बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

26. आईचे प्रेम

 एकदा नक्की वाचा.. आईची प्रेमळ कथा

     एका गावात एक बाई आपल्या छोटया मुलाबरोबर एका छोटया झोपडीत रहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र एक करुन ती काम करत असे, पण त्या छोटया मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करीत असतो. कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते, पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही. रागाचा एककटाक्ष टाकून ता तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रंचड बोलतो. कशाला आली होतीस शाळेतआता माझे मित्र मला चिडवतीलमी उद्या शाळेत कसा जाऊ? तूला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस.  वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो याचे मुलाला काहीच वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही बोलता तो जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते. तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळयाच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो. त्या क्षणी तो निर्णय घेतो. शिकून खूप मोठे व्हायचे आणि येथून बाहेर पडायचे. त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठया शहरात येतो. नामवंत विद्यापिठातून पदवी मिळवितो. मोठया कंपनीत मोठया हुद्यावर काम करु लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते. कारण हे सुंदर चित्र बिघडविणारी एक डोळयाची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरुनच गेलेला असतो. अतिशय सुखात असतो

            एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तिच एका डोळयाची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरुन आत पळून जाते. तो आधी चक्रावतो आणि मग स्वत:ला सावरत तिला म्हणतो, कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ, माझी मुलगी तुला घाबरली. मी  बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले. असे काहीतरी पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही(?) अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो. काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असूनही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटे सांगतो. संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते  आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.  

              तो वाचू लागतो, मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता परत मी कधीही येणार नाही. पण कधीतरी तू मला येऊन भेटावे अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनात तू येणार हे कळले होते. पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहित आहे, एका डोळयाची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का ? असे तू मला एकदा विचारले होतेस. तेंव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही. पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमवलास. एक डोळयाने तू तुझे संपूर्ण आयुष्य कसे जगणार? या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जे वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागवलेले नाही. तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे, असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस. पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वत:चा सर्वात महत्वाचा अवयव  जिने त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. तो आईला मोठमोठयाने हाका मारु लागला. पण आता त्याचा काय उपयोग होता

             आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...