शनिवार, ७ जानेवारी, २०२३

136. चुकीसाठी माफी मागायला काही हरकत नाही

       अरे अश्विन किती उशीर. सात वाजताहेत. निघतोस ना? होनिघतोच आहे. आज थोडा उशीर झाला. अश्विनने आपली ॲटो काढली आणि तो ऑफिसमधून निघाला. सकाळी छोट्याशा कारणावरुन त्याच्या बायकोशी झालेल्या भांडणामुळे त्याला घरी जावसं वाटत नव्हतं. संध्याकाळचे सात वाजता मुंबईच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यावरुन जाताना कोणतरी स्वत:ची वेगळी जाणीव करुन देत होतं आणि तसंही अश्विन गेट वे ऑफ इंडिया जवळ थोडा वेळ घालवणारच होता. गाडी थांबवली. त्यानं पाहिलं एक वृध्द गृहस्थ हातात सुंदर फुलांचा गुच्छ घेऊन समुद्राकडे अशा प्रकारे बघत बसले होते की, या समुद्राकडून आपल्याला खूपसं येणं आहे आणि मी ते घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही. अश्विन गाडीतून उतरुन त्यांच्याजवळ जाऊन बसला. पण त्यांना याचं भान नव्हतं. अश्विनने त्यांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. हं…… कोण? काकामी अश्विन आपण काय पाहताय? घरी जा. ही वेळ बरी नव्हे. पण ती आत्ताच भेटते ना ! ती ती म्हणजे स्मिता. जिच्यावर मी अजूनही खूप प्रेम करतो ती. त्यानंतर ते म्हणाले, 1970 साली प्रेमविवाह करणे म्हणजे पाण्यात विरघळलेली सारखर वेगळं करण्यापेक्षाही कठीण काम. तेंव्हा आम्ही ठरवलं, आमचं लग्न होवो अथवा होवो पण एकमेकांना भेटल्याशिवाय भेटणं कधीच सोडणार नाही. आम्ही आजही भेटतो एकमेकांना. अश्विनला त्या वृध्द गृहस्थाच्या कहाणीत रस वाटू लागला. वेळ झालाच आहे तर आणखी थोडा वेळ झाला तर काय हरकत आहे? तो थोडा विसावला आणि विचारलं, मग काय झालं? त्यांचं लग्न झालं? हो आणि तुमचं? माझंही झालं. आणि आजदेखील तुम्ही एकमेकांना भेटता. यात खरच खूप आश्चर्य वाटतं. लाटांकडे बघताना ते हसून म्हणाले, प्रेमासारखी आश्चर्याची गोष्ट या जगात तुला या जगात शोधून सापडणार नाही बाळा. त्यांच्या नवऱ्याचं नाव काय आहे सांगू शकाल? बाळासाहेब पाटील म्हणतात त्यांना. बरएक विचारु. विचार तुम्हाला काय वाटतं? आजच्या जमान्यात तुमच्यासारखं खरं प्रेम करणारे तरुण-तरुणी भेटतील? खरच आजच्या जगात खरं प्रेम शिल्लक आहे? ते गृहस्थ हसले आणि म्हणाले, बाळा, जमाना कितीही बदलला तरी प्रेम बदलत नाही. प्रेम करण्याची पध्दत बदलते. व्यक्त करण्याची पध्दत बदलते. पण प्रेम नाही. मुळात जे बदलत. ते प्रेमच नाही असं मला वाटतं. पटवून द्याल. ठीक आहेदेतो असे म्हणून त्यांनी सांगायला सुरवात केली, एक मुलगा रोज एका मुलीला पाहण्यासाठी कॉलेज पिरेड चुकवून बस स्टँडवर येऊन उभा राहायचा. तिला पाहल्याशिवाय त्याला चैनचं पडायचं नाही. तो रोज तिला पाहायचा आणि  त्या मुलीने याची केंव्हाच दखल घेतली होती. ती ही चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहायची. एक वर्ष उलटून गेलं होतं. मग त्याने होती नव्हती. सगळी हिंमत गोळा करुन तिला प्रपोज केलं. अचानकपणे घडलेली ही गोष्ट तिला अनपेक्षित होती. म्हणून तिनं त्याला चक्क नकार दिला. तेंव्हापासून तो त्या बस स्टँडवर यायचा बंद झाला. तिला खूप चुकल्या-चुकल्यासारखं वाटू लागलं. तिला त्याला पाहण्याची सवय झाली होती. त्याच बेंच्याकडे एकटक पाहत ती त्याला शोधायचीपण तो तिथे नाहीये याची जाणीव तिला प्रकर्षाने व्हायची. एक दिवस ती त्याचा पत्ता शोधत शोधत त्याच्या कॉलेजमध्ये पोहाचली आणि त्याला पाहताच तिला रडू कोसळलं आणि तिनं त्याला मिठी मारली. तेंव्हापासून ते दोघे प्रेमात बुडाले. आता मला सांग तिचा नकार असतानाही दोघांना एकमेकांना जोडून ठेवणारी अशी कोणती गोष्ट असेल? माहिती नाही सांगता येत नाही ना? ज्याप्रकारे तुला या प्रश्नाचे उत्तर सांगता येत नाही. त्याचप्रकारे जमाना बदलला तरी प्रेम का बदलत नाही हे मलाही सांगता येत नाही. आणि राहिला मुद्दा आजच्या तरुण पिढीचा तर त्यांनी खऱ्या प्रेमाचा अर्थ मुळातच चुकीचा घेतला आहे. आकर्षणालाच ते प्रेम समजून बसलेत. त्यामुळे लग्नाचा वर्षभरानंतरच भांडणे, वाद वाढतात. आपल्यातलं प्रेम संपल्याची जाणीव त्यांना होते. खरं म्हणजे प्रेम कधीच संपत नाही. संपत ते आकर्षण.
     अश्विन आपसूक हसला आणि म्हणाला, समजलं मला. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला समजली की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच आहात. हुशार आहेस. अशा प्रकारे खूप गप्पा रंगल्या त्यांच्यात जणू काही एकमेकांचे जुने मित्रच आहेत असं वाटत होतं  त्यांच्याकडं पाहून. अश्विनने घड्याळात पाहिलं. रात्रीचे साडेआठ वाजले हाते. तो उठला आणि म्हणाला, मला जायला हवं. खूपच छान व्यक्ती आहात तुम्ही. तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल मला. चला मी निघतो. दोन पाऊले चालल्यावर तो थांबला आणि मागे वळून पुन्हा म्हणाला, ठीक आहे. बर मला तुमचं नाव कळू शकेल? बाळासाहेब. गोंधळलेला अश्विन बोलला, म्हणजे स्मिता तुमची? नाहीती माझी बायको होती. म्हणजे, मी समजलो नाही. उत्तखंडामध्ये झालेल्या आपत्तीमध्ये ती हरवली आहे. अजून कुठेतरी मनातून असं वाटतं ती मला येथे भेटायला येईल. मन मानायलाच तयार नाही की ती जिवंत नसावी. तिचंच म्हणणं होतं की आपलं लग्न एकमेकांशी होवो की दुसऱ्या कोणाशीही. पण आपण शेवटपर्यंत एकमेकांना नव्या प्रेमीयुगलासारखे या गेट वे ऑफ इंडिया  जवळ नेहमी भेटत राहू. आणि आजतागायत आम्ही भेटायचो देखील. कारण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतोअजूनही. त्यांचे डोळे भावनेने भरले होते. पण त्यात कुठेही निराशा नव्हती. ती भेटेल अशी एक भाबडी आशा होती.
     खूपशा विचारांना सोबत घेऊन अश्विन तिथून निघाला. मनात कुठेतरी बाळासाहेबांचं त्यांच्या पत्नीप्रती असणारे प्रेम अश्विनच्या मनात रुतलं गेलं. मनात गोंधळलेल्या विचारांचा कोलाहाल घेऊन तो घरी पोहोचला. बेल वाजवली. शांभाने दार उघडलं. नाराजीने भरलेली नजर ती खाली करत किचनमध्ये गेली. अश्विन खूर्चीवर जाऊन बसला. थोडावेळ डोळे मिटले. तेवढ्यात टेबलवर ग्लास ठेवण्याचा आवाज झाला. शोभा त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास ठेऊन आत जाऊ लागली. थांब शोभा शोभा आश्चर्याने बघत, बोल. सकाळी जे झालं त्याविषयी मला तुझी माफी मागायची आहे. मला माफ कर. मी उगाच भांडलो तुझ्याशी, थोडं जास्तच झालं. शोभा खुर्चीवर बसत, नाही रे ! माझीपण तितकीच चूक आहे. माफ कर मला. अशा प्रकारे त्या दोघांनी माफी मागितली माफही केलं.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...