शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

212. प्रेमासाठी पळून जाणाऱ्या मुलींसाठी

 ज्या मुली प्रेमाच्या कचाड्यात पडून पळून जातात खास त्यांच्यासाठी.
         एखाद्या बागेत जसा माळी झाडांना जपत असतो त्याचप्रमाणे त्या बागेतील कळीप्रमाणे जेंव्हा तू उगवली होतीस तुला काय माहित की त्यांना किती आनंद झाला होता. ज्यांच्या हातात हात धरुन तू चालत होतीस त्यांनाच तू त्यांनाच धक्का मारुन पळून गेलीस. एवढ्या कठोर हृदयाची बनून तू भावाला बांधलेल्या राखीला कशी काय विसरलीस? घरातून पळून जाताना आईची गोद तुला आठवली नाही?
       तुझ्याच दु:खामुळे वडील घरातून बाहेर जाऊ शकत नाहीत. तुझ्या स्वार्थासाठी तू घरात हा-हा कार माजवलास. जे तुला पळून जायला भाग पाडतात ते प्रेमी म्हणजे असे कसले प्रेमी? तुझ्या शरीराकडे बघून वाईट भावना ठेवणारे ते मित्र म्हणजे कसले मित्र? असे शारीरीक सुखाची अपेक्षा करणारे तुला कधी सुख नाही देऊ शकत. उलट तुझ्यापासूनच तुझे सगळे सुख-आनंद असे बरेच काही  हिसकावून घेतील. जर सुख देणाऱ्यांना तू दु:ख दिलंस, तर तुझ्या आयुष्यात पण तुला कसे सुख मिळणार?
         जर आपल्या आईवडीलांना सोडून तू पळून गेलीस तर जीवनाच्या प्रत्येक वणावर तुला धक्का बसेल. ज्या ज्या मुली पळून गेल्या त्यांना धक्केच बसलेले  आहेत. आपल्या चुकीवर रडून रडून अश्रू सांडतात. एकाच किचनामध्ये कोंबडीबरोबर आमटी करत राहतात. खूप मोठी चूक झाली हा विचार करुन आता पश्चाताप करत बसतात.  आयुष्यामध्ये प्रत्येक प्रसंगाला तू, नेहमी जीवंत रहा. तुझ्या अशा वागण्यामुळेच आई-वडीलांना खाली मान घालून  जावे लागते. जर तू घरातून पळून गेलीस तर ते जीवंतपणीच मरतील. तू त्यांची मुलगी आहेस हा विचार करुन ते पश्चाताप करत बसतील.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...