एकदा एका जंगलात एक हरिणी बाळाला जन्म देणार असते. पण ती ज्या ठिकाणी बसलेली
असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो. एका बाजूला एक शिकारी तिच्यावर
बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो. सगळ्या बाजूने दिसणाऱ्या
या संकटापैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते. तो शिकारी
बंदूकीतून गोळी सोडतो... वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात वीज चमकते. त्या शिकाऱ्याचं
लक्ष वेधलं जातं आणि ती गोळी वाघाला लागते. वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु
होतो. त्यामुळे वणवाही विझतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका
लहानश्या हरणाला जन्म देते.
माणसाचं आयुष्य असंच असतं. त्याच्या हातात काहीच नसतं. आपण फक्त प्यादी असतो या पटावरची. कर्ता करविता असतो तो ईश्वर. एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल? काहीच सांगता येत नाहीत. मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच. कर्माचा सिध्दांत हा कितीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्य खूप काही सांगून जातं. 'Behind every misfortune, there is a crime... But behind every crime, there is a misfortune...!!!' आयुष्य हे असंच असतं. कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं? दोन्ही एकाच राशीची चाकं. कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच.
समुद्रात बुडून त्याचा मृत्यू
झाला. पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? चाळीस
घरांच्या ढीगाखाली गाढलं गेलेलं सहा महिन्याचं बाळ, 30 तासानंतरही
तसंच छान हसत खेळत सापडतं. त्याला अलगदपणे ढीगाऱ्यातही कुशीत घेणारं कोणं असतं?
नेहमीच्या रस्त्यानं जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते?
तिला दरीत ढकलंणारं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक
आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या
रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बाम्बस्फोट होतो... पण तो त्या दिवशी ऑफिसलाच गेलेला
नसतो. त्यामुळे तो वाचतो. ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते?
कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्म
होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल??? कोण सांगेल कोण ??? कुणीच नाही.... हे असंच असतं...
भक्तीनं रुजवलेलं.... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं.... कर्माच्या
चक्रात अडकलेलं... ईश्वरानं लिहलेलं.... आपलं आयुष्य.
माणसाचं आयुष्य असंच असतं. त्याच्या हातात काहीच नसतं. आपण फक्त प्यादी असतो या पटावरची. कर्ता करविता असतो तो ईश्वर. एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल? काहीच सांगता येत नाहीत. मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच. कर्माचा सिध्दांत हा कितीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्य खूप काही सांगून जातं. 'Behind every misfortune, there is a crime... But behind every crime, there is a misfortune...!!!' आयुष्य हे असंच असतं. कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं? दोन्ही एकाच राशीची चाकं. कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा