एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वत:ला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.
प्रोफेसर : तुझा देवावर विश्वास आहे का?
प्रोफेसर : देव हा चांगला आहे?
प्रोफेसर : देव हा सर्व शक्तीमान आहे?
प्रोफेसर : माझा भाऊ कॅन्सरने वारला. त्याआधी त्याने देवाची खूप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेंव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही? (सर्व वर्ग शांत झाला.) कोणीही याचे उत्तर देवू शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा, अजून काही विचारतो. प्रोफेसर पुढे बोलू लागले,
प्रोफेसर : कोणी बनवले यांना, देवानेच ना?
प्रोफेसर : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?
प्रोफेसर : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?
प्रोफेसर : या जगातील आजारपण, अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?(विद्यार्थी शांत होता.) प्रोफेसर पुन्हा म्हणाले,
प्रोफेसर : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहिलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे?
प्रोफेसर : मग निरीक्षणार्थ, परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकते की, देव ही संकल्पना अस्तित्वात नाही. मग याला तू उत्तर काय देशील?
प्रोफेसर : हो येस... आणि इथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणूस विचार करणे सोडतो आणि सगळे श्रध्देवर सोडून मोकळे होतो.
विद्यार्थी : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का?
विद्यार्थी : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का?
विद्यार्थी : आणि शीतलता?
विद्यार्थी : नाही सर. असे काहीच अस्तित्वात नाही.
(वर्गात एकदम पूर्णपणे शांतता झाली.)
विद्यार्थी : सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो पण शीतलता कधीच नाही. आपण शून्य डिग्रीच्या 458 डिग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेच उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता. (वर्ग लक्षपूर्व ऐकत होता.)
प्रोफेसर : कसे काय? सिध्द करुन दाखव.
विद्यार्थी : मला सांगा सर, आपण ही उत्क्रांती स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली?
विद्यार्थी : मी ही नाही. याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत. (सर्व वर्गात हशा पिकला.) सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहिलाय? कधी चव घेतलीय? कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर. मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?
पुढे जेंव्हा हा विद्यार्थी बोलला तेंव्हा तेंव्हा त्याने लाखो मने आपल्याकडे आकर्षित केली. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी 'Wings of Fire' दिले. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा