बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

229. आयुष्याचा अर्थ

      ज्या दिवशी आपला मृत्यू होतो, आपले पैसे बँकेमध्येच राहतात. जेंव्हा आपण जिवंत असतो तेंव्हा आपणाला असे वाटत असते की, आपल्याजवळ खर्च करण्यासाठी दुसरे पैसे नाहीत. जेंव्हा आपण निघून जातो तेंव्हा पण खूप सारे पैसे विना खर्च करता शिल्लक राहतात. एका चिनी बादशाहचा मृत्यू झाला. त्याने आपल्या विधवा पत्नीसाठी बँकेमध्ये 1.9 कोटी डॉलर संपत्ती ठेवली होती. विधवा झालेल्या पत्नीने तरुण नोकराबरोबर लग्न केले. त्या नोकराने सांगितले, "मला असे नेहमी वाटत होते की मी आपल्या मालकांसाठी काम करतो आहे. आता लक्षात आले की ते माझ्यासाठी नेहमी काम करत होते." तात्पर्य? जास्त पैसे साठविण्यापेक्षा जास्त जगा. चांगल्या आणि स्वस्थ शरीरासाठी प्रयत्न करा.
       महागड्या फोनांचे 70 टक्के फंक्शन निरुपयोगी असतात. महागड्या कारांच्या 70 टक्के गतीचा उपयोग होऊ शकत नाही. मोठ-मोठ्या बंगल्यांचा 70 टक्के भाग रिकामाच राहतो. संपूर्ण तिजोरीमध्ये 70 टक्के कपडे आहे तसेच राहतात. पूर्ण आयुष्यापैकी 70 टक्के उत्पन्न दुसऱ्यांच्या उपयोगासाठी शिल्लक राहतो. 70 टक्केचा पूर्ण उपयोग नाही तर 30 टक्केचा पूर्ण उपयोग कसा होणार? स्वास्थ जरी असले तरी आरोग्याची नेहमी काळजी घेत रहा. तहान जरी लागली नसली तरी अधिक पाणी प्या. जेंव्हा जेंव्हा शक्य असेल तेंव्हा अहंकारापासून दूर रहा. शक्तीशाली असला तरी सरळ रहा. श्रीमंत नसला तरी परिपूर्ण रहा. चांगले आयुष्य जगा. प्रार्थना करतेवेळी आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. जेवण जेवतेवेळी आपल्या पोटावर नियंत्रण ठेवा. कोणाच्यातरी घरात गेला तर आपल्या डोळ्यांवर नियंत्रण ठेवा. कोणाच्यातरी दु:खाच्या प्रसंगावेळी आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्यांची संपत्ती बघून आपल्या स्वार्थावर नियंत्रण ठेवा. भूतकाळातल्या कडू आठवणींना विसरुन जावा. दुसऱ्यांना कमी लेखायचे सोडून द्या. दुसऱ्यांच्या यशस्वीपणावर जळू नका. दुसऱ्यांकडून संपत्तीची अपेक्षा करणे सोडून द्या. दुसऱ्यांच्या चाड्या करणे सोडून द्या. दुसऱ्यांच्या  यशस्वीपणावर दु:खी होणे सोडून द्या.
     जर तुमच्या फ्रीजमध्ये अन्न असेल, अंगावरती कपडे असतील, घरावरती छप्पर असेल आणि झोपण्यासाठी जागा असेल तर जगातल्या 75 टक्के लोकांपेक्षा तुम्ही श्रीमंत आहात. जर तुमच्या पाकीटमध्ये पैसे असतील आणि छोट्याशा बदलावासाठी जेथे तुम्हाला बाहेर फिरायला जायचे आहे तेथे जाऊ शकत असाल तर तुम्ही जगाच्या 18 टक्के श्रीमंत लोकांमध्ये सहभागी होता. जर तुम्ही आज पूर्णत: स्वस्थ असून जीवंत आहात तर तुम्ही त्या लाखो लोकांपेक्षा अधिक नशीबवान आहात जे ह्या आठवड्यात जगू पण शकत नाहीत. आयुष्यातील अनुभव दु:खाच्या तक्रारी सांगण्यासाठी नाही तर आपल्या निर्मात्याला हजारो कारणाबद्दल आपण धन्यवाद म्हणण्यासाठी आहे. जर तुम्ही एखादा संदेश खरोखर वाचू शकत असाल तर तुम्ही त्या करोडो लोकांपेक्षा अधिक नशीबवान आहात जे बघू शकत नाहीत आणि वाचू शकत नाहीत. झोप आणि मृत्यूमध्ये काय फरक आहे? कुणीतरी याचे चांगले उत्तर दिले आहे. "झोप निम्मा मृत्यू आहे आणि मृत्यू कायमची झोप आहे." आयुष्य तर त्याच्याच पध्दतीने चालत असते. दुसऱ्यांच्या सहाय्याने तर तिरडी उचलली जाते. सकाळ होते, संध्याकाळ होते आणि आयुष्य असेच निघून जाते. कोणतरी रडून हृदयाचे सांत्वन करतो तर कोणी हसून आपले दु:ख लपवतो. काय चमत्कार आहे निसर्गाचा... जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडत असतो आणि मृत पावलेला माणूस पाण्यावर तरंगत असतो. बसमधील कंडक्टरसारखे आयुष्य झाले आहे. प्रवास तर दररोजचाच आहे आणि कुठेच जायचे नाही.  यशाचे सात रहस्य : छप्पराने सांगितले, ध्येय उच्च ठेवा. पंख्याने सांगितले थंडगार रहा. घड्याळाने सांगितले प्रत्येक मिनिट किमतीचा आहे. आरशाने सांगितले, काहीतरी करण्याअगोदर आपल्या मनात झाकून बघा. खिडकीने सांगितले जगाकडे बघा. कॅलेंडरने सांगितले अप-टू-डेट रहा. दरवाजाने सांगितले आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी पूर्ण जोर लावा. व्रण पण किती वेगळे असतात. कपळावर पडले तर नशीब तयार होते आणि जमीनीवर पडले तर हद्द तयार होते. त्वचेवर पडले तर रक्त बाहेर काढतात आणि नात्यामध्ये पडले तर गैरसमजूतीची भिंत तयार होते. एक रुपया एक लाख नाही होऊ शकत पण तरीही एक रुपया एका लाखामधून निघून गेला तर ते एक लाख, एक लाख रुपये नाही राहू शकत. आम्ही पण तुमच्या लाखो रुपयांमधील तो एक रुपया आहे. सांभाळून ठेवा, बाकी सगळी माया आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...