एकदा एक स्त्री भयचकित अवस्थेत एका उंच आणि धोकादायक पुलाच्या टोकाला उभी
असते. खूप घाबरलेली आणि अगदी एकटी.......... तिचा नवरा, आयुष्याचा जोडीदार
असतो पुलाच्या दुसऱ्या टोकाला...... तिला तो दिसत नसतो आणि त्याला ती......... त्याने
याव म्हणून ती खूप साद घालते त्याला......... पण त्याच्याकडून प्रतिसाद
शून्य......... घाबरलेली बावरलेली ती पुन्हा पुन्हा हाक मारत राहते......... आर्ततेने
त्याच उत्तर येत, "मी बिझी आहे. तू कर ना प्रयत्न स्वत:च, जिथे तिथे मीच का हवा तुला...... स्वत:च काम स्वत: करायला शिक ना
जरा." ती दुखावते...... मोडते पण लगेच सावरते आणि हिमतीने पाउल टाकते त्या
धोकादायक उंचच्याउंच पुलावर....... कशीबशी पार करते तो पूल... मनातली अपमानाची धग दडपून मात्र त्याला बघताच बांध फुटून रडत धाव घेते त्याच्याकडे
कारण............ कारण पुलाची मोडलेली बाजू सावरलेली असते त्याने आपल्या
खांद्यावर......... तिच्या सुरक्षिततेसाठी . कधी कधी काही स्त्रियांना स्त्रियांना वाटते कि आपला नवरा गप्प गप्प का? काहीही मदत नाही करत. भलेही तो काही
करतांना दिसत नसेल पण जेव्हा तुम्ही आत्मविश्वास गमावतात तेव्हा तो कदाचित पुलाची
दुसरी बाजू सावरत असेल. असा असतो तो..
"पुरुष कोण आहे ?" पुरुष हा देवाने बनवलेली अशी एक
सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून compromise
करायला चालू करतो. तो आपल्या हिश्श्यातील chocolate सुद्धा आपल्या बहिणीला देतो. तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या
स्वप्नांचे बलिदान देतो. तो आपले सर्व pocket money अशा
मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील हसू पाहायला त्याला आवडते. तो आपले पूर्ण
तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही
तक्रारीविना खर्च करतो. तो त्यांच्या भविष्यासाठी बँकेतून लोन आणि कर्ज घेतो आणि
जन्मभर ते फेडत बसतो. तो खूप संघर्ष करतो आणि तरीही त्याच्या आईचे, बायकोचे आणि बॉस चे ओरडे खातो. शेवटी त्याचे आयुष्य दुसऱ्यांसाठी
झटण्यातच संपते. आईचे ऐकले तर त्याला MAMA's Boy बोलतात
आणि बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा गुलाम बोलतात. पुरुषाचा आयुष्यात respect
करा. कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले
बलिदान दिले असेल. हा message वरील प्रसंग ज्या पुरुषांनी केले आहेत आणि करत आहेत अशा प्रत्येक पुरुषाला पाठवा,
त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला पाठवा
तिलाही किंमत समजेल पुरुषाची.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा