पुण्याला जात असताना धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो. एक 12-13 वर्षाचा साधे
कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याचं जाणवलं. चहापान
झाल्यावर निघालो तेंव्हा माझी नजर त्याला शोधत होती. गाडीपासून 20-25 फुटावर झाडाच्या आडोशाला तो उभा होता. नजर माझ्याकडे. मी त्याला जवळ
बोलावलं. "भूक लागली का?" विचारलं. तो मानेनेच
नाही म्हणाला. माझी उत्सुकता वाढली. "पैसे पाहिजेत?"
"नाही." "मग...?" पाठीमागे लपवलेली
पुष्ट्याच्या प्याड निबंधाची वही आणि रिफील संपलेला रुपयाचा पेन (use and
throw) त्यानं दाखवला. "पेनची नळी संपली. घेऊन द्या न...!" मी 5 रुपये दिले. तो, "पैसे नकोत, नळी
घेऊन द्या." मी म्हटलं, "का?" तो, "माझी
माय म्हणली कुणाकडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही.... मी जितके फुकटचे पैसे घेईल
तितकं माझ्या मायचं आयुष्य कमी हुईल !!!!" त्याचं हे
उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं. माझी माणुसकीची नशा खाडकन उतरली.
दातृत्वाचं ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.
मी गाडीतून उतरलो. त्याचं नांव विचारलं. बंड्या... बंड्या मला टपरीकडे घेऊन गेला. पेन घेतल्यावर बंड्या खुलला. माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. मी म्हणालो, "कितवीत आहेस?" बंड्या म्हणाला, "सातवीत." मी म्हणालो, "काय लिहितोस???" बंड्या, "निबंध... माझी आई !!!" मी म्हणालो, "कुठे राहतोस?" बंड्याने शेताकडं बोट दाखवलं. लांबवर एक झोपडी दिसत होती. बंड्याचा बाप शेतावर जागल्या होता. आई शेतावर मजूरी करत होती. बंड्याला चार लहान भावंडं होती. मी वही हातात घेऊन चाळली. बंड्या झेड. पी. च्या शाळेत होता. त्याचं पूर्ण नाव वाचलं. अन मग विचारलं, "माझ्याकडंच नळी का मागितली?" बंड्या गांगरला. मी परत विचारलं, "इथं इतके लोक आहेत मग माझ्याजवळ नळी का मागितली?" बंड्या म्हणाला, "तुमच्या खिशाला मला पेन दिसला म्हणून...!!!" मग मी सगळीकडे बघितलं. बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते. बंड्याचे निरीक्षण अचूक होते. माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता. मी म्हणालो, "तुला कोण व्हायचं? मोठा झाल्यावर..." बंड्या म्हणाला, "फौजदार !!!" मी म्हणालो, "फौजदार?? कसं काय?? कुणी सांगितलं???" बंड्या म्हणाला, "मास्तर म्हणाले की मी खूप अभ्यास केला की फौजदार होईल." मला त्याचं उत्तर आवडलं...!!
माझ्या बरोबरचे
मित्र वैतागले होते...! स्वत:च्या आयुष्याला फुकटचे पैसे न
घेण्याच्या संस्कारांशी जोडणाऱ्या त्या माऊलीला निरागस डोळ्यांमध्ये फौजदार
होण्याचं स्वप्न देणाऱ्या झेड. पी. च्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला..!!!
माझ्या खिशाचा आवडता पेन काढला. बंड्याच्या खिशाला लावला. त्याच्या
खांद्यावर हात ठेवला अन माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरसी शेकहँड करुन
गाडीत बसलो. गाडी निघाली... बंड्याच्या डोळ्यात चमक आली होती. बंड्या बराच वेळ
गाडीकडे बघत हात हालवत होता. मी निश्चिंत होतो. कितीही भ्रष्टाचार वाढो. जोपर्यंत
बंड्यासारख्या विचारांची मुलं आपल्या देशात आहेत आणि आपल्या देशासाठी काहीतरी
करण्याची धडपड ज्यांच्या अंगी आहे तोपर्यंत भ्रष्टाचार कितीही वाढो, माझ्या देशाचं
भविष्य उज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली...!!!
मी गाडीतून उतरलो. त्याचं नांव विचारलं. बंड्या... बंड्या मला टपरीकडे घेऊन गेला. पेन घेतल्यावर बंड्या खुलला. माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. मी म्हणालो, "कितवीत आहेस?" बंड्या म्हणाला, "सातवीत." मी म्हणालो, "काय लिहितोस???" बंड्या, "निबंध... माझी आई !!!" मी म्हणालो, "कुठे राहतोस?" बंड्याने शेताकडं बोट दाखवलं. लांबवर एक झोपडी दिसत होती. बंड्याचा बाप शेतावर जागल्या होता. आई शेतावर मजूरी करत होती. बंड्याला चार लहान भावंडं होती. मी वही हातात घेऊन चाळली. बंड्या झेड. पी. च्या शाळेत होता. त्याचं पूर्ण नाव वाचलं. अन मग विचारलं, "माझ्याकडंच नळी का मागितली?" बंड्या गांगरला. मी परत विचारलं, "इथं इतके लोक आहेत मग माझ्याजवळ नळी का मागितली?" बंड्या म्हणाला, "तुमच्या खिशाला मला पेन दिसला म्हणून...!!!" मग मी सगळीकडे बघितलं. बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते. बंड्याचे निरीक्षण अचूक होते. माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता. मी म्हणालो, "तुला कोण व्हायचं? मोठा झाल्यावर..." बंड्या म्हणाला, "फौजदार !!!" मी म्हणालो, "फौजदार?? कसं काय?? कुणी सांगितलं???" बंड्या म्हणाला, "मास्तर म्हणाले की मी खूप अभ्यास केला की फौजदार होईल." मला त्याचं उत्तर आवडलं...!!
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा