एका मशिदीजवळ एक पाणीपुरीवाला पाणीपुरी विकत होता. चार कॉलेज तरुणी पाणीपुरी
खात होत्या. मशिदीतून एक मुसलमान म्हातारा बाहेर आला. रस्ता ओलांडायचा होता त्याला
पण गडबडीत रिक्षाच्या आडून आलेला दुचाकीस्वार त्याच्या लक्षात आला नसावा.
मोटारसायकलच्या धक्क्याने म्हातारा कोलमडून पडला. मोटारसायकलच्याच मागे वीस बावीस
वयाचा एक मुलगा सायकलवर येत होता. सायकलवर पार्सलची पिशवी होती. बहुधा डिलिव्हरी
बॉय असावा... अंगात जर्कीन... त्यावर छातीच्या डावीकडे छत्रपतींचा देखणा रुबाबदार
फोटो... त्याने वृध्दाला पडताना पाहिले आणि क्षणार्धाथ त्याने पिशवीसहीत सायकल
रोडवर सोडून दिली. सायकल व पिशवी रोडवर पडली. धावत जाऊन त्याने त्या वृध्दाला
उठवले. त्याचे कपडे झटकले. त्याला रोड पार करुन दिला. मग परत येऊन पिशवी, सायकल
उचलली व आपल्या रस्त्याने निघून गेला.
हे सर्व पाहून त्या चौघांपैकी एक जी बहुतेक मराठा असावी, तिच्या तोंडून आपसूक बाहेर पडलं, "हा खरा माझ्या राजांचा मावळा." हे ऐकून तिघी हसल्या आणि त्यापैकी एक म्हणाली, "लग्न करशील त्याच्याशी?" तिचे हे ऐकून पहिल्या मुलगीने सुरेख उत्तर दिले, "का? काय वाईट आहे?... बापकमाईची गाडी फिरवत नाही. कष्ट करुन पोट भरतो. माझ्या राजाचा मावळा आहे म्हणून मुसलमान वृध्दाला मदत केली. इतकी माणुसकी... 14 फेब्रुवारीला गुलाब हातात घेऊन दरवर्षी नवीन मुलगी शोधत फिरणाऱ्या या माकडांपेक्षा असा मुलगा कधीही चांगलाच !!!" कौतुल वाटलं.... मुलीचं नाही तिच्या आई-बाबांचे ज्यांनी तिला हे पारखण्याची नजर दिली.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा