कोणताही अर्ज केला नव्हता की, कुणाचीही शिफारस नव्हती, असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्वही नाही,
तरीही डोक्याच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत 24 तास देवा तु रक्त फिरवतोस...
जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस.......
अखंडपणे तू माझे हे हृदय चालवतोस....
चालणारे कोणते यंत्र तू फिट करुन दिले आहेस रे देवा .....
पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेशवहन करणारी प्रणाली ..........
कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे काही समजत नाही.
हाडांमासामध्ये तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे....
याचा मला मागमूसही नाही. हजार हजार मेगापिक्सलवाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहेत.
दहा दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,
अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली .....
आणि......
वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाजनिर्मिती करणारी स्वरप्रणाली
आणि
त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग डीकोडींग करणारे कान नावाचे यंत्र........
पंचाहत्तर टक्के पाण्याने भरलेला शरीररुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही....
स्टॅण्डशिवाय मी उभा राहू शकतो...गाडीचे टायर झिजतात, पण पायांचे तळवे कधीही झिजत नाही.
अद्भुत अशी रचना आहे. संभाळणे, स्मृती, शक्ती, शांती हे सर्व देवा तु देतोस. तुच आत बसुन शरीर चालवत आहेस. अद्भूत आहे हे सर्व, अविश्वसनीय, अनाकलनीय.
अशा शरीररुपी मशीनमध्ये कायम तुच आहेस,
याची जाणीव करुन देणारा आत्मा देवा तू असा काही फिट बसविला आहे की आणखी काय तुझ्याकडे मागाव......
तुझ्या या जीवाशिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन! .......
अशी सद्बुद्धी मला दे!!
तूच हे सर्व सांभाळतो आहेस याची जाणीव मला सदैव राहू दे!!!
रोज क्षणोक्षणी कृतज्ञतेने तुझा ऋणी असल्याचे स्मरण, चिंतन व्हावे, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा