स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील अनेक गैरसमज मोडीत काढून यश आपल्या जवळ आले
आहे ह्या भावना निर्माण करणारा एक संघर्षमय जीवनप्रवास....
रमेश गोरख घोलप (आय.ए.एस.)
Ø जन्मस्थळ : महागांव, ता:बार्शी (सोलापूर)
Ø जन्म तारीख : 30 एप्रिल 1988
Ø आई अशिक्षित आणि घरोघरी जाऊन बांगड्या भरण्याचा
व्यवसाय.
Ø वडील : रमेश 12 वीत शिकत असताना निधन.
Ø प्राथमिक शिक्षण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
महागांव.
Ø माध्यमिक शिक्षण : संत सावता माळी विद्यालय, अरण (10 वी 84.40) - 2003.
Ø महाविद्यालयीन शिक्षण : श्री शिवाजी
महाविद्यालय बार्शी. (12 वी
सायन्स शाखा -88.50%) - 2005.
Ø डिप्लोमा शिक्षण : (D. Ed.) : शं. निं. डी. एड् कॉलेज, बार्शी (2009)
Ø पदवीचे शिक्षण : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठ, नाशिक (विषय : इतिहास-2010)
Ø नोकरी : (2009-2010) सोलापूर जिल्ह्यातील माढा
तालुक्यात बावी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी.
Ø सप्टेंबर 2009 साली स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात.
Ø 2010 साली - यु.पी.एस.सी. त अपयश आणि त्याच
वर्षी महागांव येथील ग्रामपंचायत निवडणूकीत आईचा पराभव.
Ø 2011 सालच्या यू.पी.एस.सी. परीक्षेतून आय.ए.एस. पदी निवड (निकाल 4 मे 2012)
Ø 2011 साली दिलेल्या परीक्षेत महाराष्ट्र
एम.पी.एस.सी. परीक्षेत महाराष्ट्रात विक्रमी गुणांनी प्रथम ( निकाल 30 जून 2012).
Ø सध्या झारखंड राज्यामध्ये खुंटी जिल्ह्यात
एस.डी. एम. या पदावरती कार्यरत.
निकालाची वैशिष्ट्ये :
Ø कोणताही क्लास लावला नाही. फक्त मुलाखतीसाठी क्लासचा उपयोग. (आय.ए.एस. होण्यासाठी क्लास लावावाच लागतो या समजूतीला फाटा दिला.)
Ø दोन वर्षांत इतक्या अल्प कालावधीत यश (स्पर्धा परीक्षेत यशासाठी 5 वर्षे तरी अभ्यास करावा लागतो हा गैरसमज दूर केला.)
Ø सरकारी शाळेतून शिक्षण (आय.ए.एस. होण्यासाठी
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकावे लागते हा समज मोडून काढला.)
Ø आई अशिक्षित व बांगड्या भरण्याचा व्यवसाय. वडीलांचे 12 वीत असताना निधन. (अधिकारी होण्यासाठी खूप श्रीमंत आणि सुशिक्षित घरात जन्म व्हावा लागतो हे चुकीच मत खोडून काढले.)
Ø मुक्त विद्यापीठातील पदवीधर : अधिकारी
होण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये नामांकित महाविद्यालयांत शिकावे लागते
हे मत बदलायला भाग पाडले.
Ø आयुष्यात प्रथम दिल्लीला मुलाखतीसाठीच गेले - तयारीसाठी दिल्लीला जावेच लागते हा गैरसमज खोडून काढला.
Ø एकाच वर्षी आय.ए.एस. आणि त्याच वर्षी एम.पी.एस.सी. त प्रथम क्रमांक येण्याची पहिलीच वेळ - नियोजनबध्द अभ्यास केल्यास एकावेळी दोन्ही परीक्षेत यश मिळविणे शक्य आहे हे दाखवून दिले.
Ø एम.पी.एस.सी. च्या निकालाआधी आत्मविश्वासाने मी महाराष्ट्रात प्रथम येईल म्हणून आत्मविश्वासाने सांगणारा विद्यार्थी. "नशिबात असल्याशिवाय मिळत नाही" हे म्हणणे चुकीचे ठरवून स्पर्धा परीक्षा हा नशिबाचा नव्हे तर प्रयत्नांचा डाव आहे हे दाखवून दिले.
जर रमेश घोलप करु शकतात, तर मी का नाही? हा प्रश्न मनाला नक्की विचारा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त निर्धारपूर्वक योग्य दिशेने होणारे प्रामाणिक कष्ट महत्वाचे आहेत.
"काहीही न करता जय-जयकार
होत नाही.
प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही."
रमेश गोरख घोलप (आय.ए.एस.)
Ø जन्मस्थळ : महागांव, ता:बार्शी (सोलापूर)
Ø जन्म तारीख : 30 एप्रिल 1988
Ø वडील : रमेश 12 वीत शिकत असताना निधन.
Ø माध्यमिक शिक्षण : संत सावता माळी विद्यालय, अरण (10 वी 84.40) - 2003.
निकालाची वैशिष्ट्ये :
Ø कोणताही क्लास लावला नाही. फक्त मुलाखतीसाठी क्लासचा उपयोग. (आय.ए.एस. होण्यासाठी क्लास लावावाच लागतो या समजूतीला फाटा दिला.)
Ø दोन वर्षांत इतक्या अल्प कालावधीत यश (स्पर्धा परीक्षेत यशासाठी 5 वर्षे तरी अभ्यास करावा लागतो हा गैरसमज दूर केला.)
Ø आई अशिक्षित व बांगड्या भरण्याचा व्यवसाय. वडीलांचे 12 वीत असताना निधन. (अधिकारी होण्यासाठी खूप श्रीमंत आणि सुशिक्षित घरात जन्म व्हावा लागतो हे चुकीच मत खोडून काढले.)
Ø आयुष्यात प्रथम दिल्लीला मुलाखतीसाठीच गेले - तयारीसाठी दिल्लीला जावेच लागते हा गैरसमज खोडून काढला.
Ø एकाच वर्षी आय.ए.एस. आणि त्याच वर्षी एम.पी.एस.सी. त प्रथम क्रमांक येण्याची पहिलीच वेळ - नियोजनबध्द अभ्यास केल्यास एकावेळी दोन्ही परीक्षेत यश मिळविणे शक्य आहे हे दाखवून दिले.
Ø एम.पी.एस.सी. च्या निकालाआधी आत्मविश्वासाने मी महाराष्ट्रात प्रथम येईल म्हणून आत्मविश्वासाने सांगणारा विद्यार्थी. "नशिबात असल्याशिवाय मिळत नाही" हे म्हणणे चुकीचे ठरवून स्पर्धा परीक्षा हा नशिबाचा नव्हे तर प्रयत्नांचा डाव आहे हे दाखवून दिले.
जर रमेश घोलप करु शकतात, तर मी का नाही? हा प्रश्न मनाला नक्की विचारा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त निर्धारपूर्वक योग्य दिशेने होणारे प्रामाणिक कष्ट महत्वाचे आहेत.
प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही."
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा