक्यातून जबर
रक्त वाहत होते.
तिला हिंदुजामध्ये ॲडमिट केलं गेलं.
तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश
आले.
मी
देवाचे आणि
डॉक्टरांचे लाख
लाख
धन्यवाद मानले.
पण
काही दिवसांनी डॉक्टरांच्या लक्षात आलं
की
ती
प्रत्येक पंधरा मिनिटांनी स्वत:ची ओळख विसरते. इतर लोकांना खूपवेळा पण मलाही ती विसरते. तिला पुन्हा पुन्हा याची आठवण करुन द्यावी लागते. डोक्याचं
स्कॅनिंग करुन निष्कर्ष काढला गेला.
तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस
झाला आहे.
म्हणजे व्यक्ती आपली स्वत:ची तसेच इतरांची ओळख फक्त पंधरा मिनिटे लक्षात ठेवू शकतो हे तिला समजावून सांगितलं. अशा लोकांसमवेत
राहणं म्हणजे खूप
कठीण काम
आहे.
कारण त्यांना पुन्हा पुन्हा सर्व गोष्टींची जाणीव करुन द्यावी लागते जे
खूपच अवघड आहे
आणि
हा
मानसिक आजार कधी
बरा
होईल हे
काही सांगता येत
नाही.
त्याला खूप
वर्षेसुध्दा लागू शकतात.
त्यांच्या ह्या बोलण्यावर मी
म्हणालो मी
माझ्या प्रेमासाठी हे
चॅलेंज स्वीकारीन.
तिच्यासाठी मी
हजबंड-कम-मेमरी बनून राहीन. तिला मी इतक्या जवळ करीन की ती तिचा प्रत्येक
क्षण माझ्यातच अनुभवेल.
आजपर्यंत आम्ही असेच जगतोय.
मी
तिची खूप
काळजी घेतो.
तिला नजरेआड होऊ
देत
नाही.
हा,
आजही ती
आहे
तशीच आहे.
पण
तिला कसं
सांभाळायचं हे
मला
माहित आहे
आणि
मला
त्याची सवयही झाली आहे.
माझी ही प्रेमकथा
ऐकून तिचे डोळे खूपच भरुन आले.
ती
मला
म्हणाली की
खूपच दु:खाने भरलेली प्रेमकथा
आहे
तुमची……
(डोळे पुसत-पुसत) बरं… मला एक सांगा, तुमची बायको आहे कुठे? मी म्हणालो, “आहे याच हॉटेलमध्ये. ती ही बसली आहे. या घड्याळात
आता
बरोबर एकच
मिनिट उरलाय.
या
मिनिटामध्ये ती
नक्कीच माझ्याकडे येईल.
ती
: कुठे आहेत त्या?
मलाही भेटायचे आहे
त्यांना.
मी
: फक्त तीस
सेकंद राहिलेत…
थोडा वेळ
धीर
धरा…
(सेकंद उलटत गेले…5……4……3……2……1……0)
ती
: रोहीत कुठे होतास तू?
मी
किती वेळ
झाला वाट
पाहतेय तुझी,
केंव्हाचा केक
मागविलाय.
मी
: वेटर,
ए
वेटर,
केक
घेऊन ये…
मी उशीरा आल्याबद्दल
तिची माफी मागितली आणि
आम्ही दोघांनी आमच्या वीसाव्या लग्नाचा वाढदिवस पुन्हा साजरा केला.
पुन्हा एकदा मी
तिला तिची आवडती तिच्या गळ्यातली चेन
भेटवस्तू दिली.
होय……
हीच
आहे
माझी पत्नी जिच्याशी मी
इतका वेळ
बोलत होतो.
जिच्याशी आमची लव
स्टोरी शेअर केली.
आणि
मी
म्हणालो ना
पुन्हा एकदा आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ते
यासाठी म्हणालो की,
सकाळपासून ही
पंधरावी वेळ
आहे
आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची.
कारण तिच्या लक्षात नसतं ना
! आणि
साजरा करायला काय
हरकत आहे.
कारण पाचशे कोटींची माझी पूर्ण संपत्ती जरी
हिच्या आनंदावर खर्च केली तरी
मला
त्याचं जराही वाईट वाटणार नाही.
पुढचे पंधरा मिनिटे का
होईना ती
माझ्यासंगे आहे
आणि
मला
हे
अनमोल क्षण गमवायचे नाहीत.
तिच्यासोबत पुढची पंधरा मिनिटे मला
तिचाच बनून रहायंच आहे.
आणि
हो,
तुम्ही जर
कोणावर प्रेम करत
असाल,
एखाद्या नातेसंबंधामध्ये असाल तर
तुमच्या जोडीदाराला त्याच्या सर्व गुण
दोषांसोबत स्वीकारा.
तुम्हीही माझ्यासारखे सुखी रहाल.
ती : तुम्हाला लाज नाही वाटत, पन्नाशीतले असून तुम्ही असले धंदे करता.
करा.
अजून यायचा आहे.
मागविलाय.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा