कसं आहे ना?
एक कागदाचं पान असतं...!!
'श्री' लिहलं, की पूजलं जातं ...
प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं...
काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं...
एक कागदाचं पान असतं...!!
एक कागदाचं पान असतं...!!
'श्री' लिहलं, की पूजलं जातं ...
प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं...
काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं...
एक कागदाचं पान असतं...!!
कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं...
कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं...
कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं...
आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं...
एक कागदाचं पान असतं.!!
कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं...
कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं...
आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं...
एक कागदाचं पान असतं.!!
जे लेखकाच्या लेखणीला हात देतं...
जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं...
जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं...
आणि हो, वकीलासोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं...
एक कागदाचं पान असतं..!!
जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं...
जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं...
आणि हो, वकीलासोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं...
एक कागदाचं पान असतं..!!
पेपरवेट ठेवलं, की एकदम गप्प बसतं...
काढून घेतलं, की स्वच्छंदी फिरतं आणि
कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं...
एक कागदाचं पान असतं.....!!
ज्यावर बातम्या छापल्या, कि वर्तमानपत्र बनतं...
प्रश्न छापले, कि प्रश्नपत्रिका बनतं...
विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं...
तर कधी आदेश~संदेश लिहले, की तेच टपालही बनतं...
एक कागदाचं पान असतं !
प्रश्न छापले, कि प्रश्नपत्रिका बनतं...
विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं...
तर कधी आदेश~संदेश लिहले, की तेच टपालही बनतं...
एक कागदाचं पान असतं !
माणसाच्या जीवनांत आणि त्यांत खूप साम्य असतं...!
जन्माला आला तर Birth certificate असतं
निधन झालं तर Death certificate असतं
एक कागदाचं पान असतं.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा