शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

183. प्रेम निभवायला वाघाचं काळीज लागतं

 तो : माझे तुझ्यावर प्रेम आहे.
ती : फक्त एका अटीवर हो बोलेन.
तो : अट सांगून तर बघ.
ती : जर आयुष्यभर साथ देणार असशील तरच हो बोलेन.
तो : अग राणी ही काय अट झाली. मी तर सर्वस्व तुझाच झालोय ग, मला आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्यासोबतच काढायचं आहे.
(ती निर्भान होऊन त्याचा शब्द आणि शब्द ऐकत होती. तिला विश्वास बसत नव्हता की कुणी तिच्यावर सुध्दा इतकं प्रेम करणार आहे. तिने क्षणाचाही विलंब न लावता त्याला हो बोलून टाकलं. दोघे एकमेकांसोबत खूप खूष होते. वेळ पण छान जात होता. गप्पा-टप्पा, भेटी-गाठी, रुसवा-फुगवा जे प्रेमात असतं ते सगळं व्यवस्थित सुरु होतं की अचानक तिला एक प्रश्न सारखा भेडसावू लागला. त्याने पण तिच्या मनातला अस्वस्थपणा बरोबर हेरला.)
तो : काय ग पिलू, काय झालं? माझं काही चुकलं का?
ती : नाही रे... तुझं काहीच नाही चुकलं
तो : मग तू इतका विचार कसला करत आहेस. दोन दिवस झाले पाहत आहे मी. तू खूप टेन्शनमध्ये आहेस.
(त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले व ती बोलू लागली.)
ती : तुझ्या घरचे मला स्वीकारतील ना रे?
तो : अगं... बस्स... एवढंस कारण आणि तू एवढं टेन्शन घेतले आहेस. मी आजच बोलेन घरच्यांशी.
(एवढं बोलून तो निघून गेला. ती त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहतच राहिली.)
तो : आई-बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे.
त्याचे वडील : काय बोलायचं आहे?
त्याची आई : अरे बोल ना बाबा, काय झालं?
तो : माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे.
(हे ऐकताच त्याच्या वडीलांना त्याचा खूप राग आला. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या आवेशातच त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली लावली. त्याची आई मध्ये आली व बोलू लागली)
त्याची आई - अरे तुला कळतंय का की तू हे काय बोलतोएस, तुझी हिम्मत झालीच कशी आमच्याशी असं स्वत:च्या लग्नाबद्दल बोलायची. हेच संस्कार दिलेत का आम्ही तुला. कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक ...
(कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक हे त्याची आईचे शब्द त्याच्या कानावर पडताच त्याला राग अनावर झाला.)
तो : आईईईईईई.... ! मला हव तेवढं बोला पण प्लिज तिला नका काही बोलू. खूप खूप चांगली आहे गं ती. खूप प्रेम करते ती माझ्यावर.
(हे ऐकताच त्याची आई स्तब्ध झाली. तिला कळून चुकलेलं की त्याची काहीच चुक नव्हती. तरीही आपण त्याला बोलत आहोत. पण त्याचे वडील काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.)
त्याचे वडील : तू काहीही बोललास तरी आम्हांला हे पटलेलं नाही. आता तू हा विषय काढून टाक डोक्यातून.
तो : बाबा जर हेक्य वाक्य मला जर बहिण असती आणि तिला वापरलं गेलं असतं किंवा तिला जर या परिस्थितीला सामोरं जाव लागलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं...
(हे ऐकून त्याचे वडील त्याच्याकडे पाहतच राहिले. त्याने ही लढाई जिंकली होती. त्याच्या आई-वडीलांनी मुलीला न पाहता लग्नासाठी परवानगी दिली होती. आता तिची वेळ होती घरी सांगायची. त्याआधी दोघांनी भेटायचं ठरवलं.)
ती : मला खूप भिती वाटते रे. खूप कडक आहेत माझे बाबा. मला मारतील ते मी जर हा विषय काढला तर...
तो : मग काय करायचं ठरवलं आहेस?
ती : तू ये ना प्लीज माझ्या घरी. तू सुरवात कर मग मी सांभाळून घेईन सगळं.
तो : वचन दे.
ती : हो रे बाबा... वचन दिलं.
तो : ठीक आहे. मी येतोय उद्या तुझ्या घरी. तू फक्त तयार रहा. ठीक आहे.
ती : ठीक आहे.
(ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला. त्याने सगळी परिस्थिती तिच्या वडीलांना सांगितली. तिच्या वडीलांच्या रागाचा पारा चढला. तळपायाची आग मस्तकाला गेली.) तिला जोरात हाक मारुन बाहेर सगळ्यांसमोर बोलवण्यात आले. ती थरथर कापत होती. दरदरुन घाम आलेला. तिची अग्निपरीक्षा नव्हती पण त्यापेक्षा कमी पण नव्हती. ती बाहेर आली सर्वांसमोर. तिला विचारण्यात आलं की हा मुलगा जे काही बोलतोय ते खरं आहे का? तिला फक्त हो किंवा नाही हे उत्तर द्यायचं होतं. त्याने त्याची एकदम चोख कामगिरी बजावली होती. आता तिची वेळ होती. तिने त्याच्याकडं पाहिले. तो आशाभूत नजरेने तिच्याकडं बघत होता. बहुतेक त्याला कळून चुकलेलं की ती भीतीपेटी माघार घेईल. वातावरण खूप तापलेलं होतं. सगळे तिच्या उत्तराची वाट पहात होते. ती बोलू लागली, "बाबा, खूप विश्वास आहे ना तुमचा तुमच्या लेकीवर. तर मग माझे पण हे कर्तव्य बनतं की माझ्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट मी तुमहाला सांगावी. जर मी तुम्हाला हे नाही सांगितलं तर मी तुमचा विश्वासघात केल्यासारखं होईल. बाबा तो जे जे बोलत आहे, ती एक आणि एक गोष्ट खरी आहे. हो... प्रेम करते मी त्याच्यावर आणि तुमच्या परवानगीनेच मला लग्न करायचं त्याच्याशी. प्लिज  बाबा. एकदा सकारात्मकपणे  विचार करा आमच्या नात्याबद्दल आणि हो तुमच्या पध्दतीने त्याची कसोटी घ्या पण प्लीज एकदा त्याचा विचार करा.
( तिच्या घरचे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. अन् ती बेभान होऊन आपल्या प्रेमाची बाजू मांडत होती. आणि तो आनंदाश्रू ढाळत तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. त्याला गर्व वाटत होता की एका खूपच जबाबदार व समजूतदार मुलीशी तो प्रेम करत होता.)
यानंतर काय .......
अहो काय होणार .............
तिचे वडील काहीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले व काही वेळांनी परत आले व तिच्याकडे पाहून एक मस्त स्माईल दिली. तिनेही जराही विलंब न लावता बाबा अशी मोठी किंकाळी मारुन बाबांना जोरात मिठी मारली. आता हे सांगायला नको की त्यांचं लग्न झालंय. प्रेम करायला सोपं आहे पण ते निभावायला वाघांचे काळीज लागतं.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...