गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

204. माझ्या आई-वडीलांना पुन्हा मी मिळणार नाही

 आमच्या ब्रेकअपच्या 10 महिन्यानंतर मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला.
ती : हॅलो...
मी : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शोना...
ती : आभारी आहे. पण तू कोण?
मी : काय गं, एवढ्या लवकर विसरलीस का?
ती : अरे पण, हा तुझा नवीन नंबर आहे का?
मी : ये बावळट, मी बोलतोय...
ती : संदीप... तू नंबर बदलला आहेस का? कसा आहेस?
मी : तुला काय फरक पडतो, मी कसा का असू दे ना...
ती : तसं नाही रे. मला तुझी खूप आठवण येते रे...
मी : हो माहित आहे. किती आठवण येते तुला माझी. 10 महिन्यांत एक पण कॉल केला नाहीस तू.
ती : तसं काही नाही रे.. पण शेवटी तू मलाच दोषी ठरवलंस.
मी : हो मग, माझी चूक नसताना खोटे आरोप केलेस. इतर मुलांना प्रेमात फसवलंस तू. मग दोष तुझा नाही तर माझा आहे का?
ती : हां... आत्ता तू असेच बोलणार. बरं  जाऊ दे. स्वप्नीलला भेटलास का तू आणि विलास कसा आहे?
मी : विलासने आत्महत्या केली, एका मुलीने धोका दिल्यामुळे. काय करणार? खऱ्या प्रेमाची किंमत मुलींना कळतच नाही ना. त्यांना टाईमपास करणारी मुले आवडतात.
ती : हो का, अरे वा !! मग तू अजून कसा जिवंत आहेस?
(मी क्षणभर मूक झालो आणि स्वत:लाच विचारु लागलो... "काय रे संदिप??? हेच का तुझे तिच्यावर केलेले प्रेम. एवढे तिच्यावर जिवापाड प्रेम करुनही शेवटी ती तू मरण्याची वाट पाहतेय.. नंतर मी थोडा सावरलो आणि फोन ठेवण्या अगोदर फक्त एवढंच बोललो.)
मी : शोना, तू माझं प्रेम जरी मान्य केलं नाहीस तरी मी तुझ्यासाठी जीव देणार नाही. कारण तुला खोटे प्रेम करायला दुसरा मुलगा जरुर मिळेल पण माझ्या आई-वडीलांना पुन्हा मी मिळणार नाही. एवढे बोलून आसवे पुसत मी फोन ठेवून दिला.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...