गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे
गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरुन एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण "फर्स्ट गिअर" टाकतो. हा "फर्स्ट गिअर" म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं... आई-बाबा, जोडीदार, मुलं आणि जवळचे मित्र. हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना, गाडी न थांबता पुढे जात राहिली पाहिजे. हा पहिला "संस्कार" फर्स्ट गिअर करतो. इथे आपल्याला न मोजता येणारे प्रेम मिळते, सुरक्षितता मिळते. गाडी बंद पडणार नाही याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी पळण्यासाठी इतका वेग पुरेसा नसतो. आपण गाडीचा वेग वाढवतो आणि "सेकंड गिअर" टाकतो. इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तंक, मिडिया, आपले छंद, विविध कला. बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती, ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे हे कळतं. समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो. गाडीचा वेग आणखी वाढविण्यासाठी आपण आता "थर्ड गिअर" टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडीत उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरुप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड गिअरमधून थर्ड गिअरमध्ये आलो तेंव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.आपण आता "फोर्थ गिअर" टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग, मल्टीप्लेक्स, गाडी, लेटेस्ट मोबाईल, 1 बी.एच.के. मधून 2 बी.एच.के., लॅपटॉप, ह्याऊ आणि त्याऊ...! या वेगाची नशाच काही और ...! गम्मत म्हणजे पाचव्या गिअरमध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही. आता गाडी अक्षरत: तरंगत जाते. हजार...लाख...कोटी... अरब... करब... रुपये नाहीत, गरजा...! हा वेग खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, लाल सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं आणि... आणि.... आणि.... "नियती" नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो.
तो खूप प्रचंड असतो. गाडी
थांबवण्यापासून आता पर्याय नसतो. पाच...चार...तीन... दोन...एक... खाट-खाट गिअर
मागे टाकत, आपण आता Neutral वर
येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका
बसतो. पाचव्या गिअरमध्ये असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखली टाकला होता याचा
विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती. आज
एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी
आता पुढे न्यायची आहे. मला सांगा कुठला गिअर टाकाल? सुसाट
वेगाचा पाचवा गिअर? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल
असा "फर्स्ट गिअर?" आयुष्यात जेंव्हा पराभावाचे,
निराशेचे क्षण आले होते तेंव्हा कोण होतं तुमच्याजवळ? कोणी
दिला होता आधार? आठवून पहा... प्लाजमा टीव्हीने? की ई.एम.आय. भरत विकत घेतलेल्या एक्ट्रा बेडरुमने? नव्या
कोऱ्या गाडीने? You are promoted... असं लिहलेल्या कागदाने...? मी सांगतो कोण होतं
तुमच्याजवळ...
तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट
गिअरने.आर्थिक
अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुंडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस
प्रश्न विचारुन आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, होईल सगळं व्यवस्थित
म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी "बायको" नावाची मैत्रिण, बाहेरचं खाऊन
त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, त्या काळात आपल्या
डोक्यावर दडपन आणि तणाव असताना कान होणारे आणि योग्य सल्ला देणारे
"जीवाभावाचे मित्र" हे सगळे फर्स्ट गिअर तुमचे गाडी ओढत नव्हते का?
मला चुकीचं समजू नका. माझा चवथ्या आणि पाचव्या गिअर्सना आक्षेप
नाही. त्या वेगाची धुंदी जरुर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी
आपल्या "फर्स्ट गिअर"चं स्मरण ठेवूया. आयुष्याचा वेग मधून-मधून थोडा कमी
करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येवूया. हे सुंदर आयुष्य तुमचंच आहे. त्याचा
मनमुराद आनंद घ्यावा.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण "फर्स्ट गिअर" टाकतो. हा "फर्स्ट गिअर" म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं... आई-बाबा, जोडीदार, मुलं आणि जवळचे मित्र. हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना, गाडी न थांबता पुढे जात राहिली पाहिजे. हा पहिला "संस्कार" फर्स्ट गिअर करतो. इथे आपल्याला न मोजता येणारे प्रेम मिळते, सुरक्षितता मिळते. गाडी बंद पडणार नाही याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी पळण्यासाठी इतका वेग पुरेसा नसतो. आपण गाडीचा वेग वाढवतो आणि "सेकंड गिअर" टाकतो. इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तंक, मिडिया, आपले छंद, विविध कला. बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती, ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे हे कळतं. समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो. गाडीचा वेग आणखी वाढविण्यासाठी आपण आता "थर्ड गिअर" टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडीत उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरुप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड गिअरमधून थर्ड गिअरमध्ये आलो तेंव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.आपण आता "फोर्थ गिअर" टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग, मल्टीप्लेक्स, गाडी, लेटेस्ट मोबाईल, 1 बी.एच.के. मधून 2 बी.एच.के., लॅपटॉप, ह्याऊ आणि त्याऊ...! या वेगाची नशाच काही और ...! गम्मत म्हणजे पाचव्या गिअरमध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही. आता गाडी अक्षरत: तरंगत जाते. हजार...लाख...कोटी... अरब... करब... रुपये नाहीत, गरजा...! हा वेग खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, लाल सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं आणि... आणि.... आणि.... "नियती" नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा