"प्रत्येकाचं
स्वत:वर असं प्रचंड प्रेम असतं, पण तरीही प्रत्येकाला अशी एक जण हवी आहे जी दाखवून
देते की आपण चुकीचे आहोत. कारण आपल्यापेक्षाही ती आपल्यावर जासत प्रेम करते, अशीच
प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात मिळू दे. ह्याच माझ्या आजच्या दिवसाबद्दल (14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे) शुभेच्छा !!!" असं शेवटचं वाक्य सांगून तो मंचावरुन टाळ्यांच्या गजरातच खाली
उतरला. तब्बल तीन तास रंगलेल्या कार्यक्रमात बाकींच्यापेक्षा शार्दुलच्या
प्रेमावरील कविता आणि विचारांनी उपस्थित तरुणाईला प्रेमाचा वेगळा रंग दाखवला होता.
कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी शार्दुलचं खूप कौतुक केलं. बाकीच्या उपस्थितांनी
त्याला तितकीच मनापासून दाद दिली. उपस्थित तरुणाई तर त्याच्याशी बोलायला उतावीळ
झाली होती. "शार्दुल सर, प्लीज आम्हांला तुमची लव स्टोरी सांगा ना !! आम्हांला नक्कीच आवडेल ती ऐकायला..." असं म्हणत तिथं जमलेल्या
तरुण-तरुणींनी त्याला आग्रहानं विनंती केली. कार्यक्रम संपला होता तरीही मग
आयोजकांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर आणखी वेळ वाढवला. उपस्थितांच्यामध्ये शार्दुल
बसला. त्याच्या चेहऱ्यावर जणू लाजेची लाली आली असं जाणवतं होतं आणि त्यानं त्याची
प्रेमकथा सांगायला सुरवात केली.
आज तब्बल पाच वर्षे होऊन जातील त्या गोष्टीला. माझ्या आयुष्यातला पहिला व्हॅलेंटाईन डे होता तो...! त्यादिवशी कॉलेजमध्ये आल्यावर जणू माझ्या प्रेमाची गुलाबी धुंदी पसरलेली होती. प्रेमाच्या वसंताने माझं सर्वांग रोमांचित झालं असं वाटत होतं. वळीवाच्या पावसात भिजल्यासारखाच मी दिसत होतो. चहूकडे भिरभिरणारी माझी नजर आज खूपच चंचल असल्यासारखी वाटत होती. समोरुन येणाऱ्या प्रत्येकाकडे बघून आज मी स्मितहास्य करत होतो. जणू प्रत्येकात त्याला तिचाच चेहरा बघत होतो. कुठूनतरी तिचा मंजूळ आवाज येईल आणि तो टिपण्यासाठी माझे कान आसुरलेले होते. अगदी हळूवारपणे श्वास घेत होतो. जणू प्रत्येक श्वासाआधी तिचीच आठवण काढत होतो. माझा जीवलग मित्र माझ्या शेजारीच होता. त्याला सर्वकाही कळत होतं. कारण माझ्या प्रेमाचं गुपीत फक्त त्यालाच तर माहित होतं."
"भाई, श्वेताली आली," असं अक्षय बोलल्यावर माझ लक्ष तिच्याकडं गेलं. खरचं श्वेताली शिवाय दुसऱ्या कोणावर मी प्रेम करु शकत नाही रे," असं मी अक्षयला बोललो. "अरे पण मितालीचं काय शार्दुल?" असं अक्षयच्या बोलण्याला कल्पनेच्या आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारं माझं मन वास्तवाच्या जमिनीवर येऊन कोसळलं. मिताली ही अकरावीपासून माझ्या प्रेमात पडली होती. आमच्या कॉलेजमधला मी पहिलाच असा मुलगा होतो ज्याला स्वत:हून एका मुलीने प्रपोज केलं होतं. त्यामुळे आमच्या प्रेमाबद्दल सगळ्या कॉलेजच्या मुलामुलींनाच काय पण शिक्षकांनाही माहिती होतं. मला त्यावेळी नेहमी वाटायचं की मितालीला माझ्याबद्दल प्रेम नाही तर त्या वयात आल्यावर स्वाभाविकपणे वाटणारं नुसतचं आकर्षण आहे. त्यामुळे मी तिला नेहमी टाळायचा प्रयत्न करायचो. तिच्याशी बोलताना कुणी बघितलं की दिवसभर मुलं मला तिच्या नावानं चिडवत बसायची. यामुळे मला कधी मजा यायची, तर कधी हीच गोष्ट नकोशी वाटायची. कधी कोणी मितालीबद्दल वाईट बोललं की मला चिडही यायची, पण तिच्याशी काही घेणंच नाही असं नकळत कित्येकदा माझ्या वागण्यावरुन तिला वाटायचं."
मिताली मात्र त्यावेळी माझ्यासाठी काहीही करायला
तयार असेल अशीच मला नेहमी वाटायची. पण कदाचित त्यावेळी मितालीच्या भावना मी समजू
शकलो नव्हतो. कारण हळूहळू मी श्वेतालीच्या विचारात गुंतत चाललो होतो. एकदा आमच्या
कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन होतं आणि पहिल्यांदा धाडस करुन मी श्वेतालीशी बोलायचं
ठरवलं. पण तिच्या टेबलजवळ नेहमी एकतर प्रदर्शन बघायला आलेल्या शाळेतल्या
मुला-मुलींची गर्दी असायची नाहीतर शिक्षक जवळ असायचे. अशातच थोडा एकांत
मिळण्यासाठी मी दिवसभर वाट बघायचो. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी माझ्या वाट
बघण्याला यश आलं. मितालीची नजर चुकवून मी आणि अक्षय श्वेतालीच्या टेबलावर गेलो आणि
तिला तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती विचारु लागलो. श्वेताली आम्हांला माहिती
सांगण्यात गुंग झाली होती आणि माझी नजर तिच्यावरुन हाटत नव्हती. आयुष्यात जणू
पहिल्यांदाच तिला मी डोळे भरुन बघत होतो. ती अशीच बोलत रहावी असं मला वाटत होतं.
पण नंतर अक्षय मला तेथून घेऊन गेला. त्यादिवसापासून मनात ठरवलं होतं की
श्वेतालीबरोबर किमान एकदा तरी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मिताली आणि मी एकाच
बॅचमध्ये होतो तर श्वेताली दुसऱ्या बॅचमध्ये असायची. त्यामुळे दररोज बोलायचा
प्रयत्न मला करताच येत नव्हता.
बॅचमध्ये मिताली माझ्याशी बोलत असली की जणू माझ्या डोक्यातून श्वेतालीचा विचार बाजूला जातोय असं मला वाटायचं. म्हणून मी मितालीला सोडून बाकीच्यांशी बोलायचो. मितालीचं मन यातून खूप वेळा दुखवलं जायचं. कितीतरी दिवस असंच चाललेलं असायचं. दहा पंधरा दिवसांतून एकदा दोन शब्द माझं आणि श्वेतालीचं बोलणं व्हायचं. यांदरम्यांन श्वेतालीची मैत्रिण शामली अक्षयला आवडायला लागली होती. अक्षयच्या मनाची स्थिती मला कळाली होती. आम्हां दोघांचीपण कमालच होती. दोघांनाही अशा मुली आवडल्या ज्या दोघीही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड होत्या. त्यावेळी एकदम खुल्लम-खुल्ला प्रपोज करणं म्हणजे रिस्की काम होतं. त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणींच्या मार्फत प्रेम व्यक्त व्हायचं. मितालीने सुध्दा अक्षयला सांगूनच मला प्रपोज केलं होतं. अशातच मितालीचा जेंव्हा वाढदिवस आला त्यावेळी मी कटाक्षाने तिला बर्थ डे विश करायचं टाळलं होतं. त्यादिवशी तिला माझा नक्कीच खूप राग आला असणार हे मला माहिती होतं. पण श्वेतालीशिवाय मला दुसरं काहीच सूचतच नसायचं. माझ्या अशा वागण्यानं मिताली दुखावली जायची हे मला कळायचं. पण मी मितालीला श्वेतालीबद्दल सांगू शकत नव्हतो. कारण इतक्या दिवसांनी श्वेताली माझ्याशी बोलायला लागली होती आणि कदाचित मितालीमुळे श्वेताली आपल्याशी बोलणार नाही असं मला वाटायचं.
कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे जवळ येत होता. इकडे माझ्या आणि अक्षयच्या मनात प्रेमाचा इंद्रधनुष्य चालला होता. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अक्षयने शामलीसाठी एक ग्रिटींग घेतलं होतं. त्याच्या मनाच्या सगळ्या भावना त्याने त्यात लिहल्या होत्या आणि ते ग्रिटींग शामलीला देण्यासाठी तो खूप आतूर झाला होता. मी पण अक्षयसारखं ग्रिटींग घेतलं होतं. शेवटी आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड होतो ना... साला दोघांनीही एकसारखं प्रपोज करायचं ठरवलं होतं. त्यादिवशी दिवसभर मिताली माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिला दिवसभर टाळलं. त्यामुळे कॉलेज सुटल्यानंतर मिताली लगेच निघून गेली. मला तर जणू रान मोकळंच असल्यासारखं वाटलं. श्वेताली आणि शामली निघाल्यावर मी आणि अक्षय दोघंही त्यांच्या मागून निघालो. कॉलेजजवळ असलेल्या सिध्दीविनायकच्या मंदीराजवळ येताच अक्षयने शामलीला आवाज दिला. शामली थांबल्यानंतर अक्षयच्या मनात भावना उचंबळून आल्या. त्या भावनेच्या भरात त्याने तिला प्रपोज करुन टाकलं. अक्षयच्या शेजारी मी आणि शामली सोबत असलेली श्वेताली आम्ही दोघंही अक्षयकडे आवाक होऊन बघत होतो. अक्षयचं बोलणं संपल्यावर शामली अक्षयला म्हणू लागली, "अरे, हे वय काय प्रेम करायचं असतं का? बारावीचं वर्ष आहे. करिअरचा विचार करायला पाहिजे ना..." असं बरंच काही शामलीनं अक्षयला सुनावलं होतं. अक्षयची तर बोलतीच बंद झाली होती. शामलीचा तो आक्रमक पवित्रा बघून माझी श्वेतालीसाठी घेतलेलं ग्रिटींग तिला देण्याची हिम्मतच झाली नाही. कदाचित त्यावेळी श्वेतालीला नक्कीच जाणवलं असावं की मीसुध्दा तिला प्रपोझ करणार होतो ते...! शामलीनं अक्षयला चांगलंच फैलावर घेऊन टाकलं, बिचाऱ्याची जणून ऐन वयात प्रेम करायची मस्तीच तिनं जीरवून टाकली होती असं म्हटलं तरी चालेल. त्या दोघी गेल्यानंतर अक्षयचा चेहरा केविलवाणा झाला होता. समोरच्या बिल्डींगमधून एका काकांनी घडलेला सगळा प्रकार बघितला होता, अक्षयला बघून ते त्याला बोलले, "काय यार, एका मुलीला प्रपोझ करता आलं नाही तुला?" अक्षय त्यांच्याकडे बघून नुसताच हसला. मला काय बोलावं हेच सुचेनासं झालं होतं, जणू श्वेतालीचं नाव मी जरा मनात जास्तच जपले होते. म्हणून की काय देवही त्याच्यावर रुसले होते असं मला वाटू लागलं होतं.
"शार्दुल, मला टेंशन यायला लागलं रे,
यार आपलं ठरलं होतं ना की त्या दोघींना प्रपोझ करायचं ते, मी प्रपोझ केलं आणि जणू
बळीचा बकरा झालो रे, तुझ्यासाठी मी तीचं इतकं बोलणं ऐकून घेतलं, मला वाटलं तू
श्वेतालीला प्रपोझ करशील. बाकीच्यांना मुलींना प्रपोज कसं करायचं सक्सेस फुल सल्ले
तुम्ही दिले, पण भाई तुम्ही मला दगा दिला. "दोस्त दोस्त ना रहा... प्यार
प्यार ना रहा." असं अक्षय बोलत होता. मलाही अक्षयबद्दल वाईट वाटलं होतं.
माझ्या एका शब्दाखातर त्याने शामलीला प्रपोझ करायचं, डोळं झाकून ठरवलं होतं.
त्यावेळी श्वेतालीसाठी मी स्वार्थीच होऊन गेलो असं अक्षयला वाटलं असतं तर नवलच
नव्हतं. मी अक्षयला समजावलं. अक्षयला माझ्या मनाची स्थिती माहित होती. तो माझा
बेस्ट फ्रेंड होता. माझ्यासाठी अगदी सख्ख्या भावापेक्षाही अक्षय जवळचा होता.
दुसऱ्या दिवशी वर्गात मग अक्षय आणि शामली जेंव्हा समोरासमोर आले त्यावेळी काही घडलं नाही असंच त्या दोघांकडे बघून जाणवलं. शामलीच्या प्रपोझची स्थिती पाहिल्यानंतर श्वेतालीला प्रपोझ केलं तर काय होईल याच्या कल्पनेनं माझं डोकं सुन्न होऊन जायचं. पुढचे काही दिवस मग श्वेतालीचा विचार माझ्या मनातून मावळत असल्यासारखं होतं होतं. त्याला कारण होती मिताली. मितालीवर आमच्याच वर्गातला एक मुलगा प्रेम करु लागला आणि या गोष्टीचा मला त्रास व्हायचा. इतके दिवस मितालीची पर्वा न करणाऱ्या माझ्या मनाला आता तिची काळजी वाटायची. मितालीवरच मी प्रेम करु लागलोय हे जणू त्या गोष्टीमुळे अक्षयला जाणवायचं.
कॉलेजमधील काही मुलं मला मितालीबद्दल नको नको त्या गोष्टी सांगत असायचे. एक दिवस मला मितालीपासून दूर करायचं या हेतूनं मला मारायला मुलं पण आली होती. त्यावेळी मी आणि अक्षय दोघंच होतो. मी त्यांच्याशी बोलून वेळ मारुन नेली. एकप्रकारे जीवावर जे आलं ते आता फक्त धमकीच्या रुपात राहिलं असं झालं. त्या दिवसापासून माझ्या मनात मितालीबद्दल असलेल्या भावना पेटून उठल्या. पण मितालीलाच आता माझ्यामध्ये काही रस नव्हता. हे जेंव्हा माझ्या लक्षात आलं तेंव्हा मी तिच्यावर खूप चिडलो होतो. तिला खूप घालून पाडून बोललो होतो. काय करणार शेवटी, माणूस होतो ना ! ती कशी का असेना, माझ्यावर प्रेम करायची आणि प्रेम करणारी माणसं अशी निघून गेली की दु:ख होणारच. असो, तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे अशी अवस्था माझी झाली असं अक्षय म्हणायचा. बोर्डाच्या परीक्षेमुळं अभ्यासावरही लक्ष देण गरजेचं असायचं. पण आयुष्यात अशी एकामागून एक वादळं आली आणि मी यात केंव्हा कोलमडेल याची मला खात्री नव्हती.
बारावीची परीक्षा झाल्यानंतर सी.ई.टी. च्या
क्लासला देखील मी आणि मिताली एकाच क्लासला होतो. जणून मनाला लागलेली जखम दररोज
उघडी पडायची. मिताली आणि आपल्यात हे असं का झालं याचं विचारानं मला नेहमी वाईट
वाटायचं. अक्षयही त्याच्या आयुष्यातील त्या धक्क्यातून सावरुन गेला होता. बारावीचा
आणि सी.ई.टी. चा निकाल लागल्यानंतर वर्गातील मुला-मुलींचा एकमेकांशी संपर्क तुटून
गेला होता. अक्षयकडून मला कळालं की मिताली अजूनही आपल्या शहरात आहे. पण श्वेतालीचं
काय झालं याची त्याला माहिती नव्हती. करिअरसाठी मी सगळ्यांपेक्षा वेगळीच वाट
निवडली होती. मी ज्या कॉलेजला होतो, त्याच्या शेजारच्या कॉलेजच्या कँपसमध्ये रोज
मला कितीतरी प्रेमी युगुलं दिसायची आणि त्यांना बघितलं की मला श्वेतालीची आठवण
यायची. कॉलेजमधले कोणी मित्र-मैत्रिणी भेटली की आठवणीनं श्वेतालीची चौकशी करायचो,
आणि एक दिवस मला श्वेताली कोणत्या फिल्डमध्ये आहे, कोणत्या गावांत आहे ते कळालं.
तिच्या आठवणींची आठवण काढण्याच्या सवयीमुळे मला कविता करण्याचा छंद जडला. प्रेमात
पडला की माणूस नक्की कवी होतो हे मला बघितलं की खरचं वाटायचं, असं अक्षय म्हणायचा.
माझ्या कॉलेजमध्ये हळूहळू मी त्या कवितांमुळे विध्यार्थी वर्गात लाडका बनलो होतो. शार्दुलची नक्कीच गर्लफ्रेंड असणार असं कॉलेज मधल्या प्रत्येकाला वाटायचं. मीसुध्दा नेहमी त्यांना तसंच भासवायचोख् कारण मी अजूनही मनात श्वेतालीला माझी गर्लफ्रेंड मानायचो. त्यावेळी कॉलेजमध्ये श्वेतालीसाठी कविता करण्यात मी पुरताच रमून जायचो, हळूहळू माझ्या कविता करण्याच्या छंदाबरोबर मला नाटक लिहायचा छंद लागला. लिखानाच्या वेडाने मला पुरतच झपाटून टाकलं होतं. त्यावेळी माझ्याकडे ना तिचा फोटो होता ना तिचा कॉन्टॅक्ट नंबर. फक्त कॉलेजमधल्या आठवणींची शिदोरी घेऊन मी माझं कॉलेज लाईफ जगत होतो. एक दिवस श्वेताली त्यला भेटेलच या आशेने माझ मन अजूनही तिची वाटत बघत होते. अक्षयनेही शामलीशिवाय दुसऱ्या कुणाचा कधी विचार केला नव्हता. मी रोज प्रार्थना करायचा की एक दिवस श्वेतालीची आणि माझी भेट होऊ दे. पण कॉलेजच्या चार वर्षांत एकदाही तसा प्रसंग आलाच नाही.
मी शेवटच्या वर्षाला असताना एक दिवस मला मितालीला भेटावसं वाटलं, मी तिच्या मावस बहिणीकडे मितालीची चौकशी केली. मितालीने पण मला भेटण्याची तयारी दाखविली. मितालीच्या वाढदिवसाच्या चार दिवस अगोदर माझी आणि मितालीची भेट झाली. साधारण एक अर्धा तास आम्ही दोघ एकमेकांशी बोलत होतो. कॉलेजमधल्या गमती-जमती एकमेकांसोबत शेअर करत होतो. पण दोघांपैकी कुणीच एकमेकांना आमच्या रिलेशनशिपबाबत विचारलं नाही. मितालीच्या वाढदिवशी यावेळी पहिल्यांदाच मी तिला विश केलं. तिनं तिच्या बर्थ डे पार्टीसाठी मला बोलावलं होतं. पण काहीतरी कारण संगून मी नाही गेलो. त्या दिवसानंतर पुन्हा मी मितालीसोबत कॉन्टॅक्ट ठेवला नाही. श्वेतालीवर असलेल्या प्रेमासाठी तसं केलं होतं.
चार वर्षांचा कालावधी खूप मोठा होता. पुलाखालून पाणी निघून गेलेलं आहे याची मला चांगलीच कल्पना होती. पण अजूनही श्वेतालीसाठी माझ्या मनात असलेली प्रेमाची ज्योत अजूनही तितक्याच उमेदीनं जळत होती. चार वर्षांपासून मी तिची वाट बघत होतो. ह्याचं नवल अक्षयला वाटायचं. माणूस प्रेमासाठी काहीपण करायला तयार होतो. म्हणून प्रसंगी देवही त्याच्यापुढे झुकतो असं मी म्हणतो ते चुकीचं नाही. कारण तब्बल चार वर्षानंतर मला श्वेतालीने मॅसेज केला होता. एका सोशल नेटवर्कींग साईटच्या माध्यमातून तिला माझा नंबर मिळाला. माझ्या जीवनाला तर नवीन संजीवनीच मिळाली होती. आता मला तिच्याशी केंव्हाही बोलता येण्यासारखं होतं. मी तिच्यावर प्रेम करतो हे सांगता येणार होतं. पण तरीही मी अजून तिच्याशी बोललो नव्हतो. तिच्यावर प्रेम करतो हे आजही तिला सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. कारण नुसत्या शब्दांनी मला माझं प्रेम व्यक्त करायचं नव्हतं. माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं होतं पण श्वेताली पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. पुढच्या शिक्षणासाठी मला माझ्या फिल्डमधील सर्वोत्तम कॉलेज मिळालं होतं. त्या दिवशी मी खूप आनंदात होतो. त्या आनंदाच्या भरातच मी श्वेतालीला मॅसेज करुन मी तिच्यावर प्रेम करतो असं घाबरत का होईना सांगितलं. पण तिचा प्रेमावर विश्वासच नाही आणि तसल्या भानगडीत तिला पडायचं नाही असं तिनं मला सांगितलं. माझ्या हृदयाची किती शकले झाली होती हे मलाच माहिती होतं. त्यानुसार मी एकाकी खूप आजारी पडलो. त्यामुळे मी मला मिळालेल्या कॉलेजमधून प्रवेश मागे घेतला. दोन महिने आजारपणात काढल्यानंतर मी वर्षभर घीरच बसण्यापेक्षा जॉबला जाऊ लागलो. मी मुद्दाम नाईट शिफ्ट निवडली होती. आता मी आणि श्वेताली रोज एकमेकांशी रात्री तासन-तास बोलू लागलो होतो. दररोज घडलेल्या दिवसभरातील गप्पांत आम्ही गुंतून जायचो. मी तिला माझ्या कॉलेजची जॉबची मजा सांगायचो. ती मला तिच्या कॉलेजमधल्या गमतीजमती सांगायची. माझं जीवन आता पूर्णपणे श्वेतालीमय झालं होतं. आज रात्री श्वेतालीला काय सांगाव याचाच दिवसभर विचार करत माझ्या मनात असायचा. दरम्यान दिवाळीच्या सुट्टीत श्वेताली घरी आली आणि साडे चार वर्षानंतर तिची आणि माझी भेट झाली. पण तीसुध्दा काही क्षणांसाठीच. श्वेतालीसोबत तिची मैत्रिण होती आणि तिला घरी जायचं होतं त्यामुळे ती पटकन निघून गेली. पण इतक्या दिवसानंतर ती मला दिसली होती. त्यामुळे मी त्या दिवशी खूप खूश होतो. कधी कधी श्वेताली तिच्या कॉलेजच्या गमती जमती सांगत असायची आणि मलाही तिलापण खूप काही सांगायला असायचे. त्यामुळे मी तिचं बोलणं मध्येच थांबवायचो आणि मग श्वेताली माझ्यावर रागवायची व फोन कट करायची. मग मी तिला किती वेळा सॉरी म्हणायचो. तिला मनवण्यासाठी नको नको ती शक्कल लढवायचो. काय करणार शेवटी? माझं मन अजूनही तिच्याकडं गहाण होतं ना. आयुष्यात कुणापुढे झुकलो नाही पण तिच्यापुढे माझा अहंकारही झुकायचा. चूक झाली तरी मान्य करायची आणि बरोबर असलं तरी गप्प रहायचं हे त्यावेळी मला बरोबर वाटायचं. कारण अशानंच नाती टिकतात.
एक दिवस मी कामात व्यस्त असताना श्वेतालीचा
मिस कॉल आला. त्यावेळी मी तिला मॅसेज म्हणून तिची एक चारोळी पाठविली. तशी चारोळी
का पाठविली असं श्वेतालीनं विचारलं आणि जोश जोश मध्ये येऊन मी सांगितलं की
तिच्यासाठी लिहलेल्या कादंबरीतलं वाक्य आहे ते. श्वेतालीला आनंद झाला की मी
कादंबरी लिहतोय. पण त्यावेळी खरं सांगायचं तर मी कादंबरीचा क पण लिहला नव्हता.
त्या दिवशी अख्खी रात्र मी जागा होतो. श्वेतालीला सांगितलंय की आपण कादंबरी लिहतोय
पण आपण तर एक शब्द पण अजून लिहला नाहीये, हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता.
शेवटी प्रेमासमोर देवही झुकला असं मला वाटलं कारण त्याच रात्री कादंबरीची कथा सुचली
आणि शब्दही तितक्याच तत्परतेने सुचत गेले. शेवटी माझ्याच आयुष्याचीच तर कथा होती
ती...!
दुसऱ्या दिवशी मी तिला त्या कादंबरीची सुरवातीची
काही पाने वाचून दाखविली. त्या कादंबरीचा नायक तिला हवाहवासा वाटला, तसं ती त्याला
बोललीसुध्दा. त्यावेळी तिला कोण समजवणार होतं की तो कादंबरीचा नायक मीच होते ते?
असेच मग एक एक दिवस सरत होते. मी श्वेतालीसाठी ती कादंबरी पूर्ण
करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होतो. कादंबरीची एक एक ओळ लिहीत असताना समोर
श्वेतालीच आहे असे समजून मी लिहीत गेलो. मी आणि श्वेताली जर आज सोबत असतो तर मी
तिच्यासोबत कसा जगलो असतो तिच्यासाठी काय काय केलं असतं, हेच मला त्या कादंबरीत
दाखवायचं होतं. एक दिवस ती मला म्हणाली, "शार्दुल, माझ्यावर एक कविता कर ना?" त्या दिवशी मी माझ्या आजपर्यंतच्या सगळ्या कविता जाळल्या होत्या.
जणू त्या कवितांच्या राखेतून अशी कविता बाहेर यावी ज्यातून तिला माझ्या मनाच्या
भावना कळतील असं वाटायचं. पण आजही तिच्याशिवाय मला काही दिसतच नाही. म्हणूनच की
काय तिच्याबद्दल असलेल्या भावना लिहायला शब्दच सुचत नाही."
"शार्दुल सर, मग हे सगळं तुम्ही त्यांना का सांगत नाही? तुमच्या कविता आणि विचार ऐकले की आम्हाला नवी उमेद मिळाली आणि प्रत्यक्षात तुम्हीच एकप्रकारे एकतर्फी प्रेमात आहात? सरप्रायझिंग आहे सगळं?" असं एक मुलगा शार्दुलला बोलला. बाकीच्यांच्या नजराही जणू शार्दुलला तोच प्रश्न विचारत होत्या असं जाणवत होतं. एका श्वेतालीसाठी काहीही करायला तयार असलेला शार्दुल तिला तिच्यावर प्रेम करतो हेच सांगू शकत नव्हता. ह्या गोष्टींवर जमलेल्यांचा विश्वास बसत नव्हता. प्रश्न विचारणाऱ्या मुलाकडे शार्दुलने एकक्षण बघितलं आणि तो हलकेच हसला.
"मित्रा, मी जिच्यावर प्रेम करतो ती
श्वेताली तिच्या आई-वडीलांसाठी अनमोल अशी राजकुमारी आहे आणि तिचे आई-वडील
तिच्यासाठी नक्की तिचा परफेक्ट राजकुमार शोधतीलच. मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे. मग
तिचा प्रियकर का बनू शकत नाही? तिच्या स्वप्नातला राजकुमार का नाही बनू शकत हे मी तिला कधीच विचारणार
नाही कारण मला माहिती आहे की अजून तिच्यासाठी परफेक्ट नाहीये...! म्हणूनच मी तिच्यावर असं
निस्वार्थ प्रेम करत होतो, करत आहे आणि करत राहीन. तिच्यासाठी परफेक्ट होईपर्यंत
माझं प्रेम असंच आयुष्यभर तिची वाट बघत राहिल. माझ्या या प्रेमाला तुम्ही
शोकांतिका ठरवू नका. त्याला नुसतं निस्वार्थी प्रेमच असू द्या... कसं आहे,
आयुष्यात प्रत्येकाला त्याचं खरं प्रेम मिळेलच असं नसतं, पण कुणावर तरी आपलं प्रेम
असावं इतकच कारण जगण्याला पुरेसं असतं...!"
असं शार्दुल बोलून गप्प झाला. एक मिनिट सर्वच शांत
होते आणि मग टाळ्यांचा कडकडाट केला आणि जणू शार्दुलच्या भावनांचा आपण आदर करतोय
असं दाखवून दिलं.
आजही आपल्या सभोवताली कित्येक असे शार्दुल
असतील ज्यांना बघितलं की खरंच कुणाच्यातरी प्रेमात पडावं असं वाटत नाही का? कदाचित आयुष्यात शार्दुलला त्याची श्वेताली
भेटेलही वा भेटणारही नाही पण श्वेतालीवरचं असलेलं त्याचं प्रेम सदैव असेच राहू दे
हीच देवाकडे प्रार्थना...! प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस
म्हणून हल्ली व्हॅलेंटाईन डे चं महत्व वाढतंय. पण आजकाल जितक्या लवकर मेक अप होतं,
तितक्याच लवकर ब्रेक-अप सुध्दा होतं. डोकं वापरुन वाट्टेल तितक्या
मुलींबरोबर अफेअर करण्यापेक्षा जी आपल्यावर मनापासून प्रेम करते तिच्यावरच सर्वार्थाने
प्रेम करायला शिका हेच मला
सांगायचं आहे.
आज तब्बल पाच वर्षे होऊन जातील त्या गोष्टीला. माझ्या आयुष्यातला पहिला व्हॅलेंटाईन डे होता तो...! त्यादिवशी कॉलेजमध्ये आल्यावर जणू माझ्या प्रेमाची गुलाबी धुंदी पसरलेली होती. प्रेमाच्या वसंताने माझं सर्वांग रोमांचित झालं असं वाटत होतं. वळीवाच्या पावसात भिजल्यासारखाच मी दिसत होतो. चहूकडे भिरभिरणारी माझी नजर आज खूपच चंचल असल्यासारखी वाटत होती. समोरुन येणाऱ्या प्रत्येकाकडे बघून आज मी स्मितहास्य करत होतो. जणू प्रत्येकात त्याला तिचाच चेहरा बघत होतो. कुठूनतरी तिचा मंजूळ आवाज येईल आणि तो टिपण्यासाठी माझे कान आसुरलेले होते. अगदी हळूवारपणे श्वास घेत होतो. जणू प्रत्येक श्वासाआधी तिचीच आठवण काढत होतो. माझा जीवलग मित्र माझ्या शेजारीच होता. त्याला सर्वकाही कळत होतं. कारण माझ्या प्रेमाचं गुपीत फक्त त्यालाच तर माहित होतं."
"भाई, श्वेताली आली," असं अक्षय बोलल्यावर माझ लक्ष तिच्याकडं गेलं. खरचं श्वेताली शिवाय दुसऱ्या कोणावर मी प्रेम करु शकत नाही रे," असं मी अक्षयला बोललो. "अरे पण मितालीचं काय शार्दुल?" असं अक्षयच्या बोलण्याला कल्पनेच्या आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारं माझं मन वास्तवाच्या जमिनीवर येऊन कोसळलं. मिताली ही अकरावीपासून माझ्या प्रेमात पडली होती. आमच्या कॉलेजमधला मी पहिलाच असा मुलगा होतो ज्याला स्वत:हून एका मुलीने प्रपोज केलं होतं. त्यामुळे आमच्या प्रेमाबद्दल सगळ्या कॉलेजच्या मुलामुलींनाच काय पण शिक्षकांनाही माहिती होतं. मला त्यावेळी नेहमी वाटायचं की मितालीला माझ्याबद्दल प्रेम नाही तर त्या वयात आल्यावर स्वाभाविकपणे वाटणारं नुसतचं आकर्षण आहे. त्यामुळे मी तिला नेहमी टाळायचा प्रयत्न करायचो. तिच्याशी बोलताना कुणी बघितलं की दिवसभर मुलं मला तिच्या नावानं चिडवत बसायची. यामुळे मला कधी मजा यायची, तर कधी हीच गोष्ट नकोशी वाटायची. कधी कोणी मितालीबद्दल वाईट बोललं की मला चिडही यायची, पण तिच्याशी काही घेणंच नाही असं नकळत कित्येकदा माझ्या वागण्यावरुन तिला वाटायचं."
बॅचमध्ये मिताली माझ्याशी बोलत असली की जणू माझ्या डोक्यातून श्वेतालीचा विचार बाजूला जातोय असं मला वाटायचं. म्हणून मी मितालीला सोडून बाकीच्यांशी बोलायचो. मितालीचं मन यातून खूप वेळा दुखवलं जायचं. कितीतरी दिवस असंच चाललेलं असायचं. दहा पंधरा दिवसांतून एकदा दोन शब्द माझं आणि श्वेतालीचं बोलणं व्हायचं. यांदरम्यांन श्वेतालीची मैत्रिण शामली अक्षयला आवडायला लागली होती. अक्षयच्या मनाची स्थिती मला कळाली होती. आम्हां दोघांचीपण कमालच होती. दोघांनाही अशा मुली आवडल्या ज्या दोघीही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड होत्या. त्यावेळी एकदम खुल्लम-खुल्ला प्रपोज करणं म्हणजे रिस्की काम होतं. त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणींच्या मार्फत प्रेम व्यक्त व्हायचं. मितालीने सुध्दा अक्षयला सांगूनच मला प्रपोज केलं होतं. अशातच मितालीचा जेंव्हा वाढदिवस आला त्यावेळी मी कटाक्षाने तिला बर्थ डे विश करायचं टाळलं होतं. त्यादिवशी तिला माझा नक्कीच खूप राग आला असणार हे मला माहिती होतं. पण श्वेतालीशिवाय मला दुसरं काहीच सूचतच नसायचं. माझ्या अशा वागण्यानं मिताली दुखावली जायची हे मला कळायचं. पण मी मितालीला श्वेतालीबद्दल सांगू शकत नव्हतो. कारण इतक्या दिवसांनी श्वेताली माझ्याशी बोलायला लागली होती आणि कदाचित मितालीमुळे श्वेताली आपल्याशी बोलणार नाही असं मला वाटायचं.
कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे जवळ येत होता. इकडे माझ्या आणि अक्षयच्या मनात प्रेमाचा इंद्रधनुष्य चालला होता. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अक्षयने शामलीसाठी एक ग्रिटींग घेतलं होतं. त्याच्या मनाच्या सगळ्या भावना त्याने त्यात लिहल्या होत्या आणि ते ग्रिटींग शामलीला देण्यासाठी तो खूप आतूर झाला होता. मी पण अक्षयसारखं ग्रिटींग घेतलं होतं. शेवटी आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड होतो ना... साला दोघांनीही एकसारखं प्रपोज करायचं ठरवलं होतं. त्यादिवशी दिवसभर मिताली माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिला दिवसभर टाळलं. त्यामुळे कॉलेज सुटल्यानंतर मिताली लगेच निघून गेली. मला तर जणू रान मोकळंच असल्यासारखं वाटलं. श्वेताली आणि शामली निघाल्यावर मी आणि अक्षय दोघंही त्यांच्या मागून निघालो. कॉलेजजवळ असलेल्या सिध्दीविनायकच्या मंदीराजवळ येताच अक्षयने शामलीला आवाज दिला. शामली थांबल्यानंतर अक्षयच्या मनात भावना उचंबळून आल्या. त्या भावनेच्या भरात त्याने तिला प्रपोज करुन टाकलं. अक्षयच्या शेजारी मी आणि शामली सोबत असलेली श्वेताली आम्ही दोघंही अक्षयकडे आवाक होऊन बघत होतो. अक्षयचं बोलणं संपल्यावर शामली अक्षयला म्हणू लागली, "अरे, हे वय काय प्रेम करायचं असतं का? बारावीचं वर्ष आहे. करिअरचा विचार करायला पाहिजे ना..." असं बरंच काही शामलीनं अक्षयला सुनावलं होतं. अक्षयची तर बोलतीच बंद झाली होती. शामलीचा तो आक्रमक पवित्रा बघून माझी श्वेतालीसाठी घेतलेलं ग्रिटींग तिला देण्याची हिम्मतच झाली नाही. कदाचित त्यावेळी श्वेतालीला नक्कीच जाणवलं असावं की मीसुध्दा तिला प्रपोझ करणार होतो ते...! शामलीनं अक्षयला चांगलंच फैलावर घेऊन टाकलं, बिचाऱ्याची जणून ऐन वयात प्रेम करायची मस्तीच तिनं जीरवून टाकली होती असं म्हटलं तरी चालेल. त्या दोघी गेल्यानंतर अक्षयचा चेहरा केविलवाणा झाला होता. समोरच्या बिल्डींगमधून एका काकांनी घडलेला सगळा प्रकार बघितला होता, अक्षयला बघून ते त्याला बोलले, "काय यार, एका मुलीला प्रपोझ करता आलं नाही तुला?" अक्षय त्यांच्याकडे बघून नुसताच हसला. मला काय बोलावं हेच सुचेनासं झालं होतं, जणू श्वेतालीचं नाव मी जरा मनात जास्तच जपले होते. म्हणून की काय देवही त्याच्यावर रुसले होते असं मला वाटू लागलं होतं.
दुसऱ्या दिवशी वर्गात मग अक्षय आणि शामली जेंव्हा समोरासमोर आले त्यावेळी काही घडलं नाही असंच त्या दोघांकडे बघून जाणवलं. शामलीच्या प्रपोझची स्थिती पाहिल्यानंतर श्वेतालीला प्रपोझ केलं तर काय होईल याच्या कल्पनेनं माझं डोकं सुन्न होऊन जायचं. पुढचे काही दिवस मग श्वेतालीचा विचार माझ्या मनातून मावळत असल्यासारखं होतं होतं. त्याला कारण होती मिताली. मितालीवर आमच्याच वर्गातला एक मुलगा प्रेम करु लागला आणि या गोष्टीचा मला त्रास व्हायचा. इतके दिवस मितालीची पर्वा न करणाऱ्या माझ्या मनाला आता तिची काळजी वाटायची. मितालीवरच मी प्रेम करु लागलोय हे जणू त्या गोष्टीमुळे अक्षयला जाणवायचं.
कॉलेजमधील काही मुलं मला मितालीबद्दल नको नको त्या गोष्टी सांगत असायचे. एक दिवस मला मितालीपासून दूर करायचं या हेतूनं मला मारायला मुलं पण आली होती. त्यावेळी मी आणि अक्षय दोघंच होतो. मी त्यांच्याशी बोलून वेळ मारुन नेली. एकप्रकारे जीवावर जे आलं ते आता फक्त धमकीच्या रुपात राहिलं असं झालं. त्या दिवसापासून माझ्या मनात मितालीबद्दल असलेल्या भावना पेटून उठल्या. पण मितालीलाच आता माझ्यामध्ये काही रस नव्हता. हे जेंव्हा माझ्या लक्षात आलं तेंव्हा मी तिच्यावर खूप चिडलो होतो. तिला खूप घालून पाडून बोललो होतो. काय करणार शेवटी, माणूस होतो ना ! ती कशी का असेना, माझ्यावर प्रेम करायची आणि प्रेम करणारी माणसं अशी निघून गेली की दु:ख होणारच. असो, तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे अशी अवस्था माझी झाली असं अक्षय म्हणायचा. बोर्डाच्या परीक्षेमुळं अभ्यासावरही लक्ष देण गरजेचं असायचं. पण आयुष्यात अशी एकामागून एक वादळं आली आणि मी यात केंव्हा कोलमडेल याची मला खात्री नव्हती.
माझ्या कॉलेजमध्ये हळूहळू मी त्या कवितांमुळे विध्यार्थी वर्गात लाडका बनलो होतो. शार्दुलची नक्कीच गर्लफ्रेंड असणार असं कॉलेज मधल्या प्रत्येकाला वाटायचं. मीसुध्दा नेहमी त्यांना तसंच भासवायचोख् कारण मी अजूनही मनात श्वेतालीला माझी गर्लफ्रेंड मानायचो. त्यावेळी कॉलेजमध्ये श्वेतालीसाठी कविता करण्यात मी पुरताच रमून जायचो, हळूहळू माझ्या कविता करण्याच्या छंदाबरोबर मला नाटक लिहायचा छंद लागला. लिखानाच्या वेडाने मला पुरतच झपाटून टाकलं होतं. त्यावेळी माझ्याकडे ना तिचा फोटो होता ना तिचा कॉन्टॅक्ट नंबर. फक्त कॉलेजमधल्या आठवणींची शिदोरी घेऊन मी माझं कॉलेज लाईफ जगत होतो. एक दिवस श्वेताली त्यला भेटेलच या आशेने माझ मन अजूनही तिची वाटत बघत होते. अक्षयनेही शामलीशिवाय दुसऱ्या कुणाचा कधी विचार केला नव्हता. मी रोज प्रार्थना करायचा की एक दिवस श्वेतालीची आणि माझी भेट होऊ दे. पण कॉलेजच्या चार वर्षांत एकदाही तसा प्रसंग आलाच नाही.
मी शेवटच्या वर्षाला असताना एक दिवस मला मितालीला भेटावसं वाटलं, मी तिच्या मावस बहिणीकडे मितालीची चौकशी केली. मितालीने पण मला भेटण्याची तयारी दाखविली. मितालीच्या वाढदिवसाच्या चार दिवस अगोदर माझी आणि मितालीची भेट झाली. साधारण एक अर्धा तास आम्ही दोघ एकमेकांशी बोलत होतो. कॉलेजमधल्या गमती-जमती एकमेकांसोबत शेअर करत होतो. पण दोघांपैकी कुणीच एकमेकांना आमच्या रिलेशनशिपबाबत विचारलं नाही. मितालीच्या वाढदिवशी यावेळी पहिल्यांदाच मी तिला विश केलं. तिनं तिच्या बर्थ डे पार्टीसाठी मला बोलावलं होतं. पण काहीतरी कारण संगून मी नाही गेलो. त्या दिवसानंतर पुन्हा मी मितालीसोबत कॉन्टॅक्ट ठेवला नाही. श्वेतालीवर असलेल्या प्रेमासाठी तसं केलं होतं.
चार वर्षांचा कालावधी खूप मोठा होता. पुलाखालून पाणी निघून गेलेलं आहे याची मला चांगलीच कल्पना होती. पण अजूनही श्वेतालीसाठी माझ्या मनात असलेली प्रेमाची ज्योत अजूनही तितक्याच उमेदीनं जळत होती. चार वर्षांपासून मी तिची वाट बघत होतो. ह्याचं नवल अक्षयला वाटायचं. माणूस प्रेमासाठी काहीपण करायला तयार होतो. म्हणून प्रसंगी देवही त्याच्यापुढे झुकतो असं मी म्हणतो ते चुकीचं नाही. कारण तब्बल चार वर्षानंतर मला श्वेतालीने मॅसेज केला होता. एका सोशल नेटवर्कींग साईटच्या माध्यमातून तिला माझा नंबर मिळाला. माझ्या जीवनाला तर नवीन संजीवनीच मिळाली होती. आता मला तिच्याशी केंव्हाही बोलता येण्यासारखं होतं. मी तिच्यावर प्रेम करतो हे सांगता येणार होतं. पण तरीही मी अजून तिच्याशी बोललो नव्हतो. तिच्यावर प्रेम करतो हे आजही तिला सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. कारण नुसत्या शब्दांनी मला माझं प्रेम व्यक्त करायचं नव्हतं. माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं होतं पण श्वेताली पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. पुढच्या शिक्षणासाठी मला माझ्या फिल्डमधील सर्वोत्तम कॉलेज मिळालं होतं. त्या दिवशी मी खूप आनंदात होतो. त्या आनंदाच्या भरातच मी श्वेतालीला मॅसेज करुन मी तिच्यावर प्रेम करतो असं घाबरत का होईना सांगितलं. पण तिचा प्रेमावर विश्वासच नाही आणि तसल्या भानगडीत तिला पडायचं नाही असं तिनं मला सांगितलं. माझ्या हृदयाची किती शकले झाली होती हे मलाच माहिती होतं. त्यानुसार मी एकाकी खूप आजारी पडलो. त्यामुळे मी मला मिळालेल्या कॉलेजमधून प्रवेश मागे घेतला. दोन महिने आजारपणात काढल्यानंतर मी वर्षभर घीरच बसण्यापेक्षा जॉबला जाऊ लागलो. मी मुद्दाम नाईट शिफ्ट निवडली होती. आता मी आणि श्वेताली रोज एकमेकांशी रात्री तासन-तास बोलू लागलो होतो. दररोज घडलेल्या दिवसभरातील गप्पांत आम्ही गुंतून जायचो. मी तिला माझ्या कॉलेजची जॉबची मजा सांगायचो. ती मला तिच्या कॉलेजमधल्या गमतीजमती सांगायची. माझं जीवन आता पूर्णपणे श्वेतालीमय झालं होतं. आज रात्री श्वेतालीला काय सांगाव याचाच दिवसभर विचार करत माझ्या मनात असायचा. दरम्यान दिवाळीच्या सुट्टीत श्वेताली घरी आली आणि साडे चार वर्षानंतर तिची आणि माझी भेट झाली. पण तीसुध्दा काही क्षणांसाठीच. श्वेतालीसोबत तिची मैत्रिण होती आणि तिला घरी जायचं होतं त्यामुळे ती पटकन निघून गेली. पण इतक्या दिवसानंतर ती मला दिसली होती. त्यामुळे मी त्या दिवशी खूप खूश होतो. कधी कधी श्वेताली तिच्या कॉलेजच्या गमती जमती सांगत असायची आणि मलाही तिलापण खूप काही सांगायला असायचे. त्यामुळे मी तिचं बोलणं मध्येच थांबवायचो आणि मग श्वेताली माझ्यावर रागवायची व फोन कट करायची. मग मी तिला किती वेळा सॉरी म्हणायचो. तिला मनवण्यासाठी नको नको ती शक्कल लढवायचो. काय करणार शेवटी? माझं मन अजूनही तिच्याकडं गहाण होतं ना. आयुष्यात कुणापुढे झुकलो नाही पण तिच्यापुढे माझा अहंकारही झुकायचा. चूक झाली तरी मान्य करायची आणि बरोबर असलं तरी गप्प रहायचं हे त्यावेळी मला बरोबर वाटायचं. कारण अशानंच नाती टिकतात.
"शार्दुल सर, मग हे सगळं तुम्ही त्यांना का सांगत नाही? तुमच्या कविता आणि विचार ऐकले की आम्हाला नवी उमेद मिळाली आणि प्रत्यक्षात तुम्हीच एकप्रकारे एकतर्फी प्रेमात आहात? सरप्रायझिंग आहे सगळं?" असं एक मुलगा शार्दुलला बोलला. बाकीच्यांच्या नजराही जणू शार्दुलला तोच प्रश्न विचारत होत्या असं जाणवत होतं. एका श्वेतालीसाठी काहीही करायला तयार असलेला शार्दुल तिला तिच्यावर प्रेम करतो हेच सांगू शकत नव्हता. ह्या गोष्टींवर जमलेल्यांचा विश्वास बसत नव्हता. प्रश्न विचारणाऱ्या मुलाकडे शार्दुलने एकक्षण बघितलं आणि तो हलकेच हसला.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा