किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या
राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करुन तुरुंगात बंदिस्त केले.
पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मत परिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवनदान
द्यायचे ठरवले. पण त्यासाठी त्याने आर्थर राजासमोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो
आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि वर्षभरासाठी मुक्त करेल. तोवर जर आर्थर त्याचे
उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्यूदंड.
तर तो प्रश्न होता की, "स्त्रियांना नेमके काय पाहिजे?" या प्रश्नाचे उत्तर शोधता-शोधता भल्याभल्यांचे हात टेकले होते, तर तरुण आर्थरने जर हे उत्तर शोधले तर चमत्कार ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वत:च्या राज्यात परतला. तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली. त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचेही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिला सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिध्द होती. हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता. म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.
चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून
घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात
तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न
करावे लागेल." सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन
व्यक्तिमत्व व शूर योध्दा अशी होती. तिची ही मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला.
ती चेटकिण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरुप होती. तिच्या मुखात केवळ एकच
सुळा होता. तिच्या कंठातून चित्र-विचित्र आवाज येत रहायचे व ती जिथे जाईल तिथे
दुर्गंध पसरायचा. आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी
स्वत:च्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे
नव्हते. पण लॅन्सलॉटला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण
करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला, "माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा
त्याग काहीच नाही." नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य
केले. लॅन्सलॉअ व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली. तेंव्हा चेटकिणीने आर्थरचा
जीव वाचवणारे उत्तर दिले की, "स्त्रीला तिच्या स्वत:च्या आयुष्याचे
निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो."
हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे. शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनातून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.
विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरत लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रुपगर्विता तरुणी बसली होती. धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की, हा बदल कसा काय झाला? त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रुपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रुपात. आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रुपात राहायचे आणि कोणत्या वेळी या रुपात रहायचे हे तुला ठरवायचे आहे. यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुध्द पर्यायांमुळे विचारांचे प्रचंड द्वंद्व सुरु झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पन्ती म्हणून मिरवता येईल पण रात्री एकांतात काय? अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल? आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता? तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉट उत्तर वाचा.
कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला
की, " आजपासून जरी तू माझी पत्नी असलीस तरी केंव्हा कसे रहायचे हे ठरविण्याचा
हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेंव्हा जसे आवडेल तेंव्हा तू तशी राहा. माझी
कसलीही हरकत राहणार नाही." हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूश झाली व तिने
तिला वचन दिले की ती चेटकिणीच्या रुपाचा कायमचा त्याग करेल कारण लॅन्सलॉटने तिला आदराने
वागवले व तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार तिला दिला.
तर तो प्रश्न होता की, "स्त्रियांना नेमके काय पाहिजे?" या प्रश्नाचे उत्तर शोधता-शोधता भल्याभल्यांचे हात टेकले होते, तर तरुण आर्थरने जर हे उत्तर शोधले तर चमत्कार ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वत:च्या राज्यात परतला. तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली. त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचेही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिला सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिध्द होती. हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता. म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.
हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे. शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनातून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.
विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरत लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रुपगर्विता तरुणी बसली होती. धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की, हा बदल कसा काय झाला? त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रुपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रुपात. आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रुपात राहायचे आणि कोणत्या वेळी या रुपात रहायचे हे तुला ठरवायचे आहे. यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुध्द पर्यायांमुळे विचारांचे प्रचंड द्वंद्व सुरु झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पन्ती म्हणून मिरवता येईल पण रात्री एकांतात काय? अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल? आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता? तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉट उत्तर वाचा.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा