समर हा
असा
मुलगा आहे
ज्याने कधीही प्रेमावर विश्वास नाही ठेवला.
आणि
याच
गोष्टीवरुन त्याचे त्यांच्या मित्रांशी नेहमी वाद
व्हायचे.
त्याला स्वत:वर एवढा आत्मविश्वास
होता की
आपण
या
जगातल्या कोणत्याही मुलीचं हृदय परिवर्तन
(शुध्द मराठी भाषेत याला “पोरगी पटवणे” असं म्हणतात.) करु शकतो, असं त्याला वाटायचं. या जगात प्रेम नावाची कसलीही गोष्ट नसून फक्त वासनाच आहे असं त्याचं म्हणणं होतं.
एक दिवस त्याच्या मित्रांनी त्याच्याबरोबर पैज लावली की जर तू योगिता आणि जय या प्रेमवीरांना वेगळं करुन दाखवलंस तर तुझी गोष्ट आम्ही सर्वार्थानं मान्य करु. त्याने पैज स्वीकारली. समर हा तर खरंतर खूपच हुशार मुलगा आहे. मुली पटवण्याची त्याची आपली एक वेगळीच पध्दत आहे आणि खरंच त्या पध्दतीवर योगिता एक दिवस घसरली. ओळख झाली, मैत्रीही झाली पण एक दिवस खरंच जेंव्हा ठरल्याप्रमाणे प्रेमातील नाटकाचा एक भाग म्हणून समरने तिला आय लव यू म्हटलं तेंव्हा त्याचं उत्त देण्याआधी तिने जयबद्दल केलेल्या ब्रेक-अप बद्दल सांगितलं. त्याने त्यावर काहीही आक्षेप घेतला नाही. मग त्यानं तिला या कारणासहीत स्वीकारण्याचं नाटक केलं आणि एका कच्च्या पायावर उभ्या असलेल्या नातेसंबंधामध्ये राहू लागले. एकमेकांसोबत वेळ घालवू लागले आणि याची जाणीव त्याने मित्रांना करुन दिली.
मित्रांनाही
त्याची बाजू मान्य करावी लागली.
त्यानंतर त्याने अधिकृतरित्या तिच्याशी ब्रेकअप केला.
ती
खूपच दु:खावली गेली होती. कारण ब्रेकअपचं
योग्य कारण तिला कळालंच नव्हतं.
पण
समरला ही
परिस्थिती काही नवीन नव्हती. त्याने असे कित्येक ब्रेकअप याआधी केले होते. पण आता येणारी परिस्थिती त्याच्यासाठी नवीन होती. त्याला तिचा गोड आवाज सारखा आठवू लागला. तिचा चेहरा समोर दिसायचा. वाऱ्याची झुळूक तिचा सुगंध घेऊन यायची. पाण्याच्या स्पर्शात त्याला तिची जाणीव व्हायची. पुन्हा-पुन्हा आरशासमोर जाऊन उभ राहायचा… काय होतयं हेच कळत नव्हतं. आणि एक दिवस स्वप्नात योगीत आली. खूपच दु:खी होती ती. ती ब्रेकअपमुळे
आत्महत्या करायला चालली होती.
ती
दहा
मजली इमारतीवरुन उडी
मारुन जीव
देणार तेवढ्यात त्याला जाग
आली.
समोर त्याची लहान बहीण दिशा त्याच्यासाठी बेड
टी
घेऊन आली
होती.
ती
म्हणाली,
“शुभ प्रसाद दादा, हा घे चहा. त्याने चहा घेतला. योगिताबरोबर
तू
असं
करायला नको
पाहिजे होतंस.
तुला कसं
कळलं?
तू
माझी डायरी पुन्हा वाचलीस.
थांब मी
तुला आत्ताच बघतो.
दिशा म्हणाली,
“मला माफ कर… मला माफ कर दादा… समर थोडा वेळ विचार करुन, “ठीकआहे.”
खरंच चुकलो का
गं?
दिशा म्हणाली,
“हो… खूपच.”
जेंव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते
तेंव्हा ती त्याला सर्वस्व मानते.
आणि
तू……
तर
तिचा विश्वास तोडून तिचं सर्स्ववच हिरावुन घेतलंस.
तुला एक
सांगते,
जय
नावाचा जो
मुलगा आहे
ना
त्याने स्वत:च्या गळ्याला चाकू लावून योगिताचा
होकार मिळविला होता.
म्हणून ते
नातं एक
ना
एक
दिवस तुटणारंच होतं.
फक्त याला कारणीभूत तू
ठरलास.” समर म्हणाला, “खरच आणि मी ही किती चुकीचे वागलो.मी खूपच प्रात्यक्षिक वागलो. मला माहित नव्हतं की प्रेम हे प्रात्यक्षिक नाही तर हृदयाने करायची गोष्ट आहे. तुला मी
खरं
सांगू का?
मी
खरंच योगिताच्या प्रेमात पडलोय गं”
दिशा म्हणाली,
“अरे… मग जाऊन सांग ना तिला.”
समर
म्हणाला,
“पण ती मला माफ करेल?”
दिशा म्हणाली,
“तीचं तुझ्यावर
खरं
प्रेम आहे
ना,
मग
ती
नक्की माफ
करेल.”
दिशाचं ऐकून त्याने योगिताची शोधाशोध सुरु केली.
ती
तिच्या आजीकडे गेली आहे
हे
समरला कळलं.
तिच्या प्रेमाची परीक्षा म्हणून तो
एका
नवीन रुपात तिच्यासमोर हजर
झाला.
पण
थोडाही वेळ
न
लावता तिनं त्याला ओळखलं.
त्याला पाहून तिला प्रचंड आनंद झाला.
त्याने तिची मनापासून माफी मागितली आणि
आपल्या मनातलं खरं
प्रेम व्यक्त केलं.
योगितानेही वेळ
न
दवडता त्याला मोठ्या मनाने माफ
केलं.
आणि
तिने समरला आहे
तसं
स्वीकारलं.
ही होती समरची प्रेमकथा. पण प्रत्येकाच्या
प्रेमाचा शेवट असा
गोड
होईलच असे
नाही.
हा
पण
जरा
समझदारीने निर्णय घेतला तर
जवळजवळ प्रत्येक प्रेमकथेचा शेवट गोडच होईल.
एक दिवस त्याच्या मित्रांनी त्याच्याबरोबर पैज लावली की जर तू योगिता आणि जय या प्रेमवीरांना वेगळं करुन दाखवलंस तर तुझी गोष्ट आम्ही सर्वार्थानं मान्य करु. त्याने पैज स्वीकारली. समर हा तर खरंतर खूपच हुशार मुलगा आहे. मुली पटवण्याची त्याची आपली एक वेगळीच पध्दत आहे आणि खरंच त्या पध्दतीवर योगिता एक दिवस घसरली. ओळख झाली, मैत्रीही झाली पण एक दिवस खरंच जेंव्हा ठरल्याप्रमाणे प्रेमातील नाटकाचा एक भाग म्हणून समरने तिला आय लव यू म्हटलं तेंव्हा त्याचं उत्त देण्याआधी तिने जयबद्दल केलेल्या ब्रेक-अप बद्दल सांगितलं. त्याने त्यावर काहीही आक्षेप घेतला नाही. मग त्यानं तिला या कारणासहीत स्वीकारण्याचं नाटक केलं आणि एका कच्च्या पायावर उभ्या असलेल्या नातेसंबंधामध्ये राहू लागले. एकमेकांसोबत वेळ घालवू लागले आणि याची जाणीव त्याने मित्रांना करुन दिली.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा