शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

210. चांगली माणसे मिळवल्यावर पैसे आपोआप मिळतात

     दोन मित्र असतात. दोघांची परिस्थिती समान असते. पहिला असतो तो व्यवसाय सुरु करतो आणि तो आपल्या व्यवसायात खूप यशस्वी होतो. भरपूर संपत्ती मिळवितो. दुसरा असतो तो नोकरी करत असतो. दोघांतील परिस्थितीचे वर्णन केलं तर कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे गागा भट्टाची तट्टानी अशी होती.
       एकच दिवस अचानक श्रीमंत मित्राला व्यवसायात तोटा होतो. मग बँक गॅरंटीसाठी दहा कोटी रुपये दोन दिवसात जमा करावयाचे असतात. श्रीमंत मित्र खूप चिंतेत असतो. एवढी रक्कम तो दोन दिवसांत जमा करु शकत नसतो. दुसऱ्या मित्राजवळ जेंव्हा तो जातो तेंव्हा तो विचारतो काही अडचण आहे का? परंतु खूपदा विचारुनसुध्दा श्रीमंत मित्र त्याला काही सांगत नाही. कारण त्याला माहित असतं की याला सांगून तरी काय फायदा, कारण याची काही एवढी ऐपत नाही.
        खूप वेळानंतर श्रीमंत मित्र त्याला आपली अडचण सांगतो. दुसरा मित्र मग एक फोन करुन सांगतो की अमुक-अमुक बँकेत अमुक-अमुक खात्यात दहा कोटी रुपये जमा कर. मग पहिला मित्र म्हणतो हे बघ, भलत्या वेळी विनोद करु नको. दुसरा मित्र म्हणतो, "जा रे... तुझी अडचण दूर झालेली आहे." त्यानंतर दोन दिवसांनी त्याला कळते की आपल्या खात्यात दहा कोटी रुपये जमा केलेले आहेत. हे कसे काय शक्य झाले? असा पहिला मित्र विचारतो. त्यानंतर दुसरा मित्र म्हणतो, "अरे मित्रा, तू ज्यावेळी फक्त पैसे मिळवत होतास त्यावेळी मी पैसे आणि मित्र दोन्हीही मिळवत होतो."

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...