खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे... साईंच्या देवळात गेलो होतो... दर्शन घेऊन बाहेर आलो न् समोरच्या ठेल्यावर उसाचा रस घेत होतो, तिथेच बाजूला हाराच् दुकान पण आहे... एक चांगला पस्तिशीचा इसम तिथे आला.. त्याने अगदी 250 चा सुन्दर हार घेतला... तेवढ्यात त्याच्या कड़े एक गरीब मुलगा आला, याच त्या मुलाकडे लक्ष नव्हतं.. तशी काही गरज पण नव्हती... 11 वर्षाचा असेल तो मुलगा... त्याने त्या इसमाच्या हाताला स्पर्श केला तो त्याने त्याच्या कड़े पाहिले आणि अगदी दूर ढकलत, स्वतःचा हात रुमालाने पुसला... पण तो मुलगा अगदी रडवा चेहरा करुन् त्याच्या कड़े पाहत होता, त्याचे डोळे पाणावलेले होते आणि तो पैसे मागत नव्हता तर 1 ग्लास उसाचा रस त्याच्याकडे मागत होता...तहान लागली आहे बोलत होता.. पण त्या इसमाला काही पाझर फुटला नाही, ते पाहुन, मी रस वाल्याला सांगितले, त्या मुलाला रस दे, पैसे मी देतो.. तो मुलगा रस प्यायला आणि माझ्या कड़े क्षणभरचं पाहिलं.. एक स्मित हास्य आणि पळाला... तहान भागल्याच् सुखं त्याच्या कोवळ्या चेहऱ्यावर स्पष्ट जानवलं... तोवर या इसमाचा अहंकार दुखावला होता... तो मला बोलला.. "आप जैसे लोग इन भिकारियों को सर चढ़ाते हो..." मी त्याला बोट दाखवलं... तो मुलगा पुढे जाऊन मंदिराचे जीने पुसतं होता... एवढच बोललो... "आपको साईं के मूर्ती में भगवान् दिखता है, जिसके लिये आपने 250 का हार लिया.. और मुझे उस बच्चेके हँसी में साईं मिल गए.. आपका भगवान 250 में भी नहीं हँसा, लेकिन मेरा साईं 10 रूपयों में हँस दिया..." माहित नाही .. पण हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले... कुठे आहे माणुसकी...? कुठे चालली आहे भक्ति..? जो साईं जिवंत असताना, भिक्षा मागून आणायचा आणि ती देखिल वाटून खायचा त्या साईंच्या भक्तांना त्यांचा साधा आदर्श देखिल पाळता येऊ नये...?? हि कसली भक्ति..? ज्याची भक्ति करता त्याचे विचार तुमच्या वर्तवणुकित नसतील, तर कसली आलिये भक्ति... काय उपयोग त्या पैशांचा ज्याने एखादा गरीब हसू शकतं नसेल... तासाभरासाठी मूर्तिच्या गळ्यात हार टाकून, काय सिद्ध केल त्याने...? दान पेटित पैसा टाकला देवासाठि पण पोचला संस्थानच्या सदस्याच्या अकाऊन्टला ना... स्वतःच्या ऐश्वर्याच् प्रदर्शन कशासाठी...??? सदर मेसेज चा मी साक्षीदार नाही पण मित्राने हा मेसेज शेअर केला मला आवडला .माणुसकी प्रेम जिव्हाळा जिवंत रहावी या उद्देशाने हा मेसेज शेअर करीत आहे. हा मॅसेज फक्त पाच गृपमधे पाठवा कही जादु बिदु होनार नाही. एक चांगला विचार पसरवल्याच समाधान मिळेल.
नमस्कार.. माझे नांव अर्जुन कृष्णात पाटील. हा ब्लॉग फक्त माझा नसून ज्ञात आणि अज्ञात लेखकांचा आहे. मला व्हाट्सअप, फेसबुकवरून जी माहिती मिळाली ती जशी आहे तशी येथे दिली आहे. सर्वप्रथम मी ज्ञात आणि अज्ञात लेखकांची माफी मागतो. कारण वेळेअभावी त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मी काही लेख येथे पब्लिश केले आहेत. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. कारण त्यांच्यामुळेच हा ब्लॉग पूर्ण झाला आहे. ह्या ब्लॉगवरील माहितीवर माझा कोणताही हक्क नसून ही माहिती गरजू व्यक्तींपर्यंत पोहचावी हाच फक्त उद्देश आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2900. निशब्द
आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...
-
DB नावाने ओळखले एक एक शिक्षक आहेत. ते माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा तालुका गावापासून पाच किलोमीटर दूर होती. त्य...
-
60 वयाच्या पुढील सर्व भाग्यवान जेष्ठ नागरिक जोडप्यांना खूप खूप हार्दीक शुभेच्छा* 🌹🙏 🙋 🙋♂ दांपत्य दिनच्या निमित्ताने एक सुंदर कवित...
-
माझं नुकतंच लग्न झालं होतं, त्यावेळी भोसरी एमआयडीसी मधील मॉरिस नामक एका कंपनीत मी हेल्पर म्हणून कामाला होतो. (आता त्या कंपनीचे नाव बदलले आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा