ही कथा
आहे
निकीता आणि
संजयची.
आज
सात
वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर आनंद ओलांडून वाहत होता.
किती दिवसांची प्रतिक्षा आज
तिला संपल्यासारखी वाटत होती.अगोदर तीच संजयवर एकतर्फी प्रेम करत होती. ते क्लासमध्ये
नवीन असल्यापासून.
तिला तो
खूप
आवडायचा पण
तिने कधीच त्याला ते
सांगायची हिम्मत केली नव्हती.
तो
तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर दिसायचा.
तिला बाकी काहीच माहित नव्हतं त्याच्याबद्दल आणि
स्वभावाने खूप
लाजाळू असल्यामुळे तिने त्याच्याबद्दल कधी
तिच्या मैत्रिणींकडे सुध्दा विषय काढला नाही.
पण
तिने शेवटी ठरवले की
क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला सांगायचे की
माझं तुझ्यावर खूप
प्रेम आहे
आणि
मला
तू
खूप
आवडतोस.
क्लासचा शेवटचा दिवस होता
25 मार्च.
पण
त्या आधीच एक
आठवडा संजयचा अपघात झाला होता आणि
तो
त्या अपघातामुळे शेवटची परीक्षापण देऊ
शकला नाही.
त्यामुळे त्याचे क्लासला येणंच काय
तर
घरातून बाहेर पडणं पण
बंद
झालं.
तिने खूप
प्रयत्न केले त्याच्याशी संपर्क करण्याचा.
पत्ता शोधून ती
त्याला घरी
भेटायला पण
गेली.
पण
आता
ते
तिला विचारणं शक्यच नव्हतं.
तिने विचार केला की,
हा
ह्याच्यातून बरा
झाला की
नक्की विचारु.
पण
त्याच वर्षी संजय ते
शहर
सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला आणि
निकिताच्या सर्व आशा
आकांक्षा धुळीत मिसळल्या.
ती
खूप
रडली.
जमेल तितका प्रयत्न केला तिला शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला
तिनं हे
न
सांगितल्यामुळे तिला कुणाची मदत
पण
नाही मिळाली.
आता
त्या गोष्टीला सात
वर्षे झाली होती.अजूनही तिनं मनातून संजयलाच लाईफ पार्टनर म्हणून निवडलं होतं. तिनं फेसबुकवर
अकाऊंट बनवलं होतं.
तिला मैत्रिणींकडून कळालं होत
की
आपले सर्व शाळेतील मित्र-मैत्रिणी
फेसबुकवर आहेत.
म्हणून तिनेही सर्च केलं आणि
तिला संजयचं प्रोफाईल दिसलं.
तिनं त्याला रिक्वेस्ट पाठविली आणि
बरोबर मॅसेज करुन आपली ओळख
करुन दिली.
त्याच दिवशी संजयने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली.
तिने संजयकडे त्याचा नंबर मागितला होता.
तो
त्याने तिला दिला.
मग
तिने त्याला कॉल
करुन खूप
गप्पा मारल्या क्लासमधल्या गमती-जमतींच्या
आणि
तिने संजयला भेटायला बोलवलं.
संजयने तिला सांगितलं की
तो
आज
खूप
कामात व्यस्त आहे.
तर
आपण
उद्या भेटू.
“मी तुला ओळखलंच नाही. कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता पूर्णपणे वेगळी.” “हो रे… थोडा बदल झालाय खरा. पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस. कसं चाललंय?” “माझं एकदम मजेत, अजून कोणी आहे का तुझ्या संपर्कात क्लासमधले.” “हो रे… त्या क्लासमधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू अचानक गायब झालास.” “हो गं… नवीन घर घेतलं होतं आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्या वर्षी आणि म्हणून… झालो एकदम अचानक…” “लग्न कधी करतेस? का झालंपण?” “नाही रे… अजून नाही… कुणाचीतरी वाट बघतेय म्हणून अजून थांबलेय लग्नासाठी. पण आता विचार सुरु आहे. बघू कदाचित लवकरच… ये पण तुझं झालं का लग्न” “मागच्या वर्षी झालं… लव मॅरेज…जरा लवकरच झालं. पण जो होता है वो अच्छे के लिए होता है…असा विचार केला आणि लग्न केलं” बस… त्यानंतर निकिता फक्त रडायची बाकी होती. तिने कसतरी पटापट तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. संजयला पण थोडं विचित्र वाटलं. पण त्यालाही घाई असल्यामुळे तोही निरोप घेऊन तिथून निघाला. त्यानंतर अख्खी रात्र तिने रडून रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला, ज्या प्रेमाची सात वर्षे वाट बघितली त्याचा अंत असा सात मिनिटात का झाला?
एखाद्या
व्यक्तीवर तुमचे मनापासून
खरे प्रेम असेल
तर सांगायला
संकोच करु नका.
ते यशस्वी होईल
का नाही हा
नंतरचा प्रश्न आहे.
पण तुम्ही समोरच्या
व्यक्तीला सांगाच. कारण नियतीच्या
मनात कधी काय
येईल हे आजपर्यंत
कोणालाच काही सांगता
आलेले नाही. जर सांगायला
वेळ झाला तर
कदाचित उरलेले आयुष्यात
पश्चातापाशिवाय काहीच मिळणार
नाही.
“मी तुला ओळखलंच नाही. कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता पूर्णपणे वेगळी.” “हो रे… थोडा बदल झालाय खरा. पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस. कसं चाललंय?” “माझं एकदम मजेत, अजून कोणी आहे का तुझ्या संपर्कात क्लासमधले.” “हो रे… त्या क्लासमधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू अचानक गायब झालास.” “हो गं… नवीन घर घेतलं होतं आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्या वर्षी आणि म्हणून… झालो एकदम अचानक…” “लग्न कधी करतेस? का झालंपण?” “नाही रे… अजून नाही… कुणाचीतरी वाट बघतेय म्हणून अजून थांबलेय लग्नासाठी. पण आता विचार सुरु आहे. बघू कदाचित लवकरच… ये पण तुझं झालं का लग्न” “मागच्या वर्षी झालं… लव मॅरेज…जरा लवकरच झालं. पण जो होता है वो अच्छे के लिए होता है…असा विचार केला आणि लग्न केलं” बस… त्यानंतर निकिता फक्त रडायची बाकी होती. तिने कसतरी पटापट तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. संजयला पण थोडं विचित्र वाटलं. पण त्यालाही घाई असल्यामुळे तोही निरोप घेऊन तिथून निघाला. त्यानंतर अख्खी रात्र तिने रडून रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला, ज्या प्रेमाची सात वर्षे वाट बघितली त्याचा अंत असा सात मिनिटात का झाला?
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा